नागपूर/प्रतिनिधी:
अनुभव, संस्कृती व ज्ञान या त्रिसूत्रीच्या आदान प्रदानासाठी अखिल भारतीय क्रीडा स्पर्धा उपयुक्त ठरतील असे प्रतिपादन चंद्रकांत थोटवे, संचालक (संचलन) महानिर्मिती यांनी केले.४३ व्या अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या व्हॉलीबॉल स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक व अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.
मंचावर विनोद बोंदरे कार्यकारी संचालक (मानवं संसाधन), उमाकांत निखारे मुख्य अभियंता, नाशिक वीज केंद्र व अध्यक्ष आयोजन समिती, नवनाथ शिंदे मुख्य अभियंता (सौर, नाशिक), जयंत विके, मुख्य अभियंता (पारेषण), राघवेंद्र मिश्रा निरीक्षक अ.भा.वि.क्रि.नि.मं. उत्तर प्रदेश, अनिल मुसळे मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी, डी. बी. गोरे, सह संचालक (औ. सु. व आ.) नाशिक, सुनील इंगळे उप मुख्य अभियंता हे उपस्थित होते.
चंद्रकांत थोटवे पुढे म्हणाले की आपण सर्वजण एकाच परिवारातील असून आपली प्रादेशिक भाषा वेगळी असली तरी आपण ग्रीडच्या तारांनी एकमेकांशी जोडलेले असल्याने आपली फ्रिक्वेन्सी एकच आहे. नाळ जुळलेली असल्यामुळे हार-जीतला काही महत्व नाही. एकाच परिवारात स्पर्धा होऊ शकत नसल्याने सर्व खेळाडूंनी मॅचेसचा आस्वाद घ्यावा. त्यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. कायर्क्रमाच्या सुरुवातीला पुलवामा येथील शहीद जवानांना सर्व उपस्थितांनी दोन मिनिट स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहिली .
भारतभरातून आलेल्या २० संघांच्या २५० खेळाडूंनी शानदार संचलन केले व सलामी मंचावरील प्रमुख पाहुण्यांना सलामी दिली. उद्घाटक चंद्रकांत थोटवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
मशालीच्या सहाय्याने क्रीडाज्योत प्रज्वलित करून व तिरंगी फुगे आकाशात सोडून स्पर्धांचे उद्घाटन झाल्याचे घोषित करण्यात आले सोनावणे ,तुषार परदेशी ,शशांक केसरखाने, मंगेश ठुबे या नावाजलेल्या राष्ट्रीय खेळाडूंनी मैदानाला चक्कर मारत क्रीडाज्योती आणली. कायर्क्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत थोटवे यांच्या हस्ते सर्व संघ व्यवस्थापकांचे गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले . सोहेल शेख या खेळाडूने सर्वांना शपथ दिली .
मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अनिल मुसळे यांनी प्रास्ताविक केले. नाशिक ढोलपथक वादनाने व महाराष्ट्राच्या सांकृतिक दर्शनाने सर्वाना मंत्रमुग्ध केले.
उत्तर प्रदेश पावर कार्पोरेशन चे राघवेंद्र मिश्रा (निरीक्षक अ.भा.वि.क्रि.नि.मंडळ) यांनी सुरेख आयोजनाबद्दल आयोजन टीमचे अभिनंदन केले. विनोद बोंदरे यांनी आपल्या भाषणात सांगितले कि, महानिर्मिती वीज उत्पादन क्षेत्रासोबतच इतर क्षेत्रातही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी करत आहे. क्रीडा स्पर्धाच्या माध्यमातून उत्साह, नवा जोश, आणि कार्यक्षमता वाढीस लागते. कल्याण अधिकारी निवृत्ती कोंडावले यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शशांक कांबळे, लिना पाटील, वासंती नाईक व पुरुषोत्तम वारजूकर यांनी केले.
कार्यक्रमास अधीक्षक अभियंते सर्वश्री कमटमकर, तायडे, चव्हाण, कुमावत यांचे सहित श्रीकांत नवलाखे, विलास हिरे, कर्मचारी व अधिकारी वर्गासह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उदघाटनानंतर प्रत्यक्ष स्पर्धेला प्रारंभ झाला. २० संघाचे एकूण ३६ सामने खेळल्या जाणार आहेत.