नागपूर- मुंबईत 1993 ला झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी अब्दुल गानी तुर्क याचा नागपूरमधील जीएमसी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. तुर्क हा नागपूरमधील मध्यवर्ती तुरुंगात कैद होता. तुर्क हा या बॉम्बस्फोटाप्रकरणी दोषी ठरविण्यात आलेला आठवा व्यक्ती होता. याच्यावर आरडीएक्सचा साठा करून ठेवल्याचा आरोप होता.
12 मार्च 1993 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 257 जण मृत्यूमुखी पडले होते. तर 713 जण जखमी झाले होते. एकूण 21 कोटी रूपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले होते. तर बॉम्बस्फोट घडवण्यासाठी 3 हजार किलो आरडीएक्सच वापर केला गेला. या बॉम्बस्फोटाचे मुख्य सूत्रधार म्हणून याकूब मेमनला फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानुसार त्याला फाशी देखील देण्यात आली.