Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, डिसेंबर १८, २०१९

बाबूपेठ पूलाच्या बांधकामाकरिता १५ कोटी तर महाकाली मंदिराच्या ६० कोटींच्या कामावरील स्थगिती मुख्यमंत्र्यांनी हटवली

बातमी
नागपूर/प्रतिनिधी:
आज चंद्रपूर जिल्ह्याची आढावा बैठक मूख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षेत नागपूर येथे पार पडली यावेळी चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील प्रलंबीत प्रश्नांवर आमदार किशोर जोरगेवार यांनी चर्चा करत हे प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. यावेळी मूख्यमंत्री यांनी दखल घेत बाबूपेठ उड्डाणपूलाच्या बांधकामासाठी तात्काळ १५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. तसेच महाकाली मंदिर सौंदर्यीकरणासाठीच्या ६० कोटींच्या कामावरील स्थगिती जोरगेवार यांच्या मागणी नंतर उद्धव ठाकरे यांनी हटविले. धानोरा बॅरेजच्या कामाचा आराखडा जून महिण्यापर्यंत सादर करण्याचे निर्देश मूख्यमंत्री यांनी संबधित विभागाला दिले आहे.

चंद्रपूर जिल्हा आढावा बैठक आज मूख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेत नागपूर येथे आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीला चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील अणेक प्रलंबीत प्रश्नांकडे मूख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. निधी अभावी बाबूपेठ उड्डाणपूलाचे काम संथ गतीने सूरु आहे. ही बाब जोरगेवार यांनी मूख्यमंत्री यांच्या लक्षात आणून देताच या पूलाच्या बांधकामासाठी १५ कोटी रुपये निधी तात्काळ उपलब्ध करुन देण्यात आला. चंद्रपुरची आराध्य दैवत माता महाकाली मंदिराच्या सौदर्यीकरणाकरिता ६० कोटी रुपये मंजूर झाले होते परंतु नव्या सरकारनी या कामाला स्थगिती दिली होती. त्यामुळे हे काम बंद होते याकडेही जोरगेवार यांनी मूख्यमंत्री यांचे लक्ष वेधत येथे भाविकांच्या श्रध्दा जूळल्या असल्याचे पटवून दिले. त्यानंतर ही स्थगिती हटविण्यात आली आहे. चंद्रपूरच्या पाण्याचा प्रश्न गंभिर आहे. त्यामूळे धानोरा नदीवर बॅरेज बांधण्यात यावे अशी मागणी आहे. त्यासाठी अंदाजित ५०० कोटी रुपये खर्च येणार असून याकडेही आमदार जोरगेवार यांनी मुख्यमंत्री यांचे लक्ष वेधले याची दखल घेत जून महिण्यापर्यंत या बॅरेजच्या कामाचा आराखडा सादर करण्यात यावा असे निर्देश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी संबधित विभागाच्या अधिका-यांना दिले आहे. तसेच आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रधानमंत्री आवास योजनेतील जाचक अटींवर मूख्यमंत्री यांचे लक्ष वेधले चंद्रपूरातील बहुतांश भाग हा नजूलच्या जागेवर असल्याने नागरिकांकडे घराचे पट्टे नाही. त्यामूळे प्रधानमंत्री आवाज योजनेच्या लाभापासून या नागरिकांना वंचित राहावे लागत आहे. त्यामूळे येथील नागरिकांना पट्टे देण्यात यावे तसेच या योजनेतील अटी शिथील करण्यात याव्यात अशी मागणी आमदार जोरगेवार यांनी केली. याची दखल घेत मूख्यमंत्री यांनी पट्टे देण्याच्या दिशेने उपाययोजना करण्यासाठी महसूल विभागाला सूचीत केले आहे. तसेच या जिल्हा आढावा बैठकीत आरोग्य प्रदूषण या विषयावरही आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री यांच्याशी सविस्तर चर्चा केली. एकंदरीतच आजच्या या जिल्हा आढावा बैठकीत चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील प्रश्नांना चालना मिळाली आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.