अविश्वासाचा ठराव नामंजूर , बागले गटात जल्लोष
गणेश जैन,खबरबात / धुळे
बळसाणे : माळमाथा परिसरातील ऐचाळे ता.साक्री ग्रामपंचायतीवर सौ. गोकुळबाई आप्पा बागले हे सरपंच पदावर कार्यरत असताना काही विरोध्दक सदस्यांनी त्यांच्या वर अविश्वास ठराव दाखल केला परंतु ता. ६ जून रोजी ऐचाळे ग्रामपंचायतीत साक्री चे नायब तहसीलदार संदीप सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक बोलविण्यात आली होती मात्र सौ.बागलेंच्या विरोधात बहुमत सिध्द न झाल्याने नायबतहसीलदार संदीप सोनवणे यांनी हा ठराव रितसर पडताळणी करून नामंजूर केला दरम्यान विरोध्दकांनी साक्री तहसीलदाराकडे सरपंच मनमानी कारभार करीत असतात व कार्यालयीन कामासाठी वेळ देत नाहीत आदी कारणांसह विरोध्दक सदस्यांनी तहसीलदारांकडे अविश्वास ठराव दाखल केला होता याप्रसंगी नायबतहसीलदार संदीप सोनवणे यांनी ऐचाळे ग्रामपंचायतीमध्ये सदस्यांची विशेष सभा घेतली आणि सर्व सदस्यांची मत जाणून घेतली व सोनवणे यांनी सौ.गोकुळबाई बागले यांच्या विरोधात दाखल केलेला अविश्वास ठराव अखेर नामंजूर केल्याचे जाहीर केले याबाबत ना.जयकुमार रावल व ना.सुभाष भामरे तसेच माळमाथा परिसराचे नेते नारायण पाटील यांनी शुभेच्छा दिल्या व कौतुक केले सौ गोकुळ बागले ह्या आप्पा दादा बागले यांच्या पत्नी असून त्या सरपंच पदाच्या धुरा सांभाळत आहेत पुन्हा त्यांना दिलासा मिळाल्याचे समाधान गावातून होत आहे