या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर राज्यमंत्री दीपक केसरकर, वन विकास मंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, आयटीसी या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवी रायवरम तसेच महाराष्ट्र बांबू विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक टी.एस.के. रेड्डी उपस्थित राहणार आहेत.
महिला बचत गटांच्या मार्फत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अगरबत्ती प्रकल्प सुरू करण्याबाबतचे सुतोवाच ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले होते. प्रसिद्ध आयटीसी कंपनी यांच्या सहकार्याने आता हे काम पोंभुर्णा तालुक्यामध्ये सुरू झाले आहे. उद्या या प्रकल्पाचे उद्घाटन होत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून मोठ्या संख्येने महिलांना उद्योग मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. उद्याच्या या कार्यक्रमाला पोंभुर्णा पंचायत समितीच्या सभापती अलकाताई आत्राम, पोंभुर्णाच्या नगराध्यक्षा श्वेता बनकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष राहुल संतोषवार, आयटीसी लिमिटेड शाखा व्यवस्थापक बिजीत सिद्धार्थ, यांच्याशिवाय मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामराव, एफडीसीएम महाव्यवस्थापक ऋषिकेश रंजन,वनसंरक्षक एन.आर.प्रवीण, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी,आयटीसीचे आशिष मुरलीधर, वि.बालकृष्णन आदी उपस्थित राहणार आहे. दुपारी तीन वाजता होणाऱ्या या सोहळ्याला मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहुल पाटील यांनी केले आहे.