Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, फेब्रुवारी २०, २०१९

‘झुंड’ चित्रपट 20 सप्टेंबरला सर्वत्र झळकणार


‘सैराट’ फेम दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा बहुप्रतिक्षित ‘झुंड’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही ठरली आहे. हा चित्रपट 20 सप्टेंबर, 2019 ला सर्वत्र झळकणार आहे.

झुंड या चित्रपटाचे शुटिंग नागपूरमध्ये झाले आहे. नागपूरच्या मोहननगर येथील सेंट जॉन्स हायस्कूल, लोणारा आणि प्रा. बारसे सेंट उर्सूला गर्ल्स हायस्कूलजवळील घरी हे शुटिंग पार पडले.

‘झुंड’ हा चित्रपट नागपूरच्या निवृत्त क्रीडा शिक्षक विजय बारसे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. 2001 मध्ये विजय यांनी स्लम सॉकर नावाच्या एका एनजीओची स्थापना केली होती. स्लम भागात राहणाऱ्या मुलांना फुटबॉचे प्रशिक्षण देण्याचा या एनजीओचा उद्देश होता. याच धरतीवर आधारित हा चित्रपट असून प्रमुख भूमिकेमध्ये बिग बी अमिताभ बच्चन दिसणार आहे. अमिताभ बच्चन फुटबॉल प्रशिक्षकाची मुख्य भूमिका साकारत आहेत. यासह ‘सैराट’मध्ये प्रमुख भूमिका असणारे रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसरचीही यात भूमिका आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.