नागपूर/ललित लांजेवार:
इन्फन्ट जिजस पब्लिक हायस्कूलच्या वसतीगृहातील लैंगिक अत्याचारपीडित आदिवासी अल्पवयीन मुलींवरील झालेल्या अत्याचारा संदर्भात बेताल वक्तव्यानंतर कचाट्यात सापडलेल्या सुभाष धोटेंना अखेर आपल्या काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला.सुभाष धोटे यांनी हा राजीनामा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. खासदार श्री. अशोकरावजी चव्हाण यांनी तो स्विकारला आहे.नव्या जिल्हा अध्यक्षांची नियुक्ती लवकरच केली जाईल,अशी माहिती प्रदेश सरचिटणीस ऍड. गणेश पाटील यांनी दिली आहे.
१२ एप्रिल ला इन्फन्ट जिजस पब्लिक हायस्कूलच्या वसतीगृहात लैंगिक अत्याचार झाल्याची घटनापुढे आली होती.याच प्रकरणात चौकशी सुरु असतांना पत्रपरिषदेत सुभाष धोटे यांनी निर्भया' किंवा पॉस्को कायद्याअंतर्गत राज्य सरकारकडून 3 लाख किव्हा 5 लाख रुपयांची मदत मिळते. त्यामुळे अनेक तरुणी आणि त्यांचे पालक पैशासाठी गुन्हा नोंदवण्यासाठी पुढे येत आहेत, हासुद्धा पब्लिसिटीचा धंदा झाला आहे, असं वक्तव्य करताच सुभाष धोटेंवर असंवेदनशीलतेचा कळस गाठल्याची टीका व्हायला लागली.
पत्रपरिषदेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी हे बेताल वक्तव्य केले होते. या वक्तव्याने आदिवासी समाज व जनमाणसात संतापाची लाट उसळली होती.या नंतर विविध सामाजिक व राजकीय पक्षांकडून,मंडळांकडून,सुभाष धोटेंच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली,या नंतर विजय वडेट्टीवार यांनी सुभाष धोटे यांना या प्रकरणातून जोपर्यंत निर्दोष सुटका होत नाही. तोपर्यंत काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदापासून दूर राहण्याची विनंती करणार आहे असे पत्रपरिषदेत सांगितले होते.या नंतर त्यांना राज्य महिला आयोगाने नोटीस देखील बजावली होती. त्या नंतर गुरुवारी धोटे यांनी हा राजीनामा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला. या प्रकरणात सद्या सुभाष धोटे व इतर तीन या आशयाखाली रामनगर पोलीस स्टेशन चंद्रपूर येथे ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पशुखाद्य |
पोल्ट्रीफीड |