Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

धुळे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
धुळे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, मे ३१, २०२१

दारूबंदी उठविली; झळकले निषेधाचे फलक

दारूबंदी उठविली; झळकले निषेधाचे फलक



चंद्रपूरमध्ये महिलांनी मोठ्या लढ्यानंतर दारूबंदी करण्यात यश मिळविले होते. परंतु राज्य सरकारने चंद्रपूर येथील दारू बंदी उठविल्याचे पडसाद धुळ्यात देखील उमटताना दिसून येत आहेत. राज्यातील चंद्रपूर येथे असलेली दारूबंदी राज्य सरकारने उठवल्यानंतर राज्य सरकारचा निषेध करीत धुळ्यातील संपूर्ण महाराष्ट्र दारूबंदी महिला युवा मोर्चा तर्फे राज्य सरकारचा निषेध करण्यात आला आहे. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर महिला कार्यकर्त्या व पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारच्या निषेधाचे फलक झळकवत राज्य सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी केली आहे.

शुक्रवार, जानेवारी ३१, २०२०

विहीर अनुदानासाठी शेतकऱ्यांना लुटले

विहीर अनुदानासाठी शेतकऱ्यांना लुटले

ग्राम रोजगारसेवक तुषार भामरेचे कारस्थान

धुळे/ प्रतिनिधी
शासनाने मागेल त्यांना शेततळे मागेल त्यांला सिंचन विहीर योजना अंमलात आणली परंतु ह्या योजनेचा देखील फज्जा च झाला शेतकरी राजाला आपल्या मंजूर झालेल्या विहिरीचे अनुदान मिळवण्यासाठी ग्राम रोजगार सेवकाने मागितलेले पैसे द्यावे लागतात हा प्रकार उघडकीस आला असून ह्याबाबत केंद्रीय समिती लक्ष घालणार असल्याची माहिती आमच्या सूत्रांकडून मिळाली.
सदर प्रकरण धुळे येथील मेहेरगाव गावातील असून नुकतीच त्या विषयी तक्रार नागरिक व शेतकरी ह्यानि केली असून लवकरच सदर ग्रामरोजगार सेवकावर कार्यवाही करण्यात येणार आहे तसेच शेतकरी नागरिकांचे पैसे परत मिळवून देण्यात येतील सदर तुषार भामरे ह्यांनी विहीर अनुदान साठी प्रत्येक शेतकऱ्यांनकडून ६० ते ७० हजार रुपये घेतले असल्याची तक्रार असल्याचे सांगण्यात आले आहे. सदर प्रकरण केंद्रीय भ्रष्टाचार विरोधी आयोग लक्ष घालणार असून सखोल चौकशी सुरू करण्यात येईल असेही ह्यावेळी सांगण्यात आले.

शनिवार, सप्टेंबर १४, २०१९

जैन समाजाला तब्बल सात वर्षांनी मिळाला अध्यक्ष

जैन समाजाला तब्बल सात वर्षांनी मिळाला अध्यक्ष



शिरपूर येथे समाजबांधवांकडून नवनिर्वाचित संघपती चा सत्कार

ओसवाल जैन समाजा च्या अध्यक्ष पदावर सुवालाल ललवाणी (बबनशेठ) यांची नियुक्ती
 
खबरबात / धुळे, शिरपूर
___________________
    गणेश जैन

शिरपूर : शिरपूर शहरातील ओसवाल जैन समाजाचे तत्कालीन संघपती *ताराचंद डागा* यांच्या निधनानंतर  समाजाचे अध्यक्ष पद साधारणपणे सात ते साडेसात वर्षांपासून रिक्त होते तत्पूर्वी येथील तरुणांनी व जेष्ठमंडळींनी विविध प्रकारच्या संप्रदायातील चार्तुमास आजपावेतो यशस्वी रित्या पार पाडले  व शहरातील प्रसिद्ध व्यापारी धनराज बाफना यांची कन्या डॉ. प्राची बाफना तसेच हंसराज बुरड यांची नात व मुकेश बुरड यांची जुळवा मुली स्नेहा व स्मिता बुरड यांच्यासह बाफना यांनी बालब्रम्हचारीतच संसाराला सोडून जैन धर्माच्या साध्वी पणाचे व्रत धारण केले  त्या तीघी मुली संसारा पासून आलिप्त झाल्यात तीघी मुली उच्चशिक्षित असून देखील त्यांनी अल्पवयातच संसाराचा मोह सोडून जिनशासनाच्या स्वाधीन झाल्या शहरातील भगवती दिक्षा सोहळा सह बाहेरील दोन दिक्षार्थींचा कार्यक्रमाचा अवसर ही शिरपूर श्रीसंघाला मिळाल्याचा आनंद द्विगुणित आहे याकामी बाहेरून हजारो भाविकांची उपस्थिती मोठ्या संख्येने राहायाची त्यांच्या राहण्यापासून तर अनेक सुविधा येथील तरुणांनी करून दाखवली  समाजा अध्यक्ष नसतांना  देखील समाजाने मोठ्या उत्साहात अनेक मोठमोठे कार्य व विविध संप्रदायाचे चातुर्मास पार पाडले पण समाजामध्ये कर्तबगार व्यक्ती किंवा अध्यक्ष नसल्याची खंत शहरातील जैन बांधवांसह परजिल्ह्यातील समाजबांधवांना देखील तेवढी च वाटत होती अनेकदा समाजाच्या नुतन जैन स्थानकात बैठका झाल्यात विविध विषयांवर समाजबांधवांच्या चर्चा रंगायच्या परंतु आपल्या समाजात मुख्य मालक नसल्याचे कुणाच्या ही तोंडातून शब्द निघत नव्हते बहुतेक जण तोंडात मुंग टाकून गप्प बसल्याचे दिसत होते 
चातुर्मासात बाहेर गावी संताच्या दर्शनाला जावे लागते त्यावेळी स्थानिक लोक बाहेरून आलेल्या अध्यक्षा चे सत्कारासाठी नाव घेतली जातात परंतु समाजात *सुवालालजी ललवाणी* हे जेष्ठ व सतत समाजकार्यात अग्रेसर असल्याने त्यांचे नाव सांगितले जात होते पण ते आधिक्रुत अध्यक्ष नसल्याचे शहरातील समाजबांधवांना यागोष्टीची कल्पना होती 
 गेल्या सात ते साडेसात वर्षापासून समाजात अध्यक्षाची का ? म्हणून नेमणूक केली जायायची नाही याची पुर्व कल्पना येथील समाज बांधवांनाच होती 
  नुतन जैन स्थानकात समाजाची महत्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली सदर बैठकीत २०२० चा चातुर्मास विषयावर चर्चा रंगण्या पुर्वी च एका तरुणाला समाजात अनेक वर्षापासून अध्यक्ष नसल्याची खंत वाटत असल्याने बैठकीत सचिन बागरेचा हा तरुण मनोगत व्यक्त करीत असतांना चातुर्मास मांगण्यापुर्वी आपल्या श्रीसंघात अध्यक्ष नसल्याची समज बैठकीत उपस्थितीतांना दिली कुठल्याही संप्रदायाचे चातुर्मास मांगितल्यावर तुमच्या श्रीसंघात अध्यक्ष कोण असे महात्मा व अनेक महानुभव प्रश्न करीत असतात अशा वेळी तोंडातून उत्तर काय देणे हे कळत नाही तरी आपण श्रीसंघात अध्यक्ष म्हणून *सुवालालजी ललवाणी* यांचे नाव बागरेचा या युवकाने सुचविले यावेळी उपस्थित समाजबांधवांच्या  एकमताने ललवाणी यांना संघपती पदासाठी नियुक्ती करण्याचा ठराव पास झाला याप्रसंगी साधुमार्गी संप्रदायाचे अध्यक्ष *विजय बाफना* म्हणाले की अध्यक्ष पदाची निवड किती वर्षाकरिता केली जाते आहे यावर अध्यक्ष पद हे १५ महिन्या करिता ठेवावे व ज्या संप्रदायाचा चातुर्मास असेल त्यावेळी त्या चातुर्मासात त्या संप्रदायाचा अध्यक्ष राहील असे मत बाफना यांनी मांडले याबाबत उपस्थित समाजबांधवांनी सहमत दर्शविल्याचे समजले अध्यक्ष पदावर *सुवालालजी ललवाणी* यांची १५ महिन्याकरिता अध्यक्ष पदासाठी नियुक्ती झाल्यावर सोशलमिडीयाच्या माध्यमातून खांदेशभरातून समाजबांधवांनी ललवाणी यांना शुभेच्छा दिल्या जात होत्या व त्यांच्या नियुक्ती ची चर्चा धुळे जिल्हा सह खांदेशात रंगत असल्याचे समाचार हाती येत आहेत त्याचप्रमाणे शिरपूर येथील समाजबांधवांनी त्यांचा शाल , श्रीफळ , पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला

शनिवार, ऑगस्ट ३१, २०१९

बळसाणे येथील जैन मंदिरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

बळसाणे येथील जैन मंदिरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

महापर्युषण पर्वाला सोमवारपासून सुरुवात 




 गणेश जैन / धुळे
बळसाणे : जैन धर्माच्या चातुर्मासातील अत्यंत महत्त्वाचा गणला जाणारा पर्युषण पर्वाला सोमवार पासून मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली तसेच साक्री तालुक्यातील बळसाणे येथील जैन मंदिरांना पर्युषण पर्वा निमित्ताने जैन मंदिराच्या कळसांवर व गाबाऱ्याला विद्युत रोषणाई ने व परिसराला प्रकाशाचा झोतात लखलखीत करण्यात आले आहे रात्री च्या वेळी गाबाऱ्यात दिपकाच्या अग्नी ज्योताने मंदिर शोभून उठते आहे दरम्यान मुर्तीपुजक संप्रदायाचे पर्युषण पर्वाला सोमवार पासून तर स्थानकवासी संप्रदायाचे मंगळवार पासून पर्युषण पर्वाला मोठ्या उत्साहात सुरूवात झाली व दिगंबर संप्रदायाच्या पर्युषण पर्वाची सुरुवात २ सप्टेंबर पासून होत आहे.
 पर्युषण पर्वाच्या काळात  येथील मंदिराच्या मुर्तीची अंगी येथील पुजारी मनिशंकर महाराज व अंकित महाराज महाराज यांनी केली 
   गावातील जैन मंदिरात व विश्वकल्याणकाच्या जैन मंदिरात भाविकांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला सुरुवात झाली याअंतर्गत विश्वकल्याणकाच्या विमलनाथ भगवानाच्या जैन मंदिरात आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई येथील ट्रस्टी महावीर जैन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे तसेच श्रीमती जसुमतिबेन बिपीनभाई शहा हस्ते डॉ. संजयभाई शहा , सुरत व नंदुरबार शहा परिवार मुख्य लाभार्थी असल्याचे सांगण्यात आले याठिकाणी ता. २६ आँगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान पर्युषणपना निमित्त श्री श्वेतांबर मुर्तीपुजक  जैन श्रीसंघ बलसाणा आणि श्री विश्वकल्याणक जय विमलनाथ भुमी ट्रस्ट , बलसाणा यांच्या तर्फे विविध प्रकाराचे धार्मिक कार्यक्रम पर्युषण पर्वात घेण्यात येतील असे पंन्यासश्री कुलवर्धन जी महाराज यांनी सांगितले पर्युषण पर्वाच्या पहिल्या च दिवशी विमलनाथ भंगवंताची रेखीव व सुंदर अशी अंगरचना करण्यात आली होती त्याचप्रमाणे मुर्तीला सतत व गाबाऱ्याला सजावटीचे काम रोज सुरू राहील असे ट्रस्ट गणांनी सांगितले व सकाळी ७ वाजता विमलनाथ भगवानाचे व अन्य मुर्तींचे अभिषेक , केशर पुजा , धुप पुजा , स्नात्र पुजा असे नाना प्रकाराचे धार्मिक विधी ने झाले यावेळी गावातील विमलनाथ जैन मंदिराचे पुजारी गिरीश भाई जैन व मनिशंकर भाई जैन व विश्वकल्याणक मंदिराचे पुजारी अंकित भाई जैन व राजेश भाई जैन हे महापर्व काळात परिश्रम घेत आहेत तसेच गावातील कवरलाल छाजेड ,सुभाष जैन , अशोक जैन , भागचंद जैन ,विजय जैन , हेमचंद जैन , दिलीप जैन , शांतीलाल खिंवसरा , शेषमल , छाजेड ,  मोतीलाल जैन , आशिष जैन , गौतम कुंमट , कांतीलाल जैन , किशोर जैन ,  हारकचंद जैन , किरण जैन , अभिषेक जैन , महावीर जैन , पिंटू जैन , राकेश जैन , भुषण जैन ,दर्शन जैन , प्रशांत जैन , योगेश जैन , परेश जैन , संयम जैन , जैनम जैन गावातील जैन समाजाच्या उपस्थित विधी पार पडले यावेळी महिला वर्गाची मोठी गर्दी होती तसेच विश्वकल्याणकाच्या मंदिरात चातुर्मासानिमित्ताने बळसाणे तीर्थाचे तीर्थोध्दारक परमपूज्य पंन्यासश्री कुलवर्धन जी महराज व सुशिष्य परमपूज्य हेमवर्धनजी महाराज (आदी ठाणा , २ ) यांच्या नेतृत्वाखाली पहाटे , साडेचार वाजता ,  *राई प्रतिक्रमण* दुपारी २:३० वाजता पंन्यासश्री कुलवर्धन जी महाराज यांचे प्रवचन विश्वकल्याणक येथे , ४ वाजता , *मुनीश्री सोबत धार्मिक चर्चा* ,सायंकाळी सात वाजता *प्रतिक्रमण* आणि रात्री आठ वाजता *भक्ती कार्यक्रम*  भक्ती कार्यक्रम हा एक दिवस गावातील जैन मंदिरात व दुसऱ्या दिवशी विश्वकल्याणक येथील मंदिरात होईल दरम्यान ता. २८ रोजी गावातील जैन मंदिरात विमलनाथ भगवानाची सामुहिक पक्षाल अभिषेक , ता.३०  रोजी , सकाळी आठ वाजता चौदा स्वप्न व पाळणा बोली विश्वकल्याणक येथे संपन्न होणार आहे व दुपारी चार वाजता चौदा स्वप्न , पाळणा बोली चा कार्यक्रम गावातील विमलनाथ जैन मंदिरात होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली व ता. १ सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता बळसाणे गावातील मंदिरापासून शोभायात्रेला सुरुवात होणार असून शोभायात्रे ची सांगता विश्वकल्याणक येथे होणार आहे त्याचप्रमाणे ता. ३ रोजी सामुदायिक क्षमापण कार्यक्रम व बलसाणा जैन श्रीसंघा तर्फे स्वामीवात्सल्य दुपारी बारा वाजता विश्वकल्याणक येथे आयोजित केले आहे असे आवाहन बलसाणा जैन श्री संघाने केले आहे

 *विश्वकल्याणक मंदिरात धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल*

ता. २६ रोजी बळसाणे तीर्थोध्दारक परमपूज्य पंन्यासश्री कुलवर्धन जी महाराज तथा सुशिष्य परमपूज्य हेमवर्धनजी महाराज यांच्या निश्रायाखाली सुत्रवाचन केले जाते आहे व दुपारी कल्पसुत्र वाचन तसेच दुपारी धार्मिक चर्चा व स्पर्धा , सायंकाळी सात वाजता प्रतिक्रमण व रात्री आठ वाजता प्रसिद्ध संगीतकार आशिष कुमार अँड पार्टी जालना , सध्याच्या परिस्थितीत भाविक धार्मिक भजन ऐकून मंत्रमुग्ध होत आहे  तसेच बळसाणे तीर्थाचे बाल संगीतकार रोनक अँड भुमिका यांचाही भक्तीसंध्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे असे विजय राठोड व कमलेश गांधी , सुरेंद्र टाटीया यांनी सांगितले

बुधवार, ऑगस्ट ०७, २०१९

बळसाणेसह माळमाथेत पाऊस जोरात; पिके कोमात

बळसाणेसह माळमाथेत पाऊस जोरात; पिके कोमात



माळमाथेत २ ते ३ दिवसापासून सुर्यदर्शन नाही

आपल्या साठी घेऊन येत आहोत खबरबात

खबरबात / गणेश कोचर , धुळे
8888965296

बळसाणे : बळसाणेसह माळमाथा परिसरात संततधार होणाऱ्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे पावसाचे पाणी शेतात घुसल्यामुळे पिकांचे नुकसान झाले असून नियमितपणे रिमझिम टपकणाऱ्या पावसामुळे उबदार झालेली पिके सडू लागली आहेत. बळसाणे व परिसरातील नुकसान ग्रस्त शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी बळसाणे व माळमाथा परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून होत आहे. 

बुराई नदी काठाची शेते पाण्याखाली नियमितपणे होणाऱ्या पावसामुळे बुराई नदी काठाची शेते पाण्याखाली गेली आहे गेल्या काही दिवसापूर्वी च चंद्रभागा बाई पांडुरंग लोणारी या वयोवृद्ध विधवा महिलेचा लावलेला कापसाची झाड पूर्णतः वाहून गेली आहेत. यापूर्वीची लावलेली झाडे सडू लागली आहे पुराचे पाणी ओसरल्यावर बळसाणे व परिसरातील नुकसान ग्रस्त शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 
  

जास्त पावसाने केले उबदार पिकांचे नुकसान साक्री तालुक्यातील बळसाणे व माळमाथा परिसरात १० ते १२ दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे शेतातील नानातऱ्हेच्या पिकांसह भाजीपाल्यांचे नुकसान झाल्याचे चित्र दिसत आहे यागोष्टीचा सर्वाधिक फटका येथील शेतकरी *चंद्रभागा बाई लोणारी या वयोवृद्ध विधवा आजीबाई ला बसला आहे* दरम्यान *बळसाणे , आगरपाडा , कढरे , सतमाने , आयणे , उंभड , नागपूर , फोफरे , घानेगाव , मळखेडा , लोणखेडे , छावडी , म्हसाळे , अमोदे , ऐचाळे , इंदवे , दुसाने , हाट्टी (बु) , हाट्टी (खु) , डोंगराळे आदी माळमाथा भागातील शेतकऱ्यांना बसला आहे*
बुराई नदीच्या परिक्षेत्रात रविवारी झालेल्या जोरदार पावसात बुराईचे पाणी थेट शेतात जाऊन मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. यात पिकासह शेतातील मातीही वाहून गेली.  शिवारात  फरशी पाणी थेट शेतात जाऊन पिकासह शेतातील काळी कसदार माती वाहून शेतक:यांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाल्याची घटना घडली. यात बळसाणे येथील चंद्रभागाबाई पांडुरंग लोणारी या विधवा वयोवृद्ध महिलेची कपाशी पुर्णपणे वाहुन गेली,त्यांच्या मालकीची बळसाणे शिवारातील गट नंबर 257  मधील 32 गुंठा क्षेत्र होते. त्यात त्यांनी शेतात शेणखत, बियाणे, इतर खते व गाळ टाकला होता. त्यात त्यांचे एक ते दोन लाख रुपये खर्च झाले होते. हा झालेला खर्च व येणारे उत्पन्नावर नदीचे पाणी थेट शेतात गेल्याने  मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाली आहे. बुराई नदीला आलेला महापुराने प्रवाहाने नदी विरुद्ध दिशेने वाटचाल केल्याने हे नुकसान झाले असल्याचे बोलले जात आहे. नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतक-यांसह इतर शेतक-यांनी केली आहे. 
 पिकांमध्ये पाणी साचल्याने कापूस, मका, कांदा, दादर , बाजरी , भुईमूग आदी पिके सडू लागली आहेत याकारणाने पिकांवर किडीचा प्रादुर्भाव ही वाढला आहे बळसाणे गावातील महिला शेतकरी ग.भा.चंद्रभागा बाई लोणारी यांच्या शेतात पाणी साचल्याने कापसाची झाड जमिनीवर पडली असून ती झाड सडू लागली आहे हे द्रुश्य पाहून वयोवृद्ध महिलेच्या डोळे पाणायला लागले होते. यादरम्यान महसूल विभागाकडून मोहन राठोड यांनी  चंद्रभागा पांडुरंग लोणारी यांचा झालेल्या नुकसानग्रस्त शेतीचा पंचनामा केल्याचे समजले

सोमवार, ऑगस्ट ०५, २०१९

बळसाणे आजी माजी पुढाऱ्यांसह ग्रामस्थांडून बुराईला साडी, चोळी खणाचा आहेर भेट

बळसाणे आजी माजी पुढाऱ्यांसह ग्रामस्थांडून बुराईला साडी, चोळी खणाचा आहेर भेट



आपल्यासाठी घेऊन येत आहोत खबरबात 

 सौ.मनिषा कोचर / धुळे
    8888965296

बळसाणे : साक्री तालुक्यातील बळसाणे वासियांची मुख्य जीवनदायीनी समजली जाणारी *बुराई नदी* प्रवाहीत होऊन नदीचे रविवारी सकाळी गावापर्यंत पोहचले
   तालुक्यातील बळसाणे येथून जाणारी *बुराई नदीला* या वर्षी प्रथमतः च पाणी आल्याने ग्रामस्थांनी पुर पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती दरम्यान गावाचे आजी माजी पुढाऱ्यांसह ग्रामस्थांच्या वतीने *बुराई नदीचे* शास्त्रीय पुरातना नुसार येथील उमाकांत भट यांनी विधीवत मंत्राने जलपूजन केले 
  बुराई नदीचा उगम असणाऱ्या बळसाणेसह परिसरात गेल्या ४ ते ५ दिवसापासून संततधार पाऊस असल्याने *बुराई नदी* वाहती झाली आहे यामुळे बळसाणेसह माळमाथ्याच्या शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे
  बळसाणे लोकनियुक्त सरपंच दरबारसिंग राजपूत , पोलिस पाटील आनंदा हालोरे , हिम्मत खांडेकर , नवल पाटील , रतनसिंग गिरासे , लक्ष्मण मासुळे , अजबसिंग गिरासे , अशोक जैन , शेरसिंग गिरासे , जितेंद्र गिरासे , सुकदेव पाटील , नाना सिसोदे , अशोक राजपूत , आण्णा हालोरे व शास्त्रोक्त पंडित उमाकांत भट , भैया मिस्तरी आदी ग्रामस्थांनी एकंदरीत येवून *बुराई नदीवर* जाऊन  नदीचे विधीवत पूजन करून *बुराई नदीला* येथील पो.पा. आनंदा हालोरे व लोकनियुक्त सरपंच दरबारसिंग राजपूत , हिम्मत खांडेकर व उपस्थितांच्या हस्ते *साडी , चोळी , खण ,नारळ विधीवत पूजा करून अर्पण करण्यात आले त्याच प्रमाणे माळमाथ्याचे बंधारे ही वाहते झाल्याचे दिसून येत आहे कमी पावसात ही नदी वाहती झाल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जाते आहे सतत दोन , तीन पावसाचे प्रमाण असेच राहिले तर *बुराई नदी* मोठ्या प्रमाणात वाहू लागेल बळसाणे व माळमाथा परिसरात रिमझिम पाऊस पडत असल्याने *बुराई नदी* वाहू लागली पण *बुराई धरण* ही ओव्हर प्लो झाल्याचे दिसून येत आहे संततधार पावसामुळे नदी , नाले , बंधारे वाहते झाले आहे पाऊस झाल्याने शेतीकामांना वेग येणार आहे

शुक्रवार, जुलै १२, २०१९

पत्रकार गणेश जैन यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

पत्रकार गणेश जैन यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा





आभारपत्र

    मनुष्य जीवनात वित्त आणि श्रमाची जितकी किंमत आहे, तितकीच किंमत ही वेळेचीही आहे,असे मला वाटते
 आपण आपल्या आयुष्यातील अनमोल वेळ काढून माझ्या वाढदिवसाच्या दिवशी फोन,टेक्स्ट* मेसेजेस, व्हाट्सअप, फेसबुक,ई.सोशल मिडीयाच्या माध्यमातून तसेच पर्सनली भेटून दिवसभर माझ्या वाढदिवसानिमित्त ज्या शुभेच्छ्या दिल्या त्याबद्दल मी आपला शतशः ऋणी आहे.

तसेच बऱ्याच जणांनी मनोमन दिलेल्या शुभेच्छ्यांचाही मी स्वीकार करतो तसेच ईच्छा असतांनाही वेळे अभावी* शुभेच्छ्या देऊ न शकलेल्या माझ्या सर्व स्नेही जणांचाही मी आभारी आहे.
     आपण दिलेल्या ह्या शुभेच्छ्यांच्या जोरावर मी माझ्या पुढील आयुष्यात गरूड झेप घेईल यात तीळ मात्र शंका नाही..
आपले हे प्रेमच आयुष्याचा मूळ भाग असलेल्या देव, देश, धर्म अर्थात थ्री डी च्या संकल्पना माझ्या आयुष्यात दृढवत करतील. यापुढील आयुष्य पर्वात आपले प्रेम आणि साथ अशीच कायम स्वरूपी रहावी,अशी बळसाण्याच्या सावळ्या विठोबा चरणी प्रार्थना करतो..तसे खरंतर आपल्या माणसांना धन्यवाद देणे म्हणजे परके.... केल्या सारखे वाटते पण व्यक्त झाल्या शिवाय कधी-कधी पर्यायच नसतो !
बघायला गेलंतर आज माझा वाढदिवस नव्हताच मुळी, होत ते तुमचे सर्वांचे प्रेम, काळीज, सदिच्छा,आशिर्वाद व आज वर मिळालेली अतुट अशी तुम्हा सर्वांची खंबीर साथ अशा पवित्र भावनांचा तो "सोहळा" होता माझ्यासाठी*
      माझ्या वाढदिवसा  च्या दिवशी आजी , आजोबा , आई , बाबा , ताई , दाजी ,दादा , वहिनी ,सासु , सासरे , दै.लोकमत (परिवार) व पत्रकार , संपादक  राजकीय पदधिकारी , डाँक्टर्स , व्यापारी वर्ग , शिक्षकव्रुंध्द  तसेच विविध  क्षेत्रातील लहान,थोरांनी-मोठ्यांनी तसेच माझ्या मित्र परिवाराने दिलेल्या अमुल्य शुभेच्छा व अनेक उत्तम आशिर्वादांचा मी मनापासुन स्विकार केले व सोबतच गेल्या वर्षभरात काही चुका माझ्याकडुन झाल्या असतील  किंवा अजाणतेपणामुळे कुणाचे मन दुखावले गेली असेल तर त्याबद्दल मी हात जोडून क्षमा मागतो !
आणि तुम्ही  गणेशला क्षमा कराल एवढे मात्र निश्चित
असेच स्नेह, प्रेम व आशिर्वाद तुमच्या गणेश जैन वर निरंतर राहु द्या !!
हिच पांडुरंग चरणी अपेक्षा
पुनःश्च एकदा सर्वांचे धन्यवाद !


  गणेश जैन, पत्रकार 
8888965296
       बळसाणे
विमलनाथाच्या जयजयकारात जैन मुनींचे चातुर्मास प्रवेश

विमलनाथाच्या जयजयकारात जैन मुनींचे चातुर्मास प्रवेश

  • शोभायात्रे ने वेधले लक्ष 
  • लेझीम पथक, भजनीमंडळ, कलशधारी महिला
  • बँड पथक जैन स्तवनांनी दुमदुमले बळसाणे गाव




खबरबात गणेश जैन / धुळे
8888965296
बळसाणे : चातुर्मास निमित्त जैन मुनींच्या सानिध्यात विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत यासाठी बळसाणे तीर्थाचे जनक परमपूज्य पंन्यासश्री कुलवर्धनजी महाराज व सुशिष्य परमपूज्य हेमवर्धनजी महाराज यांचा ११ रोजी येथील ओम श्री विमलनाथ भगवान विश्वकल्याणक जैन तीर्थ येथे चातुर्मास प्रवेश झाला यानिमित्त सकाळी काढण्यात आलेल्या शोभायात्रेत भगवान विमलनाथ भगवान व महावीर भगवानाच्या जयजयकाराने गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले
 परमपूज्य पंन्यासश्री कुलवर्धनजी महाराज व परमपूज्य हेमवर्धनजी महाराज यांचा बळसाणे नगरीत चातुर्मास होणार असून त्यासाठी मुनीश्रींचा गुरुवार ११ रोजी विश्वकल्याणक येथील विमलनाथ जैन मंदिरात मंगल प्रवेश झाला
  बळसाणे येथील गाव दरवाजापासून शोभायात्रे ला सुरुवात झाली या शोभायात्रेत कलशधारी महिला , भजनीमंडळ , लेझीम पथक , हाती ध्वज घेतलेले पुरुष सहभागी झाले होते यावेळी समाज बांधवांनी  विमलनाथ भगवान की जय , महावीर भगवान की जय , आज का दीन कैसा है , सोहने से भी मेहंगा है , वंदे विरम , जैनम जयती शासनम अशा नानातऱ्हेच्या घोषणांनी बळसाणे गाव दुमदुमून गेले होते सोबतच भजनीमंडळाने विविध प्रकारचे धार्मिक भजन गायीले तर बँड पथकाने तालव्रुध्द ढोल वाजवीत साथ दिली विश्वकल्याणक येथील विमलनाथ जैन मंदिरात शोभायात्रा पोहचून मुनीश्रींचा चातुर्मास प्रवेश झाला यावेळी बळसाणे येथील कवरलाल छाजेड , सुभाष कोचर , हेमचंद कोचर , सुरेश कोचर , भागचंद कोचर , अशोक कोचर , अरुण कोचर , विजय कोचर , गौतम कोचर , दिलीप कोचर , कांतीलाल कोचर , मोतीलाल खिंवसरा , हारकचंद छाजेड , किशोर कोचर ,आशिष रूणवाल किरण कुंमट , शांतीलाल खिंवसरा ,  दिपकभाई शहा ,कीर्ती शहा,रवी सुराणा, गौतम कुंमट ,यांच्यासह बळसाणे येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते येथील विश्वकल्याणक जैन मंदिरात परमपूज्य पंन्यासश्री कुलवर्धन जी महाराज व परमपूज्य हेमवर्धनजी महाराज विराजमान असून बळसाणे ग्रामस्थांनी व समाजबांधवांनी दर्शनाचा व प्रवचनाचा लाभ घ्यावा असे आवाहन ओम श्री विश्वकल्याणक ट्रस्ट व ग्रामपंचायत सदस्य महावीर जैन व जैन श्वेतांबर मुर्तीपूजक संघाच्या वतीने करण्यात आले आहे

मुनीश्रींच्या आगमनार्थ संबधे गाव एकवटले पण चातुर्मास प्रवेशात ट्रस्टगणांनी फिरवली पाठ

 बळसाणे तीर्थाचे जनक व गावातील जैन मंदिरासह विश्वकल्याणक तीर्थाचे शिल्पकार परमपूज्य पंन्यासश्री कुलवर्धनजी महाराज तथा सुशिष्य परमपूज्य हेमवर्धनजी महाराज यांचे चातुर्मास प्रवेशात गावकऱ्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती आणि त्या उपस्थिती चे कौतुक आज देखील समाजबांधवांतून होत आहे तसेच गावातील कै.एन.पी.जी.विद्यालयातील विद्यार्थ्यांनी व जिल्हा परिषद शाळेतील लहानली मुल मुली शोभायात्रेत आकर्षक वाटत होते मुनीश्रींच्या प्रवेशाकरिता पुर्ण गाव एक सोबत एकवटले होते पण मुनीश्रींच्या प्रवेशात शितलनाथ संस्थानचे एकही ट्रस्टी ची उपस्थिती नव्हती व विश्वकल्याणकाच्या अकरा ट्रस्टगणातून फक्त महावीर जैन यांनी उपस्थिती दाखवून चातुर्मासाचे पुढील आयोजन ही गावातील जेष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहे  बळसाणे तीर्थाचे सर्वच ट्रस्टगणांनी मुनीश्रींच्या प्रवेशात अनुपस्थिती दाखवल्याची नाराजगी बळसाणे ग्रामस्थांसह समाजबांधवांनी केली आहे 

  मंगलमय चातुर्मासाचे प्रवचन

विश्वकल्याणक येथील पटांगणात चातुर्मासानिमित्ताने परमपूज्य पंन्यासश्री कुलवर्धन जी महाराज प्रवचनातून म्हणाले की चातुर्मास म्हणजे काय ? , चातुर्मासा वेळी काय करावे , समाजामध्ये त्याचे किती महत्त्व आहे , जैन समाजात चातुर्मास पर्वाला अनन्य साधारण महत्व आहे याविषयी उपस्थितांना प्रवचनातून मार्गदर्शन केले या पर्वानिमित्त बळसाणे येथे परमपूज्य पंन्यासश्री कुलवर्धन जी महाराज व परमपूज्य हेमवर्धनजी महाराज यांचे आगमन झाले आहे त्यांच्याकडून मार्गदर्शन केले जाणार आहे पुढील चार महिने जैन समाज बांधवांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे याकामी बळसाणे सरपंच दरबारसिंग गिरासे , उपसरपंच सुदाम खांडेकर,हिम्मत खांडेकर,देविदास धनुरे,नवल हालोरे,व ग्रा.पं.सदस्य , भजनीमंडळ , समस्त बळसाणे ग्रामस्थ आणि सकल जैन समाज ,कार्यक्रमाचे आयोजन  ट्रस्टी ग्रामपंचायत सदस्य महावीर जैन, गिरीश कोचर,योगेश कोचर,चेतन छाजेड, परेश जैन, अभिषेक जैन, गौरव जैन, प्रशांत जैन, ललित जैन, पंकज जैन, यांच्या सह जैन मुनींचे स्वागतासाठी सज्ज होते व चातुर्मासा चे आयोजन समाजबांधवांकडून होत आहे. 

सोमवार, जुलै ०८, २०१९

भाविकांचे श्रध्दास्थान बनले बळसाणे गावाचे विठ्ठल मंदिर

भाविकांचे श्रध्दास्थान बनले बळसाणे गावाचे विठ्ठल मंदिर



गणेश जैन / धुळे

बळसाणे : माळमाथा परिसरातील बळसाणे हे गाव धार्मिक क्षेत्रांनी घेरले आहे तसेच गावाला प्रतिपंढरपूर म्हणून ही ओळखले जाते विठ्ठल मंदिरात सतत वेगवेगळे धार्मिक व सामाजिक कार्यक्रम होत असतात बळसाणे गावी विविध देव देवतांचे मंदिर आहेत त्यात गावातील मुख्य बाजारपेठेत विठ्ठल रुक्मिणी  मंदिरात भाविकांची नियमितपणे दर्शनार्थ गर्दी असते 
  मुख्य बाजार पेठेतील विठ्ठल रुक्मिणी मंदिराची स्थापना इ.स. १९८९ मध्ये करण्यात आली
  बळसाणे गावात विठ्ठल मंदिर उभारण्याची संकल्पना प्रखर किर्तनकार जगदगुरु ब्रम्हमुर्ती हभप दामोदर महाराज यांची होती *युगे अठ्ठावीस उभे विठ्ठे वरी* या अभंगाच्या अर्थानुसार मंदिराची उभारणी करण्यात आली आणि आज या परिसरात बळसाणे हे गाव प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाते यामुळे सदर मंदिर हे भाविकांचे श्रध्दास्थान बनले आहे 
मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणी सोबत राम , लक्ष्मण , सिता , हनुमानाची व बाजूला सप्तशृंगी देवी ची  स्थापना हभप दामोदर महाराज यांच्या हस्ते करण्यात आलेली आहे मंदिराचे पुजारी उमाकांत भट हे दररोज सकाळी मुर्तींना स्नान घालून पूजाअर्चा करतात तसेच मंदिरात पहाटे काकडा आरती होते काकडा आरती ला गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित राहते त्याचप्रमाणे सकाळी १० वाजता पूजा करण्यात येते व सायंकाळी पाच वाजता हरिपाठ होतो दर एकादशी ला भजनीमंडळा तर्फे भजनाचा कार्यक्रम होतो तसेच वर्षातून दोन दा आषाढी आणि कार्तिक एकादशीला श्री विठ्ठल रुक्मिणी ची महापूजा करण्यात येते तसेच महिलांचा हरिपाठ , पुरुषांचा हरिपाठ हा कार्यक्रम होतो त्यानंतर दिंडी निघते व प्रसाद वाटप होतो रात्री किर्तनाचा कार्यक्रम होतो कार्तिक महिन्यात तुळशी विवाह सोहळा होतो व मार्च महिन्यात मोठा नाम सप्ताह होतो या नाम सप्ताहात भाविकांना प्रसिद्ध किर्तनकारांची उपस्थिती लाभते त्याचप्रमाणे गावकऱ्यांमार्फत वर्षभर सणासुदीला , सामाजिक व धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात गावातील व परिसरातील भाविक नित्याने दर्शनासाठी येतात आषाढी एकादशी निमित्ताने परिसरातील बहुतांश लोक विठ्ठल रुक्मिणी च्या मंदिरात आवर्जून गर्दी करतात व बाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी ग्रामस्थांमार्फत फराळाची व चाय पाण्याची सोय करण्यात येते म्हणून बळसाणे गावातील विठ्ठल रुक्मिणी चे मंदिर हे भाविकांचे श्रध्दास्थान बनले आहे
बळसाणे तीर्थोध्दारख जैनमुनिंच्या चातुर्मासाची जय्यत तयारी

बळसाणे तीर्थोध्दारख जैनमुनिंच्या चातुर्मासाची जय्यत तयारी



११ जुलैला परमपूज्य पंन्यासश्री कुलवर्धन महाराजांचे बळसाणे तीर्थावर होणार जल्लोषात प्रवेश

 खबरबात, गणेश जैन / धुळे*

बळसाणे : साक्री तालुक्यातील बळसाणे हे गाव जैन धर्मियांचे तीर्थस्थान म्हणून जगभर प्रसिद्ध आहे जैन तीर्थाला प्रसिद्ध करण्याचे श्रेय व देवलोक गमन तीर्थोध्दारख परमपूज्य आचार्य भगवंत विद्यानंदसुरीश्वजी महाराज यांचे होते परमपूज्य आचार्य भगवंतांनी बळसाणे हे गाव जैन धर्मियांचे तीर्थक्षेत्र म्हणून कसे प्रसिद्ध होईल याबाबत महाराजांनी मोठी खटाटोप केली होती देवलोक गमन आचार्य मुनिंचे गुजरात , मध्यप्रदेश आदी राज्यातील चातुर्मासात फक्त समाजबांधवांना बळसाणे तीर्थावर लक्ष केंद्रित राहायचे असलेल्या चातुर्मासाच्या स्थळातुन भाविकांना बळसाणे जैन तीर्थावर विमलनाथ च्या दर्शनार्थ अग्रहीत करून ट्रँव्हेल्स ने पाठवत राहायचे परंतु त्यांनी जैन समाजाच्या मोठमोठ्या ला सावकरांना धरून दुसाने रोडावरील जमीन खरीद ली आणि त्याक्षेत्राला विश्वकल्याणक तीर्थ म्हणून नावाचे स्वरूप दिले तसेच विमलनाथाची सेकण्ड मुर्ती तयार करून  त्या नव्या जैन मंदिरात स्थापना करण्यात आली व शंखेश्वर , पालीताणा सारखे भव्य तीर्थ उभारण्याचे आचार्य मुनिंनी विडाच उचलला होता त्यांच्या निश्रायाखाली मंदिराचे बांधकाम चालू असताना त्यांचे मुंबई येथील खासगी रुग्णालयात दुखद निधन झाले त्यांच्या अकाली निधनानंतर त्यांचे सुशिष्य परमपूज्य पंन्यासश्री कुलवर्धन महाराज यांना त्यांची गादी मिळाली या महाराजांनी देखील त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी तीर्थाला घडवण्याचे मोठे प्रयत्न केले आतापर्यंत त्यांच्या निश्रायाखाली सुसज्ज अशी भक्तनिवास व साधुसंतांची राहण्यासाठी उपाश्रय बांधले व अजून देखील मोठ्या प्रमाणात या परिसरात जोरात काम चालू आहे त्यासाठी विश्वकल्याणक ट्रस्टगण ही परीश्रम घेतांना दिसून येत आहे 
 बळसाणे गावाचे नाव राज्यातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध करून दाखवले आणि अशाच परमपूज्य पंन्यासश्री कुलवर्धन महाराज व परमपूज्य हेमवर्धनजी महाराज यांचे प्रथमतः च मंगलमय चातुर्मासाची समाजबांधवांकडून व समस्त गावकऱ्यांकडून जय्यत तयारी सुरू आहे

  *बळसाणे नगरीत चातुर्मासा निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम*

११ जुलै रोजी महाराजांचे बळसाणे तीर्थावर कळसधारी महिला व भजनीमंडळ , लेझीम पथक , वाजतगाजत भव्य शोभायात्रा सकाळी काढण्यात येणार आहे शोभायात्रे ची सुरुवात गावादारा पासून ते वाजतगाजत गावातील जैन मंदिरात विमलनाथ भगवंताचे दर्शन व मंगलपाठ करून पुन्हा त्याच मार्गाने विश्वकल्याणक येथे शोभायात्रे ची सांगता होणार असल्याची माहिती बळसाणे विश्वकल्याणक ट्रस्टी व ग्रा.पं.सदस्य महावीर जैन यांनी खबरबात ला दिली त्याचप्रमाणे चार महिन्याच्या चातुर्मासात धार्मिक विधी , जप तपाला सुरुवात होईल व रोज प्रवचन होईल सुज्वळ स्वभावाचे परमपूज्य कुलवर्धन महाराज यांचा प्रवचन ऐकण्याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे

रविवार, जून ०९, २०१९

राहुल जैनने दिले वडिलांच्या स्वप्नांना नवे पंख

राहुल जैनने दिले वडिलांच्या स्वप्नांना नवे पंख

संडे स्पेशियल : दहावीत मिळविले ९६ टक्के गुण 

 गणेश जैन, खबरबात / धुळे

बळसाणे : शिरपूरात वडिलांचे ललित स्विट म्हणून गोळ्या बिस्किट चे दुकान स्विट मार्ट चालवून  राहुल ला शिक्षणसाठी त्याचे मामा पंकज कर्नावट व योगेश कर्नावट यांनी वयाच्या साडेतीन वर्षापासून पुणे शहरात नर्सरीत राहुल चे अँडमिशन केले तसेच शिरपूरात वडिल गोळ्या बिस्कीट चा व्यवसाय करून संसाराचा गाडा चालविणाऱ्या वडिलांचा स्वप्नांना पंख देत राहुल ने इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९६ टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले 

  घराची परिस्थिती साधारण असली तरी मुला मुलींना चांगले शिक्षण द्यावे असे स्वप्न पाहत वडील ललित जैन हे रात्रंदिवस एक करीत मुलगा आणि मुलगी व भावाच्या मुलगा आणि मुलगीला शिक्षण देत आहेत ललित जैन यांचा मोठा मुलगा राहुल हा शिक्षणाचे माहेर घर असलेल्या पुणे शहरातील दाजीकाका गाडगीळ शाळेचा विद्यार्थी आहे यंदा दहावी चे वर्ष त्यात शिक्षणाचा खर्च अन् संसाराचा गाडा चालविणे सोपी गोष्ट नाही पण काही असो माझ्या चौघ्या लेकरांना शिकवीण अशी मनाशी जिद्द ठेवली आणि राहुल ने ते स्वप्न अखेर आई बाबांसह मामा मामींचे पुर्ण केल्या चे आजच्या परिस्थितीत जाणवयाला लागले आहे राहुल ला कुठल्याही प्रकारचे ट्यूशन देखील नाही सेल्फ स्टडी करून शाळेत प्रथम क्रमांका ने उत्तीर्ण झाल्याचे कौतुक परिवारातील सदस्य व आप्तगणांना होत आहे बापाने काटकसर व दिवसाची रात्र करीत ललित जैन हे शिरपूरात छोटेसे गोळ्या बिस्कीटाचे व्यापार करीत आहेत माझ्या दोघी मुलांसह लहान भावाच्या दोघी मुलांनी उच्च शिक्षणापर्यंत मंजील गाठावी व ते उच्च पदापर्यंत जावे असे नात , नातीं चे स्वप्न आजी आजोबांना लागले आहे तसेच राहुल च्या आई सविता ने ही तितकीच साथ दिली आई बाबांचे स्वप्न साकारत राहुल ने इयत्ता दहावीत ९६ टक्के गुण मिळवून शिक्षणाच्या पहिल्या प्रवासाची बलाढ्य झेप घेतली राहुल च्या यशामुळे पुणे येथील मामा मामी , आजी आजोबा व त्याचे शिरपूर शहरातील आजी आजोबा , आई , वडील , काका काकू यांच्या स्वप्नांना नवे पंखे फुटले असून राहुल ने आणखी जास्तीत जास्त शिकावे अशी अपेक्षा राहुलच्या नातेवाईकांनी व्यक्त केली

 राहुल चे ध्येय डॉक्टर बनवून समाजसेवा करण्याची जिद्द

 आई बाबांच्या स्वप्नांना पंख देत इयत्ता दहावीत उत्तीर्ण होऊन गगन भरारी घेणाऱ्या राहुल ला समाजा ला डॉक्टर बनून समाजसेवा करायची तयारी दाखवली आहे सध्या तरी राहुल ने एम.बी.बी.एस.करण्याची मनाची तयारी दाखवली आहे राहुल चे हे ध्येय असून या दिशेने त्याची वाटचाल राहणार असल्याचे राहुलने कौतुकाने सांगितले आणि याप्रसंगी मला लहानपणापासून च माझ्या मामा मामींनी व आजी आजोबानी खूपच मार्गदर्शन दिले हा श्रेय त्यांचा असल्याचे कौतुकात सांगितले. 

गुरुवार, जून ०६, २०१९

ऐचाळे ग्रामपंचायतीवर गोकुळबाई बागलेंचे पुन्हा वर्चस्व

ऐचाळे ग्रामपंचायतीवर गोकुळबाई बागलेंचे पुन्हा वर्चस्व

अविश्वासाचा ठराव नामंजूर , बागले गटात जल्लोष

   गणेश जैन,खबरबात / धुळे

बळसाणे : माळमाथा परिसरातील ऐचाळे ता.साक्री ग्रामपंचायतीवर  सौ. गोकुळबाई आप्पा बागले हे सरपंच पदावर कार्यरत असताना काही विरोध्दक सदस्यांनी त्यांच्या वर अविश्वास ठराव दाखल केला परंतु  ता. ६ जून रोजी ऐचाळे ग्रामपंचायतीत साक्री चे नायब तहसीलदार संदीप सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक बोलविण्यात आली होती मात्र सौ.बागलेंच्या   विरोधात बहुमत सिध्द न झाल्याने नायबतहसीलदार संदीप सोनवणे यांनी हा ठराव रितसर पडताळणी करून नामंजूर केला दरम्यान विरोध्दकांनी साक्री तहसीलदाराकडे सरपंच मनमानी कारभार करीत असतात व कार्यालयीन कामासाठी वेळ देत नाहीत आदी कारणांसह विरोध्दक सदस्यांनी तहसीलदारांकडे अविश्वास ठराव दाखल केला होता याप्रसंगी नायबतहसीलदार संदीप सोनवणे यांनी ऐचाळे ग्रामपंचायतीमध्ये सदस्यांची विशेष सभा घेतली आणि सर्व सदस्यांची मत जाणून घेतली व सोनवणे यांनी सौ.गोकुळबाई बागले  यांच्या विरोधात दाखल केलेला अविश्वास ठराव अखेर नामंजूर केल्याचे जाहीर केले याबाबत ना.जयकुमार रावल व ना.सुभाष भामरे तसेच माळमाथा परिसराचे नेते नारायण पाटील यांनी शुभेच्छा दिल्या व कौतुक केले सौ गोकुळ बागले ह्या आप्पा दादा बागले यांच्या पत्नी असून त्या सरपंच पदाच्या धुरा सांभाळत आहेत पुन्हा त्यांना दिलासा मिळाल्याचे समाधान गावातून होत आहे

शनिवार, मे ११, २०१९

मुख्यमंत्र्यांनी साधला धुळे जिल्ह्यातील सरपंचांशी संवाद

मुख्यमंत्र्यांनी साधला धुळे जिल्ह्यातील सरपंचांशी संवाद


मनरेगामधून जलसंधारणमृदसंधारणासह
विविध नवीन 28 प्रकारच्या कामांना मान्यता
                                   - दुष्काळी भागात मनरेगाच्या कामांना गती देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना
मुंबईदि. 11: राज्यात मनरेगा योजनेतून जलसंधारणमृदसंधारणासह शाळा कंपाऊंड बांधकामासारखी विविध 28 प्रकारची कामे एकत्रिकरणातून (कन्व्हर्जन्स) करण्यास मान्यता देण्यात आली आहेत. त्यामुळे गावात दुष्काळाच्या काळात मनरेगाची कामे करुन रोजगार निर्मितीबरोबर गावांमध्ये दुष्काळनिवारणासह विविध लोकोपयोगी कामांची निर्मिती करावीअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज धुळे जिल्ह्यातील सरपंचांशी संवाद साधताना केले. प्रशासनानेही मनरेगाच्या कामांची मागणी येताच त्याला विनाविलंब तीन दिवसाच्या आत मान्यता द्यावीअशा सूचनाही त्यांनी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिल्या.   
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आज 'ऑडीओ ब्रीज सिस्टम'द्वारे धुळे जिल्ह्यातील साधारण 45 सरपंचांशी मोबाईलवरुन थेट संवाद साधून त्यांच्याशी दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसंदर्भात चर्चा केली. तसेच गावागावांमध्ये निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या अडचणी समजून घेतल्या. या संवादात जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांचाही सहभाग होता. मुख्यमंत्री म्हणालेराज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने टंचाईसंदर्भातील कोणत्याही प्रस्तावावर विनाविलंब निर्णय घ्यावा. प्रशासन आणि लोकांच्या एकत्रित सहभागातून या परिस्थितीवर निश्चित मात केली जाईल, त्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावेअसे आवाहन त्यांनी केले.
गावांची 2018 ची लोकसंख्या व जनावरांची संख्या लक्षात घेवून आवश्यक अतिरिक्त टॅंकर व जनावरांना मागणीनुसार तात्काळ चारा उपलब्ध करुन द्यावा. बंद पडलेल्या योजनाही विशेष दुरुस्ती योजनेमधून सुरु करुन गावकऱ्यांना टंचाईच्या काळात तातडीचा दिलासा देता येईल, मागणी येताच तहसीलदारगटविकास अधिकारी यांनी विनाविलंब असे प्रस्ताव मान्य करावेत, जिल्हा प्रशासनाने प्रत्येक तक्रारींची नोंद घेऊन कार्यवाही करावी व तसा अहवाल आपणास सादर करावाअशा सूचनाही मुख्यमंत्र्यानी  यावेळी दिल्या.
पाणीसाठ्यांचे पहिले प्राधान्य पिण्याच्या पाण्याला
जिल्ह्यांमधील पाणीसाठे हे प्रथमत: पिण्याच्या पाण्यासाठी आहेत. त्यामुळे कोणी बेकायदेशीररित्या पाण्याचा उपसा करत असेल तर त्यावर कार्यवाही करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. पिण्याच्या पाण्यासाठी निधी तसेच आवश्यक तेथे बोअरवेलची संख्या वाढविण्यात यावी. जिल्ह्यांमध्ये जलसंधारणाची कामे आणि आवश्यकतेनुसार जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करण्यात याव्यात, टंचाईनिवारणाच्या तातडीच्या उपाययोजनांवर 48 तासांच्या आत कार्यवाही करण्यात यावीअशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
धुळे जिल्ह्यांतील मधुकर पाटीलवालचंद पवारविलास शिंदेगुलाब पाटीलपृथ्वीराज चव्हाणमीराबाई पाटीलयोगेश पाटील,महादू राजपूतबाळासाहेब रावल आदी सरपंचांशी मुख्यमंत्र्यांनी मोबाईलवरुन थेट संवाद साधला.
यावेळी मुख्य सचिव यु.पी.एस. मदानपाणीपुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयलजलसंधारण आणि रोहयो विभागाचे सचिव एकनाथ डवलेपदुम विभागाचे सचिव अनुपकुमारमाहिती व जनसंपर्क विभागाचे सचिव ब्रिजेश सिंहमदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
दुष्काळ निवारणासाठी धुळे जिल्ह्यात करण्यात आलेल्या उपाययोजना
     धुळे जिल्ह्यामध्ये खालील 3 तालुक्यामध्ये टॅंकर सुरु आहे.
तालुक्याचे नाव
टॅंकरची संख्या
1. सिंदखेडा
16
2. धुळे
11
3. साक्री
4
                            एकूण
31

· सिंदखेडा तालुक्यात सर्वात जास्त 16 टॅंकर सुरु असून साक्री तालुक्यात सर्वात कमी 4 टँकर सुरु आहेत.
· पिण्याच्या पाण्याचा टंचाई निवारणार्थ आजअखेर धुळे जिल्ह्यांतील एका नळ पाणीपुरवठा योजनेची विशेष दुरुस्ती करुन 9 तात्पुरत्या नळपाणी पुरवठा योजना कार्यान्वित करुन 145 विहिरीचे अधिग्रहण करुन पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत ठेवण्याची दक्षता घेण्यात आली आहे.
·पिण्याच्या पाण्याच्या नळ पाणीपुरवठा योजनांची रु.3.36 कोटी इतकी विद्युत देयकांची रक्कम महावितरण कंपनीस देण्यात आलेली आहे. सर्व नळ पाणीपुरवठांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.
· धुळे जिल्ह्यांतील दुष्काळ घोषित केलेल्या 3 तालुक्यातील 451 गावातील 1 लाख 55 हजार 628 इतक्या शेतकऱ्यांना रु. 122.11 कोटी इतकी रक्कम वाटप करण्यात आली आहे.
· धुळे जिल्ह्यातील एकूण 29 हजार 247 शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेतंर्गत नोंदणी केली होती. या हंगामात नुकसान भरपाईपोटी रु. 6.44 कोटी अदा करण्यात येणार असून त्यापैकी रु. 6.40 कोटी इतकी रक्कम 7 हजार 181 शेतकऱ्यांना अदा करण्यात आली आहे.
· प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतंर्गत धुळे जिल्ह्यांतील 1.90 लक्ष शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली. त्यापैकी 46 हजार शेतकऱ्यांना रु. 2000 /- प्रमाणे पहिल्या हप्त्यापोटी एकूण रु. 9.20 कोटी इतके अर्थसहाय देण्यात आले आहे. उर्वरित शेतकऱ्यांना लाभ देण्याची कार्यवाही सुरु आहे.
· महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत धुळे जिल्ह्यांत 1 हजार 733 कामे सुरु असून त्यावर 4 हजार 109 मजूर उपस्थिती आहे. सर्वात जास्त 1 हजार 379 मजूर सिंदखेडा तालुक्यात असून सर्वात कमी 664 मजूर उपस्थिती साक्री तालुक्यात आहे. जिल्ह्यामध्ये 13 हजार 899 कामे शेल्फवर आहेत.

सोमवार, मे ०६, २०१९

शिरपूरच्या साईराम कंट्रक्शनची महेश आँटो इंजिनिअरिंगकडून फसवणूक

शिरपूरच्या साईराम कंट्रक्शनची महेश आँटो इंजिनिअरिंगकडून फसवणूक

अशोक लेलैंड मार्फत शिरपूर च्या मनोज जाधव , मुकेश बाफनांसह पार्टनरांनी घेतले सहा न्यू माँडेलचे डंपर 

दाद मागण्यासाठी ग्राहक मंचात जाणार

खबरबात न्यूज/गणेश जैन , धुळे

शिरपूर   :  शिरपूर शहरातील मनोज जाधव , मुकेश बाफना यांच्यासह चार पार्टनर मिळून ३५ लाखा प्रमाणे *साईराम कंट्रक्शन च्या कंपनी ने एक नव्हे , दोन नव्हे तब्बल अशोक लेलैंड कंपनी चा नव्याने ब्रँच झालेल्या ६ ट्राला ( डंपर) एक महिनापूर्वीच खरेदी केल्याचे साईराम कंट्रक्शन च्या संचालकांनी सांगितले. 

  साईराम कंट्रक्शन चे मलकापूर येथे धरणाचे काम मोठ्या उमीदेने चालू होते सहा मालवाहू डंपरातून एका डंपराचे काम निघाले  डंपर पुढे हालत नसल्याचे धुळे येथील अशोक लेलैंड चे डिलर महेश आँटो इंजिनिअरिंग यांना दुरध्वनीवर डंपर चालकाने कळविले  नव्याने खरेदी केलेला डंपर महिन्याच्या कालावधीतच बिघाड झाल्या चा संताप साईराम कंट्रक्शनाच्या संचालकांना आजही कायम आहे डंपराचा बिघाड झाल्यामुळे  त्यावर डंपर ला जळगाव च्या अशोक लेलैंड च्या शोरूम ला घेऊन जा जळगाव च्या शोरूम शी बोलतो धुळे येथील महेश आँटो चे सेल्स मँनेजर अकबाल शेख यांनी सांगितले सदर डंपर दुरुस्ती झाल्यावर परत मलकापूर येथे रवाना झाला लगेच दोन दिवसांनी दुसऱ्या डंपराची तीच समस्या निर्माण झाली परत त्या डंपरालाही जळगावात आणण्यात आले असे सहा नि सहा डंपारात तांत्रिक बिघाड झाल्याचे कंट्रक्शनाच्या संचालकांनी सांगितले आज जळगाव च्या अशोक लेलैंड च्या शोरूमाला चार डंपर दुरुस्ती साठी ठेवण्यात आले आहे एका महिन्यात नव्या डंपराला दुरुस्ती साठी मँकनिकल लागत असेल तर मग नव्याने डंपर खरेदी केलेले काय कामाचे दलाला कडून जूने डंपर खरेदी केलेले पुरवडले असते सदर सहा डंपराची किंमत एकूण दोन करोडाच्या वरती आहे याकारणाने च संताप निर्माण होत आहे जर साईराम कंट्रक्शन कंपनीच्या सांगण्याप्रमाणे अशोक लेलैंड कंपनी ने व  महेश आँटो इंजिनिअरिंग  न केल्यास प्रिंट मिडिया व टिव्ही मिडिया यांची मदत घेऊन ग्राहक मंचात रितसर गुन्हा दाखल करण्याचा व धुळे येथील अशोक लेलैंड च्या शोरूमाला आत्मदहनाचा इशारा संचालकांनी दिला आहे

आगरपाड्यात उन्हाळ कांदा काढून चाळीत साठवणूक सुरु

आगरपाड्यात उन्हाळ कांदा काढून चाळीत साठवणूक सुरु

माळमाथा परिसरातील शेतकरी उन्हाळी कामात व्यस्त

खबरबात , धुळे/गणेश जैन

बळसाणे : बळसाणे गावासह माळमाथा भागातील शेतकरी सध्या उन्हाळी कामात व्यस्त आहे ठिकठिकाणी उन्हाळी कांदा काढून चाळीत किंवा शेतातच ढिग करून ठेवणे व शेतातील निंदणी व फवारणी फुटवा बांधणी , भाजीपाल्याची काढणी आदी माळमाथ्याचा शेतकरी व्यस्त असल्याचे दिसून येत आहे

  डिसेंबर ते जानेवारी दरम्यान लागवड केलेला कांदा एप्रिल, मे च्या दरम्यान काढला जातो बळसाणेसह आगरपाडा , दुसाने , इंदवे , हाट्टी , ऐचाळे , सतमाने , कढरे , छावडी , अमोदा , घानेगाव , लोनखेडी , फोफरे , आखाडे ,फोफादे , परसुळे आदी परिसरातील काही शेतकऱ्यांचा उन्हाळी कांदा काढून झाला आहे आणि उर्वरित भागात अजून कांदा काढणे सुरु आहे ज्या शेतकऱ्याचा कांदा काढून झाला आहे त्यांनी ऊन ,वारा व अवकाळी पावसापासून बचाव करण्यासाठी कांद्याच्या ढिगावर पात पसरून त्यावर उसाचे पाचट व ताडपत्री टाकून झाकून ठेवली आहेत आणि काही ठिकाणी अजूनही उशीराने लावलेले कांदे मजूरांकडून भरून चाळीत नेऊन टाकले जातात कांदे निवडून मजूरांकडून साठवण्याची लगबग सुरु आहे मजूरांची टंचाई असल्याने ठेकेदारी पध्दतीने ही कामे उरकली जात नाही

सध्या अधिक तापमानामुळे दिवसभर उकाडा जाणवतो त्यातच आकाशात काळ्या ढगांची गर्दी लक्षणे घेता बेमोसमी पाऊस कोसळण्याची शक्यता राहते अनेक ठिकाणी वारा व गारांसह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने बळीराजाचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे माळमाथा भागातील शेतकऱ्यांची कांदा चाळीत साठवणूक करण्याची धावपळ सुरू आहे
भागवत भिवा ठेलारी , शेतकरी (आगरपाडा)

रविवार, मे ०५, २०१९

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आदरणीय बापूसाहेब आपल्याला लोकमत परिवारा तर्फे व कोचर परिवारामार्फत आजच्या वाढदिवसाच्या आमच्या मनापासून शुभेच्छा

माझे मार्गदर्शक व जेष्ठ पत्रकार आदरणीय राजू बापू यांना वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा 


आज आमचे प्रिय मित्र म्हणजे पित्रुतूल्य पत्रकार श्री राजेंद्र पाटील उर्फ राजू बापू यांचा वाढदिवस. आज बापूंना अहो काहो न म्हणता.संबध शिरपूर शहरासह तालुकाभर फक्त बापू  म्हणतात कारण एकेरी उल्लेखाने माणूस मनापासून जवळ येतो. परकेपणा राहत नाही 

तसे बापू वयाने माझ्यापेक्षा कितीकपट मोठे आहेत. पण कर्तृत्वाने बापासारखे मार्गदर्शन देत राहतात

       सतत हसत मुख असणारे, रोख-ठोक बोलणारे पण संत तुकाराम म्हणून हळव्या मनाचा, त्यांच्या गळ्यात सरस्वतीचे वात्सव्य असल्याने गोड गळ्याचा, मिठास आवाजाचा, म्हणूनच त्यांनी स्वतःचे काही वर्षापूर्वीच साप्ताहिक खान्देश पथक नावाचे व्रुत्तपत्र  सुरू केले  स्वतः संपादकीय लेखातून सतत वाचा फोडत असतात*

  आशा या राजा दिलाच्या पत्रकार व आमचे जेष्ठ मार्गदर्शक आदरणीय बापूंना वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा



   शुभेच्छूक

ललित जैन 

अँड गणेश जैन 

महावीर जैन 

शिवसेना तालुका उपप्रमुख व बळसाणे सरपंचासह ग्रामपंचायत

गुरुवार, एप्रिल २५, २०१९

विमलनाथाने वाचवले भाविकांचे प्राण

विमलनाथाने वाचवले भाविकांचे प्राण



  • मुंबईचे भाविक झाले विमलनाथाला नतमस्तक
  • लक्झरीतले ५० जैन भाविक अपघातातून बचावले
खबरबात / धुळे/  गणेश जैन
बळसाणे  : साक्री तालुक्यातील बळसाणे जैन तीर्थक्षेत्रावर मुंबई येथून बळसाणे तीर्थावर विमलनाथ भगवंताच्या दर्शनार्थ येत असताना लक्झरी चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्यावरील चारीत बस उतरली
   बळसाणे येथील जैन धर्मियांचे मंदिर जगभर प्रसिद्ध असल्याने लांबलांबहून जैन भाविक दर्शनासाठी येत असतात असेच मुंबई येथील अमित भाई गांधी हे नियमितपणे यात्रिक लोकांना देव दर्शनासाठी घेऊन जात असतांनाच सायंकाळी सहा साडेसहा वाजता  ट्रँव्हल्स चालकाचा ताबा सुटल्याने बस ही रस्त्यावरील चारीत जाण्याच्या मागावर असतांनाच ब्रेक मारून जैन भाविकांना बचावले व कुठल्याही प्रकारची इजा नव्हता सुखरूप पणे ट्रँव्हल्स मधून बाहेर आलेत परंतु भाविकांचा डर मात्र निघत नव्हता दुसऱ्या खासगी गाडीतून जैन भाविकांना बळसाणे येथे रवाना करण्यात आले होते पण जैन भाविक निघाले ट्रँव्हल्स मात्र अडकली दरम्यान विश्वकल्याणकाचे ट्रस्टी व ग्रा.पं.सदस्य महावीर जैन यांनी दुसाणे येथील शिवसेना कमलेश वाघ कार्यकर्त्यांसह पदधिकारी होळदाणे ता.साक्री येथे जमा झाले याकामी बळसाणे बापू पारधी तसेच विहीरगाव येथील डॉ. गिरासे व शिवसैनिकांसह आदींनी ट्रँव्हल्स काढण्यास मोठे सहकार्य केल्याचे महावीर जैन यांनी सांगितले बसमध्ये विमलनाथ जाप महिला मंडळाच्या ५० महिला जैन भाविक होते पण कुणालाही इजा न झाल्याचे भाविकांनी सांगितले. 

शुक्रवार, एप्रिल १९, २०१९

ओसवाल जैन समाज संघपती विना पोरका

ओसवाल जैन समाज संघपती विना पोरका

  • ओसवाल जैन समाजात संघपती नसूनही; सकल समाज बांधवांनी विविध कार्य केले पार

गणेश जैन , शिरपूर (धुळे)

शिरपूर :  देश चालविण्यासाठी पंतप्रधानाची गरज आहे राज्य चालविण्यासाठी मुख्यमंत्र्याची तसेच घर चालविण्यासाठी कर्तबगार व्यक्ती ची गरज भासते त्याचप्रमाणे समाजाला चालना देण्यासाठी संघपती म्हणजे अध्यक्षाची गरज आहे अशीच अपबिती शिरपूर येथील ओसवाल जैन समाजाची आहे तत्कालीन संघपती स्वर्गीय ताराचंदजी डागा यांच्या निधनानंतर ओसवाल जैन समाजातील गेल्या चार ते साडे चार वर्षांपासून अध्यक्ष पद रिक्त असून ही समाज बांधव याबद्दल प्रखर भुमिका घेत नसल्याचे दिसून येत आहे शहरात *ओसवाल जैन समाजाचे दोनशे घर आहेत प्रत्येकी घरात संघपती असल्याची पोस्ट सोशलमिडीया वर व्हायरल झाली* या पोस्ट बद्दल सर्व साधरण व्यक्ती कडून ही चर्चे चा विषय होत असल्याचे चित्र दिसून येत आहे
   समाजात संघपती या पदाकरिता अनेक प्रमुख दावेदार असल्याचे समाजबांधवांकडून बोलले जात आहे पण याबाबत चर्चासत्र व विचार विनीमय कुणाकडूनही होत नसल्याचे दिसून येत आहे दरम्यान ओसवाल जैन  समाजाची बैठक अनेकदा झाल्या परंतु संबंधित विषयावरच चर्चा रंगल्या पण प्रामुख्याने आपल्या समाजात गेल्या काही वर्षापासून संघपती पद रिक्त असून त्याबाबत समाजाने कुठल्याही प्रकारची बाजू मांडली  नसल्याची खंत सर्वसामान्य लोकांना लागत आहे
 संघपती नसतांनाही ओसवाल जैन समाज बांधवांनी अनेक मोठमोठे कार्य केलीत पाच दिक्षामहोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थित संपन्न झाले असे अनेक लहान मोठे कार्य युवा पिढीसह अनेकांनी हातभार लावून कार्य यशस्वी करून दाखवले जरी समाजात दोन भाग असले तरी ही समाजकार्यात एकंदरीत होऊन पुढील कार्यक्रम पार पाडतात
 यावर्षाचा महावीर जन्म कल्याणक महोत्सव दिगंबर जैन समाज आणि ओसवाल जैन समाज मिळून मोठ्या उत्साहात जन्मजयंती साजरी केली दोघी समाज एकजूटीने दिसल्याचे पाहून सर्वत्र आनंदाची लाट समाजबांधवामध्ये दिसून येत होती एवढेच नव्हे तर स्वामीवात्सल्य देखील सोबत झाल्याचा आनंदाचा क्षण दिसून येत होता समाज एकंदरीत होण्यासाठी दोघी समाजातील तरुणांनी प्रयत्न केले
 शिरपूरच्या ओसवाल जैन समाज बांधवांनी तातडीने महत्वपूर्ण बैठक घेऊन  समाजकरिता संघपती या पदासाठी नियुक्ती करण्यात यावी अशी अपेक्षा समाज बांधवांनी व्यक्त केली आहे. 

मंगळवार, मार्च २६, २०१९

वृक्षांसाठी झटणारा अवलिया

वृक्षांसाठी झटणारा अवलिया

 धुळे/प्रतिनिधी
आजच्या तापमानाची नोंद पाहता कोणीही आपल्याला बाहेर फिरताना सुद्धा दिसत नाही किंवा पक्षी सुदधा आपल्याला पाहायला मिळत नाहीत. जागतिक तापमान वाढीला सम्पूर्ण पणे मनुष्य जबाबदार आहे. त्याच प्रमाणे मनुष्याने चालवलेली जंगलतोड हे देखील प्रमुख कारण आहे.  
विकास मराठे
विकास मराठे

आज पाहायला गेलं तर वृक्षारोपण सर्वीकडे खूप मोठ्या प्रमाणात करण्यात आले होते परंतु खर पाहायला गेलं तर त्यात किती रोपे , झाडे जगली हे कोणाला विचारायला नको परंतु हे सर्व होत असताना महाराष्ट्र मधील लहानश्या जिल्ह्यामध्ये काम करीत असलेले विकास मराठे आणि त्यांची सम्पूर्ण टीम कडकडीत उन्हाळ्यात देखील वृक्षांचे संगोपन करीत आहेत हे पहावे तेवढ नवलच मागचा पावसाळा झाला की नाही ह्यात शंकाच होती परंतु विकास मराठे ह्या अवलीयाने मोठया दिमाखात सम्पूर्ण लावलेली झाडे जगवलीत झाड फाउंडेशन च्या माध्यमातून त्यांनी धुळे शहर तसेच जवळपास च्या गावांमध्ये वृक्षारोपण केले. आणि फक्त वृक्षारोपण करून बसून न राहता वेळोवेळी त्यांनी त्यांचे संगोपन देखील केले ह्यात त्यांच्या कार्यात सिहाचा वाट उचलणारे प्रसाद पाटील , सचिन देवरे, कुणाल चौधरी , प्रा. प्रशांत खुळे , संदेश दाभाडे, शुभम शिंदे, आकाश माळी , निखिल ठाकरे ह्यांची मोलाची साथ त्यांना लाभली . त्यानी लावलेली झाडे त्यांनी केलेला कमी पाण्यात झाडे जगवण्याचा अवलंबलेला मार्ग खूप रोमांचक करणारे आहेत. त्यांनी झाड फाउंडेशन च्या माध्यमातून केलेल्या कार्याचा गौरव म्हणून झाड  फाउंडेशन ला एक राज्यस्तरीय तर एक जिल्हस्तरिय पुरस्काराने गौरविण्यात आले. गेल्या एक वर्षात केलेले कार्य पाहता कमीत कमी धुळे जिल्हा तरी हिरवा होईल असं चित्र वाटायला लागले आहे. विकास मराठे हे साधारण शेतकरी कुटुंबातील आहेत. तसेच आपल्या कोरड पडलेल्या शेतीला पाहून त्यांनी ह्या कार्याला सुरुवात केली आणि बघता बघता एकच वर्षात झाड खरच एक झाड झाले अस म्हणायला काहिही हरकर नाही . विकास मराठे आणि त्यांची टीम शहरातील मोठया हॉटेल, किंवा शाळा कॉलेज , मंगल कार्यालय ह्या ठिकाणी जाऊन रिकाम्या पडलेल्या बिसलेरी बोटल्स आणून त्याच्या मार्फत झाडांना पाणी देण्याचे काम करतात. ह्यात त्यांची सम्पूर्ण टीम मदत करते , ह्यात प्रसाद पाटील हे एक पर्यावरण प्रेमी तसेच पर्यावरण मित्र पुरस्कार प्राप्त युवा आहेत. त्यामुळे सम्पूर्ण टीम ही पर्यावरण प्रेमी आहे असेच म्हणावे लागेल . आजच्या तरुणांनी ह्या तरुणांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पर्यावरणा चा समतोल राखला पाहिजे तसेच फक्त फोटो काढण्यासाठी वृक्षारोपण न करता खरच त्या रोपणा वाढवलं पाहिजे. 

रविवार, मार्च १०, २०१९

फफूटा चित्रपटाचे प्रोमोशन

फफूटा चित्रपटाचे प्रोमोशन


धुळे / प्रतिनिधी
भूमिपुत्र शेतकरी संघटना धुळे जिल्हा व ड्रीम इव्हेंट्स ह्यांच्या संयुक्त विद्यमानाने शहराजवळ असलेल्या निकम इन्स्टिटयूट मध्ये सत्कार व पुरस्कार प्रदान सोहळा घेणयात आला .
ह्या वेळी आपल्या खान्देशात निर्मित होत असलेला शेतकरी जीवनावरील प्रश्नांना उजाळा देणारा मराठी चित्रपट फफूटा ह्या चित्रपटाचे प्रोमोशन करण्यात आले ह्यावेळी चित्रपटातील कलाकार मा. प्रमोद पाटील उपस्थित होते . ह्यावेळी चित्रपटाविषयी विकास मराठे ह्यांनी थोडक्यात माहिती देताना सांगितले कि सदर चित्रपट हा शेतकऱयांच्या जीवनावर प्रकाश झोत टाकणारा चित्रपट असणार आहे शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी ह्या चित्रपटात मांडण्यात आलेल्या आहेत. शेतकऱ्यांला शेती करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींमध्ये प्रथम "सुपीक" जमीन आणि नंतर "पाणी" लागते. शेतीला मुबलक पाणी असेल तरच शेती करणे शक्य आहे. तिसरी आवश्यक गोष्ट म्हणजे "मनुष्यबळ". हे असले की शेतकरी शेतातील पिकांची निगा राखू शकतो. चौथे म्हणजे शेती करतांना येणारा खर्च पूर्ण करण्यासाठी लागणारा "पैसा" (भांडवल). आणि शेवटी जेथे तो त्याचा उत्पादित शेतमाल विकतो, ती "बाजार पेठ". शेतकऱ्यांसाठी त्याची शेतीच सर्व काही असते. त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि जगातील अन्य लोक कळत न कळत या शेतकऱ्यावर अवलंबून असतात.ह्या कर्यक्रम प्रसंगी भूमिपुत्र शेतकरी सांघटना जिल्हा अध्यक्ष विकास मराठे , उपाध्यक्ष प्रसाद पाटील उपस्थित होते. ह्यावेळी प्रा.रवींद्र निकम सर , आनंद पवार सर , भूपेंद्र मालपुरे सर ह्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . ह्यावेळी महिला दिनाचे औचित्य साधून सामाजिक कार्यकर्त्या मा. किरणताई नवले ह्यांचा युवा रणरागिणी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. विकास मराठे ह्यांना युवा प्रेरणा पुरस्कार व प्रसाद पाटील ह्यांना पर्यावरण प्रेमी पुरस्कार देण्यात आला . ह्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रमोद पाटील , विवेकानंद कॅरियर अकादमी चे संचालक प्रशांत खुले सर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मा.सौ.शुभांगी निकम ह्या होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तोष पाटील ह्यांनी केलॆ.