- मुंबईचे भाविक झाले विमलनाथाला नतमस्तक
- लक्झरीतले ५० जैन भाविक अपघातातून बचावले
बळसाणे : साक्री तालुक्यातील बळसाणे जैन तीर्थक्षेत्रावर मुंबई येथून बळसाणे तीर्थावर विमलनाथ भगवंताच्या दर्शनार्थ येत असताना लक्झरी चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्यावरील चारीत बस उतरली
बळसाणे येथील जैन धर्मियांचे मंदिर जगभर प्रसिद्ध असल्याने लांबलांबहून जैन भाविक दर्शनासाठी येत असतात असेच मुंबई येथील अमित भाई गांधी हे नियमितपणे यात्रिक लोकांना देव दर्शनासाठी घेऊन जात असतांनाच सायंकाळी सहा साडेसहा वाजता ट्रँव्हल्स चालकाचा ताबा सुटल्याने बस ही रस्त्यावरील चारीत जाण्याच्या मागावर असतांनाच ब्रेक मारून जैन भाविकांना बचावले व कुठल्याही प्रकारची इजा नव्हता सुखरूप पणे ट्रँव्हल्स मधून बाहेर आलेत परंतु भाविकांचा डर मात्र निघत नव्हता दुसऱ्या खासगी गाडीतून जैन भाविकांना बळसाणे येथे रवाना करण्यात आले होते पण जैन भाविक निघाले ट्रँव्हल्स मात्र अडकली दरम्यान विश्वकल्याणकाचे ट्रस्टी व ग्रा.पं.सदस्य महावीर जैन यांनी दुसाणे येथील शिवसेना कमलेश वाघ कार्यकर्त्यांसह पदधिकारी होळदाणे ता.साक्री येथे जमा झाले याकामी बळसाणे बापू पारधी तसेच विहीरगाव येथील डॉ. गिरासे व शिवसैनिकांसह आदींनी ट्रँव्हल्स काढण्यास मोठे सहकार्य केल्याचे महावीर जैन यांनी सांगितले बसमध्ये विमलनाथ जाप महिला मंडळाच्या ५० महिला जैन भाविक होते पण कुणालाही इजा न झाल्याचे भाविकांनी सांगितले.