सिंदेवाही/प्रतिनिधी:
राजुरा जि. चन्द्रपुर येथील इन्फन्ट जिजस निवासी शाळेतील आदिवासी विद्यार्थींनीवरील अत्याचार प्रकरणी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष व संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांनी निर्लज्जपणे केलेले वक्तव्य, तसेच आमदार विजय वडेट्टीवार यांनी त्या वक्तव्याचे केलेले समर्थन यातुन कॉंग्रेसचा खरा चेहरा उघडकीस आला आहे. मुळात स्त्रियांचा सन्मान न करणे हीच भुमिका आजवर कॉंग्रेसने घेतली आहे. अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी पालक केवळ मदतीच्या लालसेने अत्याचार झाले असे सांगण्यास सरसावले असे म्हणणे म्हणजे त्या कॉंग्रेस नेत्यांच्या विकृत मानसिकतेचे निदर्शक असल्याची टिका माजी पंचायत समिती सदस्य मुरलीधर मड़ावी यांनी केली.
दि. 24 एप्रिल 2019 रोजी पोलीस स्टेशन सिंदेवाही येथे भाजपा आदिवासी अघाड़ी तर्फे निदर्शने करत पोलीस निरीक्षक सिंदेवाही याचे मार्फत मा. जिल्हा पोलीस अधीक्षक चन्द्रपुर यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात आमदार विजय वडेट्टीवार,यांनी माजी आमदार व संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष श्री. सुभाष धोटे यांनी केलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांनींबाबत केलेल्या असभ्य वक्तव्यचे समर्थन वडेटटीवार, यांनी केल्यामुळे त्यांचा तिव्र निषेध करण्यात आला. यावेळी भाजपा पदाधिकारी व भाजपा आदिवासी अघाड़ी च्या कार्यकर्त्यांनी निषेधाचे फलक फडकवत त्या कांग्रेस नेत्यांच्या विरोधात जोरदार नारेबाजी केली. यावेळी श्रीरामजी डोंगरावर , शीलताई कन्नाके , रितेश अलमस्त , हितेश सुचक , गोपीचंद गणवीर-माजी अध्यक्ष, सिंदेवाही तालुका भा. ज. पा.हितेश सुचक उपाध्यक्ष, नगर पंचायत सिंदेवाही कैलाश कुमरे, मुरलीधर मड़ावी ,राजु किन्नाके ,कांचन कुमरे ,रविंद्र तोडासे , कैलाश शीडाम ,राजु वरखड़े , आशीष जुमनाके ,मंगेश धुर्वे , विश्वनाथ मड़ावी , मेघश्याम शीडाम , राहुल कावळे , विशाल कोलपेकवार , राहुल कुंटावार , हार्दिक सुचक प्रामुख्याने उपस्थिती होते.