Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, डिसेंबर १८, २०१९

खळबळजनक:नागपूरचे महापौर संदीप जोशीवर गुंडांकडून गोळीबार


नागपूर/प्रतिनिधी:
नागपुरात हिवाळी अधिवेशनानिमित्त एकीकडे मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला असतांना दुसरीकडे नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या जीवघेण्या हल्ल्यात संदीप जोशी थोडक्यात बचावले. संदीप जोशी यांच्या लग्नाचा काल वाढदिवस असल्याने महापौर संदीप जोशी काल रात्री त्यांचे कुटुंबीय आणि काही निवडक मित्रांसह नागपूरच्या आऊटर रिंग रोडवरील रस रंजन धाब्यावर जेवायला गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर गोळीबार झाला. पोलीस सध्या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

एका बाईकवरून दोघेजण हेल्मेट घालून होते. ज्यापद्धतीने धमक्या आल्या होत्या त्याप्रमाणे हे पटलावर होतं असेही ते म्हणाले. 

संदीप जोशी एका मित्रासह त्यांच्या फॉर्च्युनर कारमध्ये सर्वात मागे होते. 12 वाजून 5 मिनिटांच्या सुमारास त्यांची कार आऊटर रिंग रोडवर परसोडी जवळील एम्प्रेस पॅलेसजवळ असताना मागून बाईकवर आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी संदीप जोशी यांच्या चालत्या कारवर 3 गोळ्या झाडल्या. तिन्ही गोळ्या संदीप जोशी यांच्या कारला लागल्या. एक गोळी संदीप जोशी यांच्या बाजूच्या काचेतून कारच्या आत शिरली. तर दुसरी गोळी कारच्या मागील सीटमध्ये शिरली. तिसरी गोळी कारच्या मागील बाजूला लागली.
Image
एका ठिकाणी जेवून आम्ही बाहेर पुन्हा यायला निघत होतो. गाडी मी स्वत: चालवत होतो. माझ्यासोबत माझे मित्र होते. मागच्या बाजून बाईकस्वार होते. पहिली गोळी माझ्या बाजुच्या काचेत आली, दुसरी मधल्या सीटवर आली आणि तिसरी गोळी मागून आली. गाडी आत घुसली, कंट्रोल गेला त्यामुळे आम्ही वाचलो असे महापौर जोशी म्हणाले. ६ आणि १२ तारखेला धमकी आली होती त्यामुळे संशय घ्यायला बराच वाव आहे. 

संदीप जोशी (महापौर,नागपूर)

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. तर भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने पहाटेपर्यंत

बेलतरोडी पोलीस स्टेशनच्या समोर जमले होते. मी सुखरुप आहे, अशी प्रतिक्रिया संदीप जोशी यांनी दिली आहे. हल्लेखोरांना लवकरात लवकर
अटक झाली पाहिजे, अशी मागणी भाजप शहर अध्यक्ष प्रवीण दटके यांनी केली आहे.
पोल्ट्रीफीड उपलब्ध 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.