Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, जून ०६, २०१९

चंद्रपूर महानगरपालिका पोटनिवडणुकीसाठी अंतिम दिवशी ८ अर्ज दाखल


चंद्रपूर/प्रतिनिधी:


आगामी चंद्रपूर महानगरपालिका पोट निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी प्रभाग क्रमांक ६ व प्रभाग क्रमांक १३ मिळून एकूण ८ अर्ज दाखल झाले आहेत. महिलांकरीता राखीव असलेल्या इंडस्ट्रीयल इस्टेट प्रभाग क्रमांक ६ ( ब )करीता ३ तर बाबुपेठ प्रभाग क्रमांक १३ ( ब ) करीता एकूण ५ अर्ज दाखल झाले आहेत.

राज्य निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रमानुसार चंद्रपूर येथील प्रभाग क्रमांक ६ ब आणि १३ ब करीता राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर नामनिर्देशपत्रे भरण्याचा व स्वीकारण्याचा कालावधी ३० मे ते ६ जुन असा होता. या कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे नामांकन अर्ज दाखल करण्याचे शेवटच्या दिवशी प्रभाग क्रमांक ६ व प्रभाग क्रमांक १३ मिळून एकूण ८ अर्ज दाखल झाले आहेत. यात विविध पक्ष व अपक्ष उमेदवार यांचा समावेश आहे.

६ जून ही नामनिर्देशपत्र दाखल करण्याची अखेरची तारीख जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे शेवटच्या दिवशी इंडस्ट्रीयल इस्टेट प्रभाग क्रमांक ६ ( ब ) मधे - इंडियन नॅशनल काँग्रेसतर्फे कलामती रामकृपाल यादव, भारतीय जनता पार्टीतर्फे रंजना रवींद्र उमाठे, बहुजन समाज पार्टीतर्फे सुनीता सुभाष दोनोडे यांचे तर बाबुपेठ प्रभाग क्रमांक १३ ( ब ) मधे - भारतीय जनता पार्टीतर्फे प्रदीप गणपत किरमे, बहुजन समाज पार्टीतर्फे भास्कर भाऊराव गहुकर, तर अपक्ष म्हणून राजू शंकरराव कृष्णापूरकर, संजय आनंदराव बुरडकर व प्रवीण शंकर खनके यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत . या दोन्ही जागांवरील पोटनिवडणुकीसाठी २३ जून एप्रिल रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.