Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

नाशिक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
नाशिक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ऑगस्ट ०८, २०२२

अखिल भारतीय किसान सभेचे जुन्नर तालुका अधिवेशन |

अखिल भारतीय किसान सभेचे जुन्नर तालुका अधिवेशन |

तालुका अध्यक्षपदी माधुरी कोरडे तर सचिवपदी लक्ष्मण जोशी यांची निवड 


जुन्नर /आनंद कांबळे(वार्ताहर) (junnar Khabarbat)  : नाशिक येथील ऐतिहासीक १ लाख लोकांचे महामुक्काम असेल, वाडा येथे आदिवासी विकास मंत्र्यांच्या घराला घातलेला ७० हजार आदिवासी जनतेचा महाघेराओ, शेतमालाला हमीभाव आणि कर्जमाफीसाठीचा ऐतिहासीक शेतकरी संप. नाशिक ते मुंबई असे झालेले दोन लाँगमार्च. आणि दिल्लीच्या चारही सीमांवर वर्षभर आंदोलन करुन मोदी सरकारला मागे घ्यायला लावलेले तीन काळे कायदे. दुध ऊस दराबाबतची आंदोलने अशी देशभर आणि राज्यभर शेतकरी, शेतमजुर आदिवासींचे प्रश्न सरकार दरबारी मांडून काम करणाऱ्या किसान सभेचे आज जुन्नर तालुक्याचे तिसरे त्रैवार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन करताना आंनद वाटतो आहे, असे उद्गार शिक्षक समितीचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब लांघी यांनी काढले.

अखिल भारतीय किसान सभा, जुन्नर तालुका समितीचे त्रेवार्षिक अधिवेशन आज (दि.७) रोजी प्रभाकर संझगिरी भवन, जुन्नर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी अधिवेशनास उद्घाटनापर ते बोलत होते. तसेच नामदेव मुंढे यांनीही मार्गदर्शन केले.

पुढे लांघी म्हणाले, सरकारी यंत्रणांच्या चौकशीला घाबरुन शांत बसलेले विरोधक आणि भांडवलदारांच्या बाजुने निर्णय घेणारे केंद्र सरकार. यामुळे महागाई, बेरोजगारीने कळस गाठलेला आहे. याला विरोध करण्यासाठी किसान सभेला बळ देण्याचे आवाहन ही त्यांनी केले. तसेच नामदेव मुंढे यांनीही मार्गदर्शन केले.

प्रतिनिधी सत्रात 2016 - 2022 या वर्षातील कार्यात्मक, संघटनात्मक अहवाल अधिवेशनासमोर ठेवण्यात आला. यावेळी अहवालावर चर्चा आणि सूचना होऊन अहवाल पारीत करण्यात आला. तसेच या अधिवेशनादरम्यान विविध प्रश्नांना घेऊन लढा तीव्र करण्याचा निर्धार उपस्थित प्रतिनिधींच्या वतीने करण्यात आला ‌‌.

या अधिवेशनाने शेतमालाला हमीभाव देणार कायदा करा, शिक्षण, आरोग्य आणि अन्य स्थानिक प्रश्नांसंदर्भातील लढा तीव्र करा, मनरेगा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा, आदिवासी विकास महामंडळामार्फत हिरडा खरेदी करा, आदी ठरवा एकमताने पारीत करण्यात आले. तसेच या अधिवेशनाने पुढील तीन वर्षांसाठी 19 नवीन कार्यकारिणीची निवड केली.  Junnar Taluka All India Kisan Sabha

नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : 

अध्यक्ष - माधुरी कोरडे
सचिव - लक्ष्मण जोशी
कार्याध्यक्ष - कोंडीभाऊ बांबळे
उपाध्यक्ष - मुकुंद घोडे
सहसचिव - शंकर माळी
खजिनदार - नारायण वायाळ
सदस्य - विश्वनाथ निगळे, संदीप शेळकंदे, मंगल रढे, मनीषा कोकणे, दीपक डामसे, अनिल ढेंगळे, मारूती महाराज सुपे, अशोक दिवटे, विनायक सरोगदे, गणेश मराडे, सचिन मोरे, किसन घोडे, सुनीता भोईर.

समारोप सत्रात बोलताना किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष ॲड. नाथा शिंगाडे म्हणाले, 'स्वातंत्र्यपूर्व काळापासून शेतकऱ्यांवरील अन्याय, शोषणाविरुद्ध किसान सभा लढा देत आहे. आजही इको सेन्सिटिव्ह झोनचा मुद्दा सत्ताधारी आणि विरोधकांनीही हाती घेता आला नाही, तो किसान सभेने तडीस नेला. आता पर्यावरण नियमावलींचे कारण देत पुन्हा आदिवासींनी जमिनीवरून हद्दपार करण्याचा डाव आहे. 

मनरेगा कायदा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या दबावामुळेच देशात अस्तित्वात आला, मनरेगा ची कायद्याची अंमलबजावणीसाठी करण्यासाठी तीव्र संघर्ष करण्याची गरज आहे. हिरडा हे आपल्या तालुक्यातील पश्चिम आदिवासी जनतेचे उत्पादनाचे स्त्रोत आहे, हिरड्याला योग्य भाव आणि आदिवासी महामंडळाकडून हिरडा खरेदी करण्यासाठी येणाऱ्या काळात लढा तीव्र करावा लागेल. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पुढारी हे प्रश्न सोडवू शकणार नाहीत. त्यासाठी शेतकरी, कष्टकरी, कामगार व जनतेचे प्रश्न शासन आणि प्रशासकीत पातळीवर मांडण्यासाठी आपले लोकप्रतिनिधी पाठविण्याचा निर्धार करूयात, असे आवाहनही शिंगाडे यांनी केले.




(junnar Khabarbat)  


रविवार, एप्रिल ०३, २०२२

पवन एक्सप्रेस रेल्वेगाडी घसरली; बचाव गाडी, मेडीकल व्हॅन दुर्घटनास्थळी पोहोचली |

पवन एक्सप्रेस रेल्वेगाडी घसरली; बचाव गाडी, मेडीकल व्हॅन दुर्घटनास्थळी पोहोचली |

लोकमान्य टिळक टर्मिनस ते जयनगर दरम्यान धावणारी पवन एक्सप्रेस रेल्वेगाडी आज दुपारी ३.१५ च्या सुमाराला नाशिक जवळ लहवीत आणि देवळाली स्थानकांदरम्यान घसरली. त्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. अपघात सहाय्य आणि बचाव गाडी, मेडीकल व्हॅन दुर्घटनास्थळी पोहोचली आहे.


नाशिकजवळ लहवीत - देवळाली दरम्यान 11061 एलटीटी-जयनगर पवन एक्सप्रेसचे ११ डबे घसरुन अपघात , काही जण जखमी

अधिक मदतीसाठी मध्य रेल्वेकडून हेल्पलाईन क्रमांक जारी नाशिक - ०२५३-२४ ६५ ८१६. भुसावळ - ०२५८-२२ २० १६७. आपत्ती व्यवस्थापन कक्षासाठी ५४१७३ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हेल्पलाईन क्रमांक रेल्वे -५५९९३ दूरध्वनी क्रमांक ०२२-६७ ४५ ५९ ९३ एमटीएनएलचा हेल्पलाईन क्रमांक : ०२२-२२ ६९ ४० ४०.


The Pawan Express train running between Lokmanya Tilak Terminus and Jayanagar derailed near Lahavit and Deolali stations near Nashik at around 3.15 pm today. As a result, railway traffic has been disrupted. Accident aid and rescue vehicle, medical van has reached the accident site.


मिरज सांगली पुणे मार्गावर #पॅसेंजररेल्वे सेवा सुरु करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. कोल्हापुर पुणे पॅसेंजर 11 एप्रिल पासून तर मिरज कोल्हापूर सांगली कोल्हापूर पॅसेंजर गाड्या 15 एप्रिलपासून सुरू होणार आहेत. कोल्हापुर पुणे मिरज दरम्यान काही थांबे रद्द करण्यात आलेआहेत.

शनिवार, डिसेंबर ०४, २०२१

 संघर्षयोध्दा पुरस्कार वितरण व सालदार आणि त्यांचे वारस या पुस्तिकाचे प्रकाशन | Book Publications

संघर्षयोध्दा पुरस्कार वितरण व सालदार आणि त्यांचे वारस या पुस्तिकाचे प्रकाशन | Book Publications

 संघर्षयोध्दा पुरस्कार वितरण व सालदार आणि त्यांचे वारस या पुस्तिकाचे प्रकाशन


जुन्नर /आनंद कांबळे 

 नाशिक येथील प्रसिद्ध डाँक्टर संजय दामू जाधव यांच्या मातोश्री तुळसाबाई दामू जाधव यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्ताने  संघर्ष योध्दा पुरस्कार व सालदार आणि त्यांचे वारस या पुस्तिकाचे प्रकाशन येत्या १२डिसेंबर रोजी म्हसरुळ (नाशिक) येथे होत आहे.

     प्रा. धम्ममसंगिनी रमागोरख ( विभाग प्रमुख ,महिला विकास प्रमुख  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर ) यांचे हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे.

     संघर्ष योध्दा पुरस्कार भगवानभाऊ  ठाकरे (परिवर्धा ता.शहादा जि.नंदूरबार ) यांना देण्यात येत आहे, ठाकरे गेली ५०वर्षे सालदार म्हणून काम करत आहेत. ग्रामपंचायतीमध्ये प्रस्थापित लोकांच्या विरोधात पँनेल उभे करुन निवडून आणले.म्हणून विरोधकांनी त्याचा एक हात व एक पाय तोडला.

तरीसुद्धा न घाबरता ते आदिवाशी व आंबेडकर जनतेचे संघटन व कबीरांचे दोहे म्हणून समाजप्रबोधन करत आहेत असे डाँ.संजय जाधव यांनी सांगितले.

  या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित राहणार आहे.

मंगळवार, सप्टेंबर ०७, २०२१

अंगणवाडीताईंनी एकत्र येवून पोषण माहिना सप्टेंबर २०२१ ची प्रभावी जनजागृती

अंगणवाडीताईंनी एकत्र येवून पोषण माहिना सप्टेंबर २०२१ ची प्रभावी जनजागृती

पोषण माहिना सप्टेंबर २०२१ ची प्रभावी जनजागृती व्हावी यासाठी मेहनत घेणाऱ्या आदर्श अंगणवाडी सेविका : अन्नपूर्णा  जगदीश अडसुळे  



नाशिक : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (नागरी) नाशिक-२ हा शहरी भागातील १०० अंगणवाडी केंद्रा़चा प्रकल्प त्यातही नाशिक महानगरपालिका, मनमाड, येवला व भगूर या नगरपालिका क्षेत्रात कार्यक्षेत्र असलेला हा प्रकल्प आहे...या प्रकल्पाने सप्टेंबर २०१८ पासून पोषण अभियानात सातत्यपूर्ण कामकाज केलेले आहे..त्यामुळे या प्रकल्पातील अंगणवाडीसेविका, मदतनिस, आरोग्य सेविका, आशा सेविका, मुख्यसेविका या टिमचा आॕगस्ट २०१९ मध्ये राष्ट्रीय स्तरावर महिला व बाल विकास मंत्री मा. स्मृती इराणी यांचे हस्ते सन्मान करण्यात आला आहे.

.आजही या प्रकल्पातील अंगणवाडीताई याच उत्साहाने कामकाज करत आहेत..याची प्रेरणा या ताईंना अन्नपूर्णा जगदिश अडसुळे  या अंगणवाडी केंद्र क्र.६७ मनमाडच्या अंगणवाडीताईने दिली...आज कोरोनाचे पार्श्वभूमीवर जनजागृती कशी करावी हा प्रश्न असतांना या प्रकल्पातील ताईंनी एकजूटीने नियोजन करुन हा प्रश्नही मार्गी लावला आहे...काही अंगणवाडीताईंनी एकत्र येवून सोशल मिडियाचा वापर जनजागृती करण्यासाठी करायचे ठरविले व त्यांनी उपयुक्त असे छोटे- छोटे व्हिडीओ तयार केलेत..हे व्हिडीओ लाभार्थी पालकांपर्यंत पोहोचविले जात आहेत..आज ही हे काम सुरु आहे..यासाठी या सर्व ताई आपले अंगणवाडी केंद्राचे मुळ कामकाज सांभाळून सुट्टीच्या दिवसासह अतिरिक्त वेळ देवून हे व्हिडीओ तयार करत आहेत. यासाठी अन्नपूर्णा अडसुळे, पुष्पा वडजे, सविता तायडे, किर्ती पाचपांडे, पद्मा निरभवणे, सुहासिनी कसोटे, वंदना हिवाळे, कुसुम कासव, अलका लोखंडे या अंगणवाडी सेविका मेहनत घेत आहेत. आतापर्यंत १२ व्हिडीओंचे काम पूर्ण झाले असून हे सर्व व्हिडीओ सोशल मिडियाद्वारे जनजागृतीसाठी वापरले जात आहेत..लाभार्थी व पालक, परिसरातील नागरिक यांचेकडून या कामाचे कौतुक केले जात आहे..हे सर्व व्हिडीओ बनविणेसाठी या अंगणवाडी सेविकांना पुष्पा वाघ व शितल गायकवाड या मुख्यसेविकांचे मार्गदर्शन लाभत आहे..राष्ट्रीय स्तरावर सन्मान प्राप्त अन्नपूर्णाताई अडसुळे यांचे संपूर्ण कुटुंबच नाशिक (नागरी) २ प्रकल्पाला याकामी स्वेच्छेने मदत करत आहे..

गुरुवार, ऑगस्ट १२, २०२१

चिपळूण व महाड येथील पूरग्रस्तांना मालेगाव येथील शहीद भगतसिंग सेनेतर्फे मदत

चिपळूण व महाड येथील पूरग्रस्तांना मालेगाव येथील शहीद भगतसिंग सेनेतर्फे मदत





प्रतिनिधी/मालेगाव
चिपळूण महाड संपूर्ण कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. या परिस्थितीत पूरग्रस्तांना तातडीने मदतीची गरज होती, ही गरज ओळखून मालेगाव येथील शहीद भगतसिंग सेनेतर्फे तातडीने मदत गोळा करण्याची मोहीम हाती घेण्यात आली. जमा झालेल्या मदतीचे योग्य रीतीने किट्स तयार करून या मदत किट्स चे चिपळूण महाड येथील पूरग्रस्त बांधवाना योग्य रीतीने मदत पोहोच केली. २०१९ वर्षी कोल्हापूर सांगली येथील महापुरात देखील शहीद भगतसिंग सेनेतर्फे अश्याच प्रकारची मदत करण्यात आली होती. यावेळी शहिद भगतसिंह सेनेचे अध्यक्ष ललित बेडेकर, आंशुराज राजेंद्र पाटिल,सुरज कांबळे , यश रणधिरे, आकाश कांबळे , सुशिल कांबळे ,प्रविण बेडेकर ,रुषिकेश सोनवणे, आमोल खैरणार , विनोद पगार, पवन याळीज, पुस्कर शिंदे ,सागर याळीज , आदिसह उपस्थित होते

अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम नियमितपणे पार पाडण्याचा शहीद भगतसिंग सेनेचा मानस आहे.

बुधवार, एप्रिल २१, २०२१

मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत जाहीर

मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत जाहीर

 महाराष्ट्र शोकमग्न आहे!

                                                     -- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 

            मुंबईदि. 21 : कोरोनाच्या संकटामुळे देश दुर्दैवाच्या दुष्टचक्रात सापडला आहे. एकंदरीत कोरोनाशी विषम प्रकारची लढाईच सुरू आहे. कुठे प्राणवायू नाहीकुठे औषधे नाहीतकुठे बेडस् नाहीत. त्याअभावी रुग्णांचे हाल व मृत्यू होत आहेत. अशात नाशिक महानगरपालिका रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेची बातमी धक्कादायक आहेमन हेलावणारी आहे. ऑक्सिजन टाकीच्या गळतीने २२ रुग्णांना प्राण गमवावे लागले. हे दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. एकाएका कोरोना रुग्णास सावरण्यासाठी महाराष्ट्र शासन शर्थ करीत असताना असा अपघात आघात करतो. राज्याची संपूर्ण यंत्रणाच या युद्धात स्वतःला वाहून घेत आहे. मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन कसे करूत्यांचे अश्रू कसे पुसूअपघात असला तरी मृतांच्या नातेवाईकांचे दुःख मोठे आहे. या अपघाताची खोलात जाऊन चौकशी होईलच.

            या दुर्घटनेस जबाबदार असेल तर त्याची गय केली जाणार नाहीपण या दुर्दैवी घटनेचे राजकारणही कुणी करू नये. संपूर्ण महाराष्ट्रावर हा आघात आहे. नाशिकच्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न आहे!  अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

-------------

मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत जाहीर

उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

 

            या संपूर्ण घटनेत उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मी दिले आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याचे देखील त्यांनी जाहीर केले आहे.

            नाशिकची ही घटना सर्वांसाठी केवळ धक्कादायक नाही तर प्रशासनाला या संपूर्ण लढ्यात आपल्याला अतिशय काळजी घेऊन जावे लागणार आहे हे शिकविणारी आहे. आज गेल्या वर्षभरापासून आपण कोविडच्या लाटेला सामोरे जात आहोत. उपलब्ध डॉक्टर्सवैद्यकीय कर्मचारी हे रात्रंदिवस रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी झटताहेतअशा परिस्थितीत अशा निष्काळजीपणाने जीव जाणे मनाला अतिशय बोचणारे आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात कीकेवळ शोक सांत्वना करून चालणार नाही. अशा घटना भविष्यात घडू नये आरोग्य यंत्रणांचे मनोबल ज्यामुळे खच्ची होईल अशी कोणतीही घटना घडू नये यासाठी प्रशासनाने अतिशय काळजीपूर्वक आणि डोळ्यात तेल घालून काम केले पाहिजे.

            कोरोनाच्या या लाटेत ऑक्सिजनचे किती महत्व आहे हे सांगण्याची गरज नाही. प्राणवायूच्या प्रत्येक कणासाठी आपण दिवसरात्र प्रयत्न करतोय. ऑक्सिजनची गळती कोणत्याही परिस्थितीत होऊ नये म्हणून आपण प्रत्येक बैठकांत सुचना दिल्या आहेत असे असताना हे कसे घडले  ते तातडीने तपासून जबाबदारी निश्चित करावी असे आपण मुख्य सचिवांना निर्देश दिले आहेत असेही मुख्यमंत्री म्हणतात.

            यापुढे प्रत्येक रुग्णालयांच्या ठिकाणी प्राणवायूच्या साठ्याची काळजी घेऊन त्याच्या सुयोग्य उपयोग व्हावा तसेच रुग्णांना प्राणवायू मिळण्यातल्या अडचणी तत्काळ दूर झाल्याच पाहिजेत असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

000


 

नाशिक वायुगळतीमुळे झालेल्या प्राणहानीबद्दल राज्यपालांना दुःख

            मुंबईदि. 21 : नाशिक येथे ऑक्सिजन टाकीतून प्राणवायू गळती होऊन झालेल्या दुर्घटनेत करोना रुग्णांच्या झालेल्या जीवितहानी बद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुःख व्यक्त केले आहे.

            नाशिक येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय येथे ऑक्सिजन टाकीतून गळती होऊन काही निरपराध करोना  रुग्ण दगावल्याचे समजून तीव्र दुःख झाले. या दुर्दैवी घटनेत प्राण गमावलेल्या रुग्णांच्या कुटुंबियांना आपल्या शोक संवेदना कळवतो व बाधित व्यक्तींना लवकर बरे वाटावे यासाठी प्रार्थना करतोअसे राज्यपालांनी आपल्या शोक संदेशामध्ये म्हटले आहे.





Breaking: ऑक्सिजन गळती होऊन 22 रुग्णांचा गेला जीव

Breaking: ऑक्सिजन गळती होऊन 22 रुग्णांचा गेला जीव

नाशिक ऑक्सिजन गळतीच्या घटनेत मृतांचा आकडा वाढला ... आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची माहिती...




नाशिक- झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीमुळे २२ जणांचा मृत्यू; पालकमंत्री छगन भुजबळ रुग्णालयात पोहोचले; दुर्घटनेचा आढावा घेण्याचं काम सुरू



नाशिक महापालिका रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीची दुर्घटना दुर्दैवी; मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांबद्दल सहसंवेदना..


राज्यातील सर्व रुग्णालयांमधील ऑक्सिजन पुरवठा सुरक्षित व सुरळीत ठेवण्याचे व रुग्णालयांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश


मुंबई, दि. २१ एप्रिल - नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती होऊन २२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असल्याचे सांगत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांबद्दल सहसंवेदना व्यक्त केल्या आहेत. 


राज्यातील डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ अशी संपूर्ण आरोग्य यंत्रणा रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी जोखीम पत्करुन कोरोना संकटाशी लढत असताना अशी दुर्घटना घडणे अत्यंत दुर्देवी आहे. या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींना निश्चित शिक्षा केली जाईल. यापुढे अशा प्रकारची कोणतीही दुर्घटना घडू नये याची काळजी घेतानाच, राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन पुरवठा सुरक्षित व सुरळीत सुरु राहील, याची दक्षता घेण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या. 


नाशिक महापालिकेच्या रुग्णालयातील दुर्घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांशी संपर्क साधून दुर्घटनेची माहिती घेतली व अन्य रुग्णांना इतर रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर आवश्यक उपचार करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. 


नाशिक दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अन्य रुग्णांलयांमधील ऑक्सिजन पुरवठा यंत्रणा तसेच रुग्णालयांच्या सुरक्षितता सुनिश्चित करण्यासंदर्भातील कार्यवाही तात्काळ केली जावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

गुरुवार, मार्च २५, २०२१

 नाशिक मेट्रो नियो प्रकल्पाला पीआयबीची (पब्लिक इनव्हेसमेंट बोर्ड) मंजुरी

नाशिक मेट्रो नियो प्रकल्पाला पीआयबीची (पब्लिक इनव्हेसमेंट बोर्ड) मंजुरी



अंतिम मंजुरी करिता केंद्र सरकारडे पाठविला प्रस्ताव 


 नाशिक ,२५ मार्च : नुकतेच लोकसभेच्या पटलावर घोषित झालेल्या नाशिक येथील मेट्रो नियो प्रकल्पाला पीआयबीची (पब्लिक इनव्हेसमेंट बोर्ड) मंजुरी मिळाली असूनसदर प्रस्ताव अंतिम मंजुरी करिता केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे. उल्लेखनीय आहे कि, ०१ फेब्रुवारी २०२१रोजी लोकसभेत केंद्रीय वित्त मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी नाशिक मेट्रो नियो करिता २०९२ कोटी रु. ची घोषणा केली होती ज्याला पीआयबीची देखील मंजुरी मिळाली आहे. नाशिक मेट्रो रेल प्रकल्पाला २८ ऑगस्ट २०१९ रोजी राज्य शासनाने मंजुरी प्रदान केली होती.    


३२ कि.मी. मार्गिकेवर २ कॉरिडॉर असतील व ३० मेट्रो स्थानकांचा समावेश असणार असून रु. २०९२ कोटी रुपयांची गुंतवणुक असणार आहे व सदर प्रकल्पा ४ वर्षात पूर्ण होईल. अत्याधुनिक आणि किफायतशीर मास ट्रांजिट सिस्टम ही टायर बेस्ड कोच असणार असून इलेक्ट्रिक ओव्हरहेड ट्रॅव्कशन धावणार आहे. टियर २/३ शहराकरिता अतिशय उपयुक्त वाहतुकीचे साधन आहे. मेट्रो नियो ही नाशिक शहरातील नागरिकांना आरामदायक, सुविधाजन,सुरक्षित आणि पर्यावरणास अनुकूल अशी सेवा सक्षम आहे.  केंद्रीय आवास आणि शहरी कार्य मंत्रालयाचे सचिव श्री. दुर्गा शंकर मिश्रा यांनी ट्विट करून नाशिक मेट्रो नियो प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या.   


 (नाशिक मेट्रो नियो प्रकल्प) :

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा मेट्रो द्वारे) मुंबई शहर वगळून उर्वरित महाराष्ट्रतील मेट्रो रेल प्रकल्पाची जबाबदारी महा मेट्रो ला देण्यात आली असून यामध्ये नाशिक शहराचा देखील समावेश होता. महा मेट्रोने नाशिक शहराकरिता मेट्रो नियो प्रकल्पाचे नियोजन केले, मेट्रो नियो प्रकल्पाची संकल्पना ही नवीन असून देशात पहिल्यांदा या प्रकारचा प्रकल्प नियोजित करण्यात आला आहे.  मेट्रो नियो हा प्रकल्प अतिशय आधुनिक असून नाशिक आणि तत्सम लोकसंख्या असलेल्या शहराकरीता उपयुक्त आहे. सर्व साधारण पणे २०- ३० लाख लोकसंख्या असलेल्या शहरांनकरता वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याकरता योग्य त्या उपायावर केंद्र सरकार विचार करत होती. अनेक पर्यायांचा विचार केल्यानंतर केंद्र सरकारने २१ ऑगस्ट २०१९ रोजी टायरवर धावणारी जलद गती सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाबंधी सर्व बाबींवर विचार करण्याकरता तसेच या बाबीत एक वाक्यता आणन्याकरता या समितीची स्थापना केली होती.महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापित केली त्याच अनुषंगाने ही मेट्रो नियो संकल्पनेची अंबलबजावणी करण्यात आली जे कि, संपूर्ण देशासाठी आदर्श,दिशादर्शक आणि परिवहन क्षेत्रात क्रांती घडविणारा प्रकल्प असेल.  

 

नाशिकच्या मेट्रो नियो प्रकल्पाचे ठरक वैशिष्ट्ये:


•         पहिला कॉरिडोर गंगापूर ते मुंबई नाका :

लांबी : १० कि.मी स्टेशन :  गंगापूर,जलापूर,गणपत नगर,काळे नगर,जेहाण सर्कल,थटे नगर, शिवाजी नगर,पंचवटी,सीबीएस आणि मुंबई नाका.

 

•         दुसरा कॉरिडोर गंगापूर ते नाशिक रोड :

लांबी : २२ कि.मी स्टेशन : ध्रुव नगर,श्रामिक नगर,महिंद्र,शनेश्वर नगर,सातपूर कॉलोनी,एमआयडीसी,एबीबी सर्कल,परिजात नगर,मिको सर्कल,सीबीएस,शारदा सर्कल,द्वारका सर्कल,गायत्री नगर,समता नगर,गांधी नगर,नेहरू नगर,दत्त मंदिर,नाशिक रोड तसेच सीबीएस हे दोन्ही मेट्रो कॉरीडोर करता इंटरचेंज स्टेशन असेल.

सोमवार, फेब्रुवारी १५, २०२१

मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या निषेधार्थ शंखनाद आंदोलन

मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या निषेधार्थ शंखनाद आंदोलन



मंत्री विजय वडेट्टीवार यांनी साधुंविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्याविरोधात रामकुंड नाशिक येथे भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीच्यावतीने शंखनाद आंदोलन केले. यावेळी आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष @AcharyaBhosale यांच्यासह प्रमुख साधुसंत उपस्थित होते.

साधू आणि संत यांच्यातील फरक सांगताना विजय वडेट्टीवार यांची जीभ घसरली. साधू आणि संत वेगळे असतात. साधूंवर विश्वास ठेऊ नका, साधू नालायक असतात, असं वादग्रस्त वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. आपल्या वक्तव्याचा व्हिडीओ वड्डेटीवार यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. विजय वड्डेट्टीवार यांच्यावर भाजप अध्यात्मित आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी  टीका केली आहे. साधूंची माफी मागावी अन्यथा परिणामांना सामोरं जाण्याचा इशाराही तुषार भोसले यांनी दिला आहे.


राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नुकतेच साधुंबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. या विषयी भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 11.00 वा रामकुंड, पंचवटी येथे साधु-संतांच्या नेतृत्वात शंखनाद आंदोलन संपन्न झाले. 
            यावेळी १००८ महामंडलेश्वर सोमेश्वरानंद स्वामी,अ.भा.आखाडा परिषदेचे महंत भक्तिचरणदास, महंत फलाहारी बाबा, निवृत्तीनाथ महाराज संस्थानचे ह.भ.प.संजय नाना धोंडगे, अनिकेत शास्त्री, ह.भ.प अर्जुन महाराज पाटील, जय बाबाजी परिवाराचे विष्णु महाराज, रमणगिरी महाराज, अश्विनीनाथ महाराज, सिताराम महाराज, अशोक गवळी, रामसिंग बावरी, सरचिटणीस सुनिल केदार,  अमित घुगे, तपोवन मंडल अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी,सिडको मंडल -2 अध्यक्ष अविनाश पाटील, मध्य मंडल अध्यक्ष देवदत्त जोशी, जुने नाशिक मंडल अध्यक्ष भास्कर घोडेकर, नगरसेवक योगेश हिरे, अजिंक्य साने, रुची कुंभारकर, सुरेश खेताडे, सोमनाथ बोडके, लक्ष्मीकांत पारनेरकर, सुनिल वाघ, उत्तमराव उगले, प्रतिक शुक्ल, विपुल मेहता, विजय बनछोडे,हर्षद वाघ, गणेश सानप, शिवम शिंपी आदींसह नाशिक महानगराच्या 10ही मंडलातून जास्त गर्दी होऊ नये म्हणून  प्रातिनिधीक स्वरुपात 40च्या आसपास पदाधिकारी कार्यकर्ते या आदोलनात उपस्थित होते.
             यावेळी बोलतांना आचार्य तुषार भोसले म्हणाले की, 
आपला सहकारी मंत्री साधुंना नालायक म्हणतो अशावेळी  हिंदुह्रदयसम्राटांचे सुपुत्र असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना झोप कशी लागते ? . जनाब उद्धव मिया ठाकरेंच्या मुघल विकास आघाडी सरकार चे मंत्रिमंडळ महिलांवर अत्याचार , हिंदु समाजाचा अपमान, मुलांना डांबून ठेवते, साधुंना शिव्या घालतात अशा रावणालाही लाजवेल अशा स्वैराचारी मुघल विकास आघाडी सरकारचे लवकरच रामकुंडात विसर्जन होऊन महाराष्ट्रात रामराज्य यावे याकरिता आज साधु-संतांनी शंखनाद केला आहे.

साधुंचा अपमान करण्याचा अधिकार कोणाला नाही.  विजय वडेट्टीवार हे मनोरुग्ण मंत्री आहेत. साधुंच्या वेशातल्या २-४ भोंदूंनी गैरवर्तन केले म्हणुन हिंदु समाजाच्या पवित्र आणि सर्वस्व त्याग करुन साधना करत असलेल्या साधु परंपरेला अशा शिव्या घालणे मंत्र्यांना शोभत नाही. जैन साधु परंपरेचा देखील हा अपमान आहे. हिंदू विरोधी अजेंडा हा काँग्रेस पक्षाचा आहेच. त्यामुळे त्यांच्या पोटातले आज ओठावर आले आहे.  वडेट्टीवार यांच्या साधुंबाबत केलेल्या वादगस्त वक्तव्याबद्दलच हे शंकानाद आंदोलन छेडण्यात आले आहे असे ते म्हणाले. यावेळी कार्यकत्यांनी आपल्या हातात “साधुंना नालायक म्हणतो वडेट्टीवार , उध्दवा अजब तुझे सरकार”,  "याजसाठी केला होता मुख्यमंत्री पदाचा अट्टहास? हिंदुंचा आणि साधुंचा करता येईल उपहास !” अशा प्रकारचे फलक घेतले होते व निषेध आंदोलन केले.
             मात्र आमचा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आहे, की हिंदु समाजाला हे दिवस दाखवण्यासाठी तुम्ही मुख्यमंत्री झालात का ? १५ डिसेंबर २०२० रोजी विधानसभेत मुख्यमंत्री म्हणाले होते की, "हा महाराष्ट्र साधु-संतांचा आहे आणि आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही". मग तुमचेच मंत्री आज साधुंना नालायक म्हणतात हे तुमच्या हिंदुत्वाच्या व्याख्येत बसते का ? तुमचे मंत्री महिलांवर अत्याचार करतात, शरजील सारखी विकृती इथे येऊन हिंदुंना शिव्या घालून जाते, आता तर तुमचे मंत्री च साधुंना शिव्या देतात. तुमचे असे मंत्रिमंडळ पाहून तर हे रावणाच्या मंत्री मंडळाला लाजवेल असे स्वैराचारी मंत्रिमंडळ आहे असेच म्हणावे लागेल. असे आचार्य तुषार भोसले म्हणाले.



शुक्रवार, जानेवारी २९, २०२१

#Election : बिनविरोध निवडून आलेल्या ग्रामपंचायतीची निवडणूकच रद्द

#Election : बिनविरोध निवडून आलेल्या ग्रामपंचायतीची निवडणूकच रद्द

www.kavyashilpdigital.com

नाशिक : येवला तालुक्यातील कातरणी ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया रद्द करत कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यामुळे बिनविरोध निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतीतील सदस्यांचे धाबे दणाणले आहेत. यापूर्वी दोन कोटी पाच लाख रुपयांच्या लिलाव प्रक्रियेनंतर संपूर्ण राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेली उमराणे ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे  



राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर आरक्षण सोडत प्रक्रिया जरी संपूर्ण झाली असेल. मात्र, येवला तालुक्यातील कातरणी येथील अकरा सदस्य ग्रामपंचायत बिनविरोध करत हनुमान मंदिरासाठी 11 ते 21 लाख रुपयांदरम्यान लिलावाची बोली लागल्याची ऑडिओ क्लिप तक्रारदाराने निवडणूक आयोगाकडे सादर केली.


निवडणूक आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपासाचे आदेश दिले. निवडणूक आयोगाला तपासादरम्यान तथ्य आढळून आल्याने निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, भारतीय दंड विधानाचे प्रकरण 9-अ नुसार, अथवा अन्य कायद्यातील तरतुदीनुसार संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत. या कारवाईचा अहवाल निवडणूक आयोगाला सादर करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत.

मोहन सोनवणे यांनी याप्रकरणाची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करत हा मोठा निर्णय घेतला. यामुळे बिनविरोध निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतीतील सदस्यांचे धाबे दणाणले आहेत


रविवार, जुलै १९, २०२०

संत नामदेव महाराज ६७० वा संजिवन समाधि सोहळा

संत नामदेव महाराज ६७० वा संजिवन समाधि सोहळा




येवला प्रतिनिधी,विजय खैरनार
येवला: येथील श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांचा संजिवन समाधि सोहळा शिंपी समाज बांधवांच्या वतीने सुरक्षित अंतर ठेवून मोजक्या लोकांत सर्व विधीवत पूजा करण्यात आली. पहाटे श्रीं च्या मुर्ती स अभिषेक घालण्यात आला. आरती नैवेद्य तसेच संत नामदेव महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
       यावेळी कोरोना रोगाचे सावट असतांना योग्य ती खबरदारी घेण्यात आली.
शिंपी समाज येवला चे अध्यक्ष आरवींद तुपसाखरे, उपाध्यक्ष राजु गणोरे, सचिव कैलास बकरे, सुहास भांबारे, सोमनाथ हाबडे, देविदास भांबारे, ज्ञानेश टिभे, मंगेश खंदारे, नंदलाल लचके, चंंदुकाका भांबारे संतोष टिभे,नंदलाल भांबारे,दत्तात्रय लचके  शामराव गायकवाड,  शामबाई लचके, सौ. सुशिला टिभे शकुबाई लचके आदींनी संत नामदेव महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आले.
   दरवर्षी हा उत्सव सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो.श्री नामदेव विठ्ठल मंदिरात सात दिवस सप्ताह बसविण्यात येऊन या दरम्यान न्यानेशवरी पारायण, हरिपाठ,महिलांचे भजन,प्रवचन,कीर्तन, त्या नंतर नामदेव महाराज यांचा पालखी सोहळा,सवाद्य मिरवणूक काढण्यात येते तसेच दही  हंडीचा उत्सव आणि महा प्रसादाचे आयोजन केले जाते मात्र यंदा कोरोना मुळे मोजक्या समाज बांधव मध्ये हा कार्यक्रम करण्यात आला.  यावेळी संत नामदेव महाराजांचे पसायदान व भक्तिभावाने सायंकाळी ठिक ६:०० वाजता पारंपरिक पद्धतीने सेवेत खंड पडू नये म्हणून मंदिरासमोर पाच पाऊली पालखी सोहळा पार पडला.

रविवार, जुलै १२, २०२०

हरणाचा चारा पाण्याचा प्रश्न सुटला

हरणाचा चारा पाण्याचा प्रश्न सुटला




येवला प्रतिनिधी , विजय खैरनार
येवला तालुक्यातील राजापूर व परिसरात हरीण काळवीट यांची संख्या हि मोठ्याप्रमाणावर आहे पावसाळा म्हणजे एक जणू जिकडे-तिकडे हिरवेगार असे निसर्गाने दिलेली एक देणगी आहे. हे सध्या निसर्गाने एक किमया केली न्यारी असे म्हणणे वावगे ठरणार नाही राजापूर ममदापुर राखीव वन क्षेत्रांमध्ये हिरवळ एक मनाला भुरळ घातली आहे असे चित्र सध्या राजापूर  ममदापूर राखीव वन संवर्धनामध्ये आहे.  हरीण काळवीट यांची संख्याही मोठ्या प्रमाणावर असून हरीण काळवीट हे निसर्गरम्य परिसरात हिरवळीने नटलेल्या जंगलात फिरताना दिसत आहे. मुक्त संचार करीत असून हिरवे हिरवे गार गवत व जिकडे तिकडे पाण्याने तुंबलेले  डूबके अशी चित्र राजापूर ममदापुर राखीव वन संवर्धनामध्ये पाहायला मिळत आहे .मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी हरीण काळवीट यांना खाण्यासाठी चांगल्या प्रकारे गवत असून हरीण मोठ्या आनंदात गवत खातात व तेथे मनमुराद असा आनंद घेताना दिसत आहे यावर्षी चांगल्या प्रकारे वरुणराजाने हजेरी लावली असल्याने हरणांना आणि काळवीटाना अन्न व  पाण्याचा प्रश्न हा मिटला आहे राखीव वन संवर्धन झाल्यामुळे हरणांना चांगल्याप्रकारे गवत खाण्यासाठी उपलब्ध झाले असून पिण्यासाठी डोंगरात चांगले पाणी उपलब्ध आहे राजापूर ममदापुर राखीव वनसंवर्धनला मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्र लाभलेले आहे .परिसरात राजापूर ,ममदापूर ,सोमठाण जोश ,खरवंडी, देवदरी, कोळगाव, आधी गावांचा समावेश होतो परिसरातील गावातील  मिळून साडेसात हजार हेक्टर क्षेत्र  जमीन आहे  यापैकी साडेपाच हजार हेक्टर क्षेत्रावर  ममदापूर राखीव हा प्रकल्प तयार केलेला आहे प्रत्येक गावात पशुपक्ष्यांच्या संरक्षणासाठी पथके असून राजापूर ममदापुर राखीव वनसंवर्धनात मनोरे उभारले आहे. पर्यावरण व मनमोहक असे लांब जंगल आहे. हरिण काळवीट त्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे राजापूर व परिसरात हरणांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर असल्याने वन विभागाने विविध ठिकाणी पाणवठे तयार केलेले असून यावर्षी पाऊस चांगला असल्याने प्रत्येक पाणवठयामध्ये चांगल्या प्रकारे पाणी उपलब्ध आहे व राजापूर ममदापुर वन संवर्धनामध्ये हिरवे हिरवेगार गवत खाण्यासाठी उपलब्ध असून वनविभागाचे कर्मचारी योग्यप्रकारे विभागात वेळोवेळी लक्ष देत आहेत व जंगलात हरणांना पोटाची खळगी भरण्यासाठी हिरवे हिरवे गार गवत खाताना व जंगलात आनंद लुटताना दिसत आहेत हरीण काळवीट हे निसर्गरम्य परिसर स्वच्छ मनमोहक दिसणारी सुंदर अशी हिरवेगार रानात त्यांची झुंजीचा आनंद लुटताना दिसत आहे. डोळ्याचे पारणे फिटेल असे गोजिरवाण्ये जंगल राजापूर ममदापूर वन संवर्धन मध्ये पाहण्यासाठी मिळते आहे.

शनिवार, जून २७, २०२०

दुधाला भाव मिळत नसल्याने दुग्धव्यवसाय संकटात; शेतकरी चिंतेत milk nashik

दुधाला भाव मिळत नसल्याने दुग्धव्यवसाय संकटात; शेतकरी चिंतेत milk nashik




येवला प्रतिनिधी/विजय खैरनार
येवला, ता.२७ : नैसर्गिक आपत्ती मुळे शेती व्यावसाय तोट्यात असल्याने शेतकरी​ शेतीला जोडधंदा म्हणून दुध व्यवसाय करतात.तसेच तरुणांना नौकरी मिळत नसल्याने ग्रामीण भागातील अनेक तरुण दुग्ध व्यवसायाकडे वळले आहे.त्यामुळे दुग्ध व्यवसाय ग्रामीण अर्थव्यवस्थेतील कणा बनला आहे.मात्र,दुग्धव्यवसायात उत्पादन खर्चही निघत नसल्याने आता हाच दुग्ध व्यवसाय अडचणीत आला आहे.त्यामुळे सरकार ने आता यात लक्ष घावून दुध उत्पादक शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढावा ,अशी मागणी दुग्धव्यवसायिक शेतकर्‍यांकडून होत आहे.
​ ​ ​ ​ ​ ​ कोरोणामुळे शेतकर्‍याच्या कोणत्याही शेतमालास बाजारभाव मिळत नसल्याने अगोदरच चिंतेत असलेल्या शेतकऱ्याला जोडधंदा असलेल्या दूध व्यवसायाला ही बाजारभाव नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. राज्यासह संपूर्ण देशात कोरोणामुळे लॉक डाऊन करण्यात आला होता.लॉक डाऊन होण्याआधी शेतकर्यांच्या दुधाला साधारण तीस ते पस्तीस रुपये भाव मिळत होता.परंतु आता शेतकर्याला दुधाला १९ ते २० रुपये प्रतिलिटर इतका नीचांकी भाव मिळत आहेत. या रक्कमेतून मूलभूत खर्चही भागविणे शेतकर्‍यांना जिकरीचे झाले आहे.
​ ​ ​ ​ ​ ​ ​ जनावरांना लागणाऱ्या खुराकाच्या वाढलेल्या किंमती आणि चार्‍याचा विचार केला तर शेतकऱ्यांना एक लिटर दूध उत्पादनासाठी तब्बल २५ ते ३० रुपयां पर्यंत खर्च येतो. मात्र हेच दूध सध्या २० रुपये लिटर ने विकले जात असल्याने शेतकऱ्यांना लिटरमागे तब्बल दहा रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.त्यामुळे शासनाने त्वरित लक्ष्य घालून शेतकर्‍यांना या संकटातून बाहेर काढावे अशी मागणी येथील दुग्धव्यवसायिक करत आहे.



🗯
​ ​ ​" पाहतांना जास्त जनावर, मोठा गोठा दिसतं असला तरी याच्या मागील मेहनत, खर्च हाही मोठा असतो.जनावरांचे काम करण्यासाठी वेगळा मजूर कामावर ठेवणं शक्य होत नाही त्यामुळे जनावरांना चारापाणी देणे, जनावरांची काळजी, गोठ्याची स्वच्छ्ता करणे, दूध काढणे, काढलेले दूध विक्रीसाठी घेऊन जाणे ही सगळी कामे स्व:ताला व घरातील माणसांनाच करावी लागतात. याचा कोणताही हिशोब किंवा वाटा कोठेही गणला जात नाही.येवढी मेहनत करुन ही पाण्या पेक्ष्या कमी भावात दूध विकावे लागत आहे".
- नानासाहेब आहेर दूध व्यवसायिक , गारखेडा.

गुरुवार, जून २५, २०२०

एक हजार पंचवीस बालकांना मिळणार लाभ

एक हजार पंचवीस बालकांना मिळणार लाभ

येवला पंचायत समिती सभापती प्रवीण गायकवाड यांच्याकडून एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत बेबी केअर किट चे वितरण..!




येवला प्रतिनिधी/विजय खैरनार
येवला: येथील पंचायत समिती सभापती प्रवीण गायकवाड यांच्याकडून एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत बेबी केअर किट चे वाटप होणार आहे 1025 बालकांना मिळणार आहे लाभ येवला पंचायत समिती च्या वतीने आज एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प एक व दोन अंतर्गत तालुक्यात एकूण 281 अंगणवाडी केंद्र मध्ये शासनाने ग्रामीण भागातील जन्मजात बालकांचे जंतु संसर्गामुळे होणारे आजार व बालमृत्यू टाळण्यासाठी दवाखान्यात बाळंत होणाऱ्या नवजात बालकांसाठी बेबी केअर कीट वाटपाची योजना सुरु केली आहे एका बेबी केअर किट ची किंमत 1996 रुपया असून यामध्ये सतरा उपयोगी वस्तू आहेत यामध्ये लहान बाळांचे कपडे बेबी टावेल लंगोट हातमोजे पायमोजे छोटी गादी मच्छरदाणी छोटे ब्लॅंकेट प्लास्टिकच चटाई मालिश तेल लोकरीचे उपदार कापड बॉडी वॉश नॅपकिन हात धुण्याचे लिक्विड शाम्पू खुळखुळा नेलकटर थर्मामीटर पिन हे सर्व साहित्य बेबी किट मध्ये शासनाकडून मिळाला आहे या साहित्याचे वाटप सभापती प्रवीण गायकवाड यांनी थेट अंगणवाडी मध्ये जाऊन लाभार्थ्यांना दिले प्राथमिक स्वरूपात कोटमगाव खुर्द बल्हेगाव बोकटे येथे अंगणवाडीमध्ये जाऊ वाटप करण्यात आले आहे याप्रसंगी माजी सभापती विद्यमान सदस्य नम्रता ताई जगताप बालविकास प्रकल्प अधिकारी भगवान गर्जे अधिकारी अनिल जऱ्हाड विजय जगताप मुख्यकार्यकारी सेविका सरपंच नामदेव माळी नाना लहरे भाऊसाहेब माळी अजय मगर मुख्य सेविका निकुंभ मॅडम ग्रामसेवक रोकडे बाबासाहेब दाभाडे भूषण दाभाडे दाभाडे बाळासाहेब येथे बल्हेगाव येथे सुनिता किरण मोरे सुभाष सोमासे दीपक विधाते गंगाधर मोरे विजय जगताप अंगणवाडी सेविका गीता विधाते मोनिका सोनवणे अवंतिका जगताप इत्यादी मान्यवर उपस्थित होते ह्या कीड मुळे गोरगरीब मुलांना आधार मिळणार आहे व सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती हे सर्व वस्तू घेऊ शकत नाही त्यामुळे शासनाच्या या किटचा ग्रामीण भागांमध्ये बाळाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी मोठी मदत होणार आहे दरवर्षी हे किट मिळण्यासाठी शासनाकडे मागणी करणार आहे असे ही पंचायत समिती सभापती यांनी सांगितले आहे


रविवार, जून १४, २०२०

पेट्रोल पंपावर सुमारे दोन लक्ष किंमतीच्या डिझेलवर चोरट्यांचा डल्ला!

पेट्रोल पंपावर सुमारे दोन लक्ष किंमतीच्या डिझेलवर चोरट्यांचा डल्ला!

येवला तालुक्यातील गवंडगाव इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर सुमारे दोन लक्ष दहा हजार रुपये किंमतीच्या डिझेलवर अज्ञात चोरट्यांचा डल्ला!





येवला प्रतिनिधी/विजय खैरनार
येवला तालुक्यातील गवंडगांव येथील इंडियन ऑइल पेट्रोलियम कार्पोरेशनच्या सी,राज पेट्रोलियमच्या भूमिगत साठवण टाकीतून शनिवारी(दि.१३)च्या अज्ञात चोरट्यांनी वीज नसल्याने अंधाराचा फायदा घेत व सीसीटीव्ही कॅमेरा चुकवत मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दोन लाख दहा हजार रुपये किंमतीचे सुमारे तीन हजार लिटर डिझेल(इंधन) चोरी झाल्याची घटना घडली असून रविवारी (दि.१४) सदर घटनेची तक्रार सी राज पेट्रोलियम गवंडगांव(ता.येवला)
येथील मालक मोहम्मद सिराजुद्दीन सिद्दीकी यांनी येवला ग्रामीण पोलीस ठाण्यास दिली असून पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक
श्रीराम शिंदे यांनी सदर घटनेचा पंचनामा घटनास्थळी केला असून रात्री उशीरपर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते दरम्यान याच प्रकारची घटना नांदगाव(वैजापूर)गवंडगांव पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या राधिका पेट्रोलियम पंपावर घडली असल्याची माहिती गवंडगांव पोलीस पाटील रामेश्वर अशोक भागवत यांनी दिली आहे यावर दोन्ही गुन्ह्यामध्ये
साम्य असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे

सोमवार, मे १८, २०२०

ग्रामपंचायत सदस्यांना मुदतवाढ देण्यात यावी

ग्रामपंचायत सदस्यांना मुदतवाढ देण्यात यावी





येवला पंचायत समिती राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते मोहन शेलार यांनी निवेदनाद्वारे केली मागणी..!

येवला प्रतिनिधी/ विजय खैरनार
येवला, ता. १८ : तालुक्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतिवर प्रशासक नेमण्यात आले असून या ग्रामपंचायत सदस्यांना मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी येवला पंचायत समिती राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते मोहन शेलार यांनी निवेदनाद्वारे केली आहे
येवला पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आपल्या आदेशानुसार तालुक्यातील मुदत संपलेल्या २५ ग्रामपंचायतीत प्रशासक नेमणूक करण्यात आली आहे येवला पंचायत समितीत विस्तार अधिकारी अधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त असल्याने ग्रामपंचायत कारभार पाहणे प्रशासकांना जिकरीचे होणार आहे त्याचप्रमाणे तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीची मुदत जुलै ते ऑगस्ट २०२० दरम्यान संपत आहे त्या ठिकाणी प्रशासक नियुक्त केल्यास तालुक्यातील ग्रामपंचायतीचे कामकाज ठप्प होणार आहे तसेच प्रशासकाना बंधने असल्याने विकास कामे करणे शक्य होणार नाही ग्रामपंचायत मध्ये आर्थिक अफरातफर अनियमितता झाल्यास सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांनी राजीनामे दिल्यास अडचण निर्माण झाली तर ९० दिवस प्रशासक नियुक्त करून त्या कालावधीत नव्याने निवडणूक घेऊन लोकप्रतिनिधीकडे कारभार सोपवला जातो कोरोनाच्या संकट समयी निवडणुका कधी होतील याबाबत अनिश्चितता आहे त्यामुळे ९० दिवसापेक्षा जास्त काळ प्रशासक ठेवन्यामुळे कायदेशीर प्रश्न उभा रहाणार आहे त्यामुळे सद्यस्थितीत असलेल्या ग्रामपंचायत कार्यकारिणीस नव्याने निवडणूक होईपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ग्रामविकास मंत्री व पालकमंत्री छगन भुजबळ यांनाही देण्यात आल्या आहेत

मंगळवार, मे १२, २०२०

देवळाणे येथे रेशन दुकान व लग्नमंडपाच्या गोडाऊला भीषण आग; लाखोंचे नुकसान

देवळाणे येथे रेशन दुकान व लग्नमंडपाच्या गोडाऊला भीषण आग; लाखोंचे नुकसान






प्रतिनिधी , विजय खैरनार
येवला : देवळाणे येथे रात्री ३ वाजेच्या सुमारास बी.आर.काळे यांच्या नावावर असलेले देवळाणे-तिळवणी रोड लगतचे स्वस्त धान्य दुकान नंबर ८५ ,तसेच शेजारील गाळ्यातील नवनाथ गांगुर्डे यांच्या गोडाऊनमधील लग्नसमारंभाला वापरले जाणारे मंडपचे साहित्य जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे.
भीषण आग लागल्याने रेशन दुकानातील गहू , तांदूळ साखर,इलेक्ट्रॉनिक काटे टेबल, दप्तर, गल्ल्यातील चार हजाराची रोकड,दुकानाचे पत्रे,शटर तसेच धन्य दुकाना शेजारील गाळ्यातील लग्न समारंभासाठी लागणारे मंडप व्यवसायाचे साठवलेले साहित्य त्यात जनरेटर, शामियाण्याचे छत, पाईप, छत, पडदे, साउंड सिस्टीम, गाध्या चटई,प्लास्टिक ताडपत्र्या, खुर्च्या, या सर्व महत्त्वाची वस्तू जळून खाक झाल्या आहे यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाला बोलावण्यात आले होते. परंतु आग इतकी भीषण होती की यामध्ये दोनही दुकानांच्या सर्व वस्तू जळून खाक झाल्या आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत पंचनामा देखील केला आहे.
कातरणी  येथे PPE  किट ,मास्क , Sanitizer,  जंतु नाशक साबणचे वाटप

कातरणी येथे PPE किट ,मास्क , Sanitizer, जंतु नाशक साबणचे वाटप

जे के लोढा ज्वेलर्स मनमाड यांच्या तर्फे उपक्रम 





प्रतिनिधी/विजय खैरनार
येवला : मनमाड येथील प्रसिद्ध ज्वेलर्स
जे. के. लोढा ज्वेलर्स यांच्यातर्फे मातृदीना निमित्त येवला तालुक्यातील कातरणी येथे स्वर्गीय सुशिलाबाई जवेरीलाल लोढा यांच्या स्मरणार्थ जे के लोढा ज्वेलर्स मनमाड चे संचालक सुरेश जवेरीलाल लोढा व नील सुरेश लोढा यांच्या हस्ते
पी.पी.ई , किट ,मास्क ,सॅनिटायझर जंतु नाशक साबण चे वाटप करण्यात आले. लोढा परिवारचे कातरणी हे मुळ गाव आहे. व्यवसाय निमित्त लोढा कुटुंब मनमाड व नासिक येथे स्थायिक झाले आहे. परंतु या लोढा परिवाराला आपले मूळ गाव कातरणी चा विसर पडला नाही. त्यामुळे आपल्या आईची स्मृती ठेवून वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुमन अशोकराव कदम, ग्रामसेवक संजय मनोहर व्यवहारे ,माजी सरपंच लक्ष्मण गंगाधर कदम उपस्थित होते. अशोक कदम व ग्रामसेवक संजय मनोहर व्यवहारे यांनी श्रीफळ देऊन सुरेश लोढा व नील सुरेश लोढा यांचा सत्कार केला. याप्रसंगी ग्रामसेवक संजय मनोहर व्यवहारे यांनी आशा सेविका करता PPE किट चा प्रस्ताव मांडला, त्वरित नील सुरेश लोढा यांनी मागणी  मान्य करून एक- दोन दिवसात  पाठवतो असे आश्वासन दिले. सुरेश लोढा नी  कोरूना  ह्या विषाणू बाबत काय काळजी घ्यायची याचे उपस्थितांना मार्गदर्शन केले .याप्रसंगी दशरथ कदम, आप्पासाहेब सोनवणे, कैलास कदम, संपत कदम, सिताराम गांगुर्डे ,विठ्ठल गवळी, दशरथ कदम ,पुंडलिक सोनवणे, दगु सोनवणे, खंडू आहिरे ,संजय कदम व पंचक्रोशीतील बरीच मंडळी सोशल distance ठेवून  उपस्थित होते व या कार्यक्रमाने सगळी मंडळी भारावून गेली. ग्रामपंचायत च्या वतीने अशोक कदम यांनी आभार मानले.

शनिवार, मे ०९, २०२०

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर निघू नये

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर निघू नये


सामाजिक कार्यकर्ते इंजि. विजय खैरनार यांचे आवाहन!


येवला : सध्या कोरोना व्हायरसचया भितीने सर्व  लाॅकडाऊन असल्याने नागरिकांनी विनाकारण कोणी घराबाहेर पडू नये असे आव्हान सामाजिक कार्यकर्ते विजय खैरनार यांनी केले आहे. सहकार्य करा कोरोना व्हायवरसाला जर हरवायाचे असेल तर घरी रहा हेच एक मात्र उपाय आहे असे आहे.आज देशात कोरोना व्हायरस सारखा भयंकर रोग पसरत आहे त्यामुळे सपूर्ण देशात लाॅकडाऊन करण्यात आले आहेत या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर निघू नये कोरोना व्हायरसला जर हरवायाचे असेल तर घरी रहा हेच एक मात्र उपाय आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपण घरीच थांबावे कोणीही बाहेर फिरू नये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण सर्वानी विचार करून घरी थांबून यासाठी प्रशासनाच्या सुचनाचे पालन करावे आपण व आपल्या घरातील प्रत्येकाला बाहेर जाऊ देऊ नका स्वत: बरोबर आपण आपल्या परिवाराची सुरक्षितेची काळजी घेऊन प्रशासनला सहकार्य करावे परिसरातील गावा गावात बाहेरगाव वरून नागरिक आले आहेत त्यांनी तपासणी करून द्यावी व कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणीही घराबाहेर निघू नये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव होऊ नाही म्हणून नागरिकांनी घराबाहेर निघू नये त्यामुळे नागरिकांनी सरकारला सहकार्य करून कोरोना रोखण्यासाठी घरातच राहावे इतर गावातील लोकांना आपल्या गावात येऊ देऊ नका तसेच आपण देखील घर सोडू नका घरात राहा काळजी घ्या आपण घरी सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित असे आव्हान सामाजिक कार्यकर्ते इंजि.विजय खैरनार यांनी नागरिकांना केले आहे.

शुक्रवार, मे ०८, २०२०

विंचूरला पुन्हा दोन कोरोना पॉझिटिव्ह

विंचूरला पुन्हा दोन कोरोना पॉझिटिव्ह



विंचुर ता.०८ येथील कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्याच्या घरातील दोन सदस्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनासह ग्रामस्थांची चिंता वाढली आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
     गेल्या आठवड्यात येथील रहिवासी व मालेगाव येथे पोलिस खात्यात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. रिपोर्ट येण्यापूर्वी सदर इसमाचा विंचूर गावातील इतर नागरिकांशी संपर्क आला होता. तपासणी अहवालात पोलीस कर्मचाऱ्यास कोरोनाची लागण झाल्याचे समजताच वरिष्ठ पातळीवरून शासकीय यंत्रणा तत्काळ कार्यान्वित झाली. संबंधिताच्या कुटुंबातील पत्नी, दोन मुले, व दोन मजूर यांचे येवला येथील कोविड १९ कक्षात विलगीकरण करण्यात आले. तसेच संबंधिताच्या संपर्कातील ४० जणांना येथील कर्मवीर विद्यालयात व काहींना होम क्वारंटाईन करण्यात आले. येथील विद्यालयात विलगीकरण करण्यात आलेल्यांपैकी हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील ११ जणांना मंगळवारी पिंपळगाव येथे हलविण्यात आले होते.त्यांचे स्वॅबचे नमुने तपासणीस पाठवून पिंपळगाव येथेच विलीनीकरण कक्षात ठेवण्यात आले होते.त्या सर्वांचे गुरुवारी अकरा रिपोर्ट निगेटिव्ह आल्य़ाने विंचूरकरांनी सुटकेचा श्वास सोडला. मात्र शुक्रवारी सकाळी येवला येथे त्याच्या कुटुंबांतील त्याची पत्नी वय ३७ व मुलगा वय १९ हे दोन पॉझिटिव्ह आले तर एक मुलगा व दोन मजुर असे ३ रीपोर्ट निगेटिव्ह आल्याने विंचूर येथील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता तीन वर गेली आहे.त्यामुळे काही दिवसापुर्वी १० मे पर्यंत जाहिर केलेल्या कंन्टेनमेंट झोनच्या कालावधीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


चीन ते विंचूर.. 
कोरोनाचा प्रवास कसा झाला ?
डिसेंबर पासून चीनमध्ये धुमाकूळ घालणा-या कोरोनाचा आजाराचा विंचूर प्रवास धक्कादायकच म्हणावा लागेल. लाँकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून प्रशासनाकडून कठोर कारवाई/उपाययोजना करत विंचूरकरांना या आजारापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. लासलगाव जवळ जिल्ह्यातला पहिला रुग्ण आढळल्याने शासकीय यंत्रणेसह काही ग्रामपालिका सदस्यांनी जीवाची पर्वा न करता गावात खबरदारीच्या उपाययोजना केल्या. दिवसागणिक मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण वाढणाऱ्या मालेगाव शहरात सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्याचा संपर्क विंचूरशी झाला अन विंचूर नगरीत य़ा आजाराने प्रवेश केला. कोरोनाला रोखण्यासाठी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेऊन खबरदारी घेतल्यास गावातील सर्व कोरोनाबाधित रुग्ण ठणठणीत होतील.