सावली तालुका आदिवासी अघाड़ी तर्फे कॉंग्रेस नेत्यांच्या विरोधात तिव्र निदर्शने
सावली(प्रतिनिधी):
राजुरा येथील इन्फन्ट जीजस शाळेतील आदीवासी विद्यार्थ्यांनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी ब्रम्हपुरी विधानसभेचे आमदार विजय वडेट्टीवार, काँग्रेस जिल्हा अध्यक्ष सुभाष धोटे व काँग्रेस चंद्रपर लोकसभा उमेदवार बाळू धानोरकर यांनी निर्लज्जपणे केलेले वक्तव्य म्हणजे आदिवासी समाजाचा जाणूनबुजून केलेला अपमान आहे. याने काँग्रेसचा आदिवासी समाज बद्दल असणारा त्यांचा खरा चेहरा उघडकीस आला आहे. मुळात स्त्रियांचा अपमान करणे हीच भुमिका आजवर कॉंग्रेसने घेतली आहे. अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी पालक केवळ मदतीच्या लालसेने अत्याचार झाले असे सांगण्यास सरसावले असे म्हणणे म्हणजे कॉंग्रेस नेत्यांच्या विकृत मानसिकतेचे निदर्शक असल्याचे मनोगत यावेळी मोर्चा समोर आदिवासी नेत्यांनी व्यक्त केली.
सावली येथील महात्मा फुले यांचा पुतल्या जवळ आदिवासी समाज च्या विविध संघटना एकत्र येत मोर्चा काढले या मोर्चा ची सुरुवात झाली मोर्चा हा मुख्य मार्गानी तहसील कार्यालयावर धड़कला.त्यानंतर मोर्चा ला संपत कन्नाके,केशव तिरानीक, जिप सदस्य योगिता डबले,मनोज मडावी,अनिल मडावी,पारोमिता गोस्वामी यांनी मार्गदर्शन केले. आरोपिनां फाशी ची शिक्षा देण्यात यावी,बेताल व्यक्तव्य करणाऱ्या नेत्यावर अक्ट्रेसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करुण अटक करण्यात यावी,पीडिताना न्याय देण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली सदर निवेदन तहसीलदार कुमरे यांना देण्यात आले.
यावेळी आदिवासी आघाडीचे पदाधिकारी,श्रमिक एल्गार व समाज बांधवांनी निषेधाचे फलक दाखवत कॉंग्रेस नेत्यांच्या विरोधात जोरदार नारेबाजी केली. विजय सिद्धावार, घनशाम मेश्राम, संतोष दळांजे, वसंत मडावी,जगदीश कोवे, विजय कुमरे, पुरुषोत्तम कन्नाके,संध्या मडावी,जया कुमरे,अतुल कोडापे,प्रवीण गेडाम,लखन मेश्राम या प्रमुख पदाधिकारी सह एल्गार चे कार्यकर्ते व आदिवासी समाजाचे कार्यकर्ते,महिला मोठ्या संख्येने उपस्थिती होते.संचालन विशाल नर्मलवार यांनी केले तर राष्ट्रगीत ने मोर्चा चा समारोप झाला
आज सावली मधे विविध संघटनेच्या वतीने राजुरा येथील आदिवासी विद्यार्थिनीनी च्या अत्याचार विरोधात व त्यांचा विरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या कांग्रेस चे नेते आमदार विजय वडेटटीवार, कांग्रेस जिल्हा अध्यक्ष सुभाष धोटे,आमदार बालु धानोरकर यांचा निषेध करण्यासाठी भव्य मोर्चा काढण्यात आला. मोर्चा च्या शेवटचा वेळी महिला कडून नेत्यांच्या फ़ोटो ब्यानर ला जोडेमार आंदोलन करण्यात आले.यावेळी मोर्चातिल अनेक महिलांनी जोड़े,चप्पल नी मारहाण करुण त्यांचा प्रतिमेला आग लावली व जोरदार घोषणा बाजी करित निषेध करण्यात आला.
कार्यकर्ते विशाल नर्मलवार, अमर कड्याम अतुल कोडापे, गौवरव शामकुळे, संगिता गेडाम, शितल वाडगुरे, राधा मडावी, शुभम येरमे, ओमकार कोवे, पियुष रामटेके,यासह शेकडो लोकं सहभागी होते.