Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, एप्रिल २५, २०१९

गोएअर तर्फे नागपुर ते दिल्ली दरम्यान दोन नवीन थेट विमान सेवा


26 एप्रिल 2019 पासून दिल्लीतून दोन नॉन-स्टॉप विमान सेवा
एक दैनंदिन नॉन-स्टॉप विमान सेवा मुंबईतून
  • नागपूरकरांना दिल्लीपासून आणि दिल्लीतून फ्लाईटद्वारे एका दिवसात परतीचा प्रवास मिळून आपल्या दिवसाचा जास्तीतजास्त लाभ घेता येऊ शकेल
  • सध्या गोएअर नागपूर ते बंगळुर, गोवा, मुंबई, पुणे अशा पाच विमान सेवा देत असून, यानंतर एकूण विमान सेवांची संख्या 8 वर जाईल
  • मुंबईत, 26 एप्रिल 2019 पासून विमानसेवा क्रमांक जी8 2000 ते जी8 2999 चे आगमन आणि निर्गमन टर्मिनल टी2 वरून होईल
गोवा, 25 एप्रिल, 2019: गोएअर या भारताच्या सर्वात वेगाने वाढणाऱ्या विमान कंपनीने आज नागपूर ते दिल्ली दरम्यान 2 आणि मुंबई ते नागपूर दरम्यान एका थेट विमान सेवांची घोषणा केली आहे. यातून कंपनीने आपल्या सेवांमध्ये वाढ करत त्याला बळकटी दिली आहे आणि त्याचबरोबर आपल्या बहुमुल्य ग्राहकांना बहुविध स्मार्टफ्लायचा पर्याय ही दिला आहे. या उन्हाळ्यात 26 एप्रिल 2019 पासून प्रवासी नागपूर-दिल्ली-नागपूर आणि नागपूर-मुंबई-नागपूर अशा सुधारित कनेक्टीव्हिटीद्वारे गो-फॉर-मोअरचा आस्वाद घेऊ शकतात.
नव्याने लागू करण्यात आलेले अतिरिक्त फ्लाईट शेड्युल खालीलप्रमाणे आहे:


अनु. क्र.
फ्लाईट क्र.
स्थान
निर्गमन
गंतव्य स्थान
पोहचण्याची अपेक्षित वेळ
फ्रिक्वेन्सी
1
G8-2516
नागपूर 
9:10
दिल्ली
10:50
दैनंदिन थेट
2
G8-2520
नागपूर 
21:25
दिल्ली
23:20
दैनंदिन थेट
3
G8-2602
नागपूर 
8:50
मुंबई
10:10
दैनंदिन थेट

गोएअर आधीपासूनच 5 विमानसेवा नागपूर ते बंगळूरू, गोवा, मुंबई आणि पुणे दरम्यान चालवत आहे, यानंतर नागपूरसाठीच्या एकूण विमानसेवा 8 पर्यंत वाढतील आणि गोएअरसाठी नागपूर एक महत्वाचे केंद्र बनेल.

सध्याच्या विमानसेवा:
अनु. क्र.
फ्लाईट क्र.
स्थान
निर्गमन
गंतव्य स्थान
पोहचण्याची अपेक्षित वेळ
फ्रिक्वेन्सी
1
G8-284
नागपूर
20:55
बंगळूरू
00:10
दैनंदिन पुणे मार्गे
2
G8-811
नागपूर
06:00
बंगळूरू
07:40
दैनंदिन थेट
3
G8-141
नागपूर
09:20
गोवा
12:45
दैनंदिन मुंबई मार्गे
4
G8-141
नागपूर
09:20
मुंबई
10:50
दैनंदिन थेट
5
G8 284
नागपूर
20:55
पुणे
22:15
दैनंदिन थेट

या शुभारंभाच्या प्रसंगी गोएअरचा प्रवक्ता म्हणाला की “यंदाच्या ऊन्हाळ्यात नागपूर ते भारताची राजधानी दिल्ली दरम्यान 2 थेट विमानसेवांची घोषणा करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. वेळांची निवड अशा प्रकारे करण्यात आली आहे की नागपूरचे नागरिक दिल्लीसाठी एकाच दिवसात विमानाने जाऊन परत येऊ शकतील. मुंबईसाठी गोएअर आता दोन विमानसेवा देत आहे ज्यामुळे आता मुंबईत पोहोचणे सगळ्यांसाठीच सहज असेल.  

एकूण आठ विमानसेवांद्वारे गोएअर प्रवाशांना उच्च दर्जाची ग्राहक सेवा आणि परवडणारे दर यातून पैसा वसूल सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे. सुरक्षित आणि कार्यक्षम परिवहन सेवा सदा सर्वकाळ देण्यासाठीसुद्धा कटिबद्ध आहे. आमच्या परिचालक सक्षमतेमुळे सलग सात महिने गो एअर कंपनी ऑन टाईम परफॉर्मन्स (ओटीपी)मध्ये प्रथम क्रमांकावर आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. मुंबईत विमान सेवा क्रमांक जी8 2000 ते जी8 2999 चे आगमन आणि निर्गमन टर्मिनल 2 वरून होईल.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.