हैद्राबादच्या ग्लेनिएगल्स ग्लोबल हॉस्पिटलचा जागतिक यकृत दिनानिमित्त यकृत संबंधित उपचारांचे प्रमुख केंद्र म्हणून उदय
विदर्भ, मराठवाडा, सोलापूर आणि कोल्हापूर या भागांतील रुग्णांवर विविध यकृत रोगांवर उपचार
२५ एप्रिल २०१९: ग्लेनिएगल्स ग्लोबल हॉस्पिटल्स, लकडी-का-पूल तर्फे सर्वांत व्यापक व व्यग्र यकृत रोग व्यवस्थापन उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या केंद्रातर्फे प्रौढ तसेच, बालकांवरही यकृत प्रत्यारोपण प्रक्रिया करण्यात येतात. आजवर या रुग्णालयात ७००हून अधिक यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून यात १००हून अधिक बालकांचा समावेश आहे. महाराष्ट्रातल्या विदर्भ, मराठवाडा, सोलापूर आणि कोल्हापूर या भागांतील ५०हून अधिक रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला असून त्यांच्यावर यकृताच्या विविध रोगांसाठी उपचार प्रक्रिया सुरू आहेत. यकृत रोगनिवारणासाठी प्रसिद्ध असलेल्या या केंद्राने अद्वितीय वैद्यकीय निष्कर्षांतून अनेक आंतरराष्ट्रीय मानके पार केली आहेत. या रुग्णालयात वैशिष्ट्यपूर्ण यकृत अतिदक्षता विभाग व यकृत शस्त्रक्रिया विभाग आहेत. ग्लेनिएगल्स ग्लोबल रुग्णालयांत बालकांचे रोग, स्वॅप-लिव्हर ग्राफ्ट, स्प्लिट लिव्हर आणि अक्यूट लिव्हर फेल्युअर ट्रान्सप्लाण्ट आदी उपचार करण्यासाठी तज्ञ डॉक्टरमंडळी उपस्थित असल्यामुळे इतर रुग्णालयांपासून हे केंद्र वेगळे ठरते.
या रुग्णालयाने जगाच्या आरोग्यसेवा नकाशावर यकृत रोग व्यवस्थापनाच्या बाबतीत हैद्राबादचे नाव मोठे केले असून गेल्या १५ वर्षांत श्रीलंका, बांग्लादेश, यूएई, आफ्रिका, पाकिस्तान, सुदान, अफगाणिस्तान, मालदिव्स, युरोप आदी देशांतील रुग्णांनी या रुग्णालयांमध्ये उपचार घेतले आहेत.
हा अद्वितीय प्रवास २००३मध्ये सुरू झाला. भारतीय लोकांना अवयव प्रत्यारोपणाच्या सेवा पुरवण्यात आपल्याकडील आरोग्यसेवा क्षेत्र प्रचंड मागे पडते, हे कटू सत्य दूरदृष्टीचे नेते, प्रसिद्ध सल्यविशारद आणि ग्लेनिएगल्स ग्लोबल रुग्णालयांचे संचालक डॉ. के. रविंद्रनाथ यांच्या लक्षात आले. रुग्णांना मृत्यू स्विकारण्यावाचून पर्याय नव्हता, याची जाणीव झाल्यावर त्यांनी भारतातच जागतिक दर्जाचे बहुअवयव प्रत्यारोपण केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
त्यांनी व त्यांच्या टीमने लंडन येथील किंग्स कॉलेज हॉस्पिटल्सशी (जगातील यकृत प्रत्यारोपण क्षेत्रातील सर्वांत प्रसिद्ध रुग्णालय) संपर्क साधून भारतात भव्य यकृत प्रत्यारोपण प्रोग्रॅम उभारण्याचा चंग बांधला.
हैद्राबाद, चेन्नई आणि मुंबई येथे ग्लेनिएगल्स ग्लोबल हॉस्पिटल्सतर्फे यकृत, मूत्रपिंड, हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण उपक्रम आयोजित केले जातात. समुहांतर्गत २५०० यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात येत असून अद्वितीय यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेच्या बाबतीत ग्लेनिएगल्स ग्लोबल हॉस्पिटल्स जागतिक दर्जाचे नाव बनले आहे.
अवयव प्रत्यारोपण रुग्णांपैकी पात्र रुग्णांना आवश्यक ती आर्थिक मदत करण्यासाठी ग्लोबल हॉस्पिटल्स एनजीओ, हितचिंतक व सहाय्यक समुहांसोबत सक्रीयपणे काम करतात.
रुग्णालयाच्या यशस्वी वाटचालीबद्दल बोलताना ग्लेनिएगल्स ग्लोबल हॉस्पिटल्स, लकडी-का-पूल येथील वरीष्ठ कन्सल्टण्ट हिपॅटोलॉजिस्ट आणि लिव्हर फिजिशियन डॉ. धर्मेश कपूर म्हणाले, ''अल्कोहोलमुळे यकृताच्याया अनेक समस्या निर्माण होतात. सिव्हियर अल्कोहोलिक हिपॅटायटिसपासून अल्कोहोलिक सिरॉसिस आणि पोर्टल हायपरटेन्शन, लठ्ठपणा आणि मेटाबॉलिक सिण्ड्रोम आदी आजार यामुळे बळावतात. या सगळ्यामुळे आपण बऱ्याच धोकादायक नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आजारांना सामोरे जातो. यकृत व कार्डिओ-व्हॅस्क्युलर आजारांवर वजन कमी केल्याने मोठा फरक पडू शकतो. अक्यूट लिव्हर फेल्यूअर सिण्ड्रोम असलेल्या रुग्णांना त्वरित यकृत प्रत्यारोपणाची गरज असते.''
ग्लेनिएगल्स ग्लोबल हॉस्पिटल्स, लकडी-का-पूल येथील वरीष्ठ सल्लागार एचपीबी आणि यकृत प्रत्यारोपण शल्यविशारद डॉ. बलबीर सिंग म्हणाले, ''ग्लेनिएगल्स ग्लोबल हॉस्पिटल्स, लकडी-का-पूल येथील प्रत्यारोपण उपक्रम हा हैद्राबादमधील सर्वांत जुना व व्यापक उपक्रम आहे. यकृत व पॅनक्रियाटिक केअरसाठी आमच्याकडे विशेष विभाग आहेत. रुग्णांच्या व्यापक श्रेणींना सर्वतोपरी उत्तम सेवा देण्यासाठी विविध अवयव प्रत्यारोपण तज्ञांची खास टीम आमच्याकडे तैनात आहे.''