Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, एप्रिल २५, २०१९

पेंचन लामा यांच्या मुक्ततेसाठी तिबेटी महिलांची नागपूर ते रायपूर पदयात्रा



नागपूर- तिबेटचे १३ वे धर्मगुरू पेंचन लामा यांच्या सुटकेसाठी आज '' तिबेटी महिला संघटनेतर्फे आज नाग सिव्हिल लाईन स्थित संविधान चौकात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याअंतर्गत महाराष्ट्र, छत्तीसगढ आणि ओडिशा राज्यातील विविध जिल्ह्यातून सुमारे १२० महिला कार्यकर्त्या नागपूर ते रायपूर पदयात्रा काढणार असून याची, सुरवात आज, गुरुवारी नागपुरातील रिझर्व्ह बँक चौकातून झाली. 

दलाई लामांचे ११ वे शिष्य असलेले पेंचन लामा गेली २४ वर्षे चीनी सरकारच्या ताब्यात आहेत. विशेष म्हणजे आज, गुरुवारी २५ एप्रिल रोजी पेंचन लामा यांचा ३० वा जन्मदिवस असून त्यांच्या सुटकेसाठी देशभरातील तिबेटी नागरिकांतर्फे वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १९९५ साली दलाई लामांद्वारे सहा वर्षाच्या ग्येहुन च्योकी नीमा यांना ११ वे पेंचन लामा म्हणून मान्यता मिळाली होती मात्र चीन सरकारने पेंचन लामा त्यांच्या पूर्ण परिवाराला बंदिवासात टाकले.

मागील २४ वर्षांपासून पेंचन लामांच्या सुटकेसाठी अनेक तिबेटी संस्था आणि सामान्य नागरिक कार्यरत आहेत. चीन सरकाने लवकरात लवकर पेंचन लामा यांची मुक्तता करावी यासाठी रणरणत्या उन्हाची तमा न बाळगता तिबेटी महिला नागपूर ते रायपूर पायी प्रवासा करणार असून पदयात्रेचा समारोप ६ मे रोजी रायपूर येथे होणार आहे. त्याचप्रमाणे देशात पाच वेगवेळ्या क्षेत्रातून शांती यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी उपस्थित महिला कार्यर्त्यांनी पेंचन लामा यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्यात आणि भारत सरकार तसेच नागरिकांना या अभियानास प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. नागपूर ते रायपूर हा २८३ कि. मी चा प्रवास रोज २० किलोमीटरची पदयात्रा करून पूर्ण करण्यात येणार आहे. चीनचे खोटो लामा अमान्य-डोलमा स्टीरिंग यासंदर्भात माहिती देताना तिबेट महिला संघाच्या सह सचिव आणि संयोजिका डोलमा स्टीरिंग यांनी सांगितले की, जनतेचा आवाज दाबून चीनी सरकारने स्वःतचे दुसरे पेंचन लामा घोषित केले आहे. परंतु, हे खोटे लामा तिबेटच्या नागरिकांना हे मान्य नाहीत. भारतासह इतर देशांनी चीनच्या या दडपशाहीचा विरोध करावा आणि पेंचन लामा यांच्या सुटकेसाठी तिबेटला पाठिंबा द्यावा असे आवाहन डोलमा स्टीरिंग यांनी यावेळी केले. तिबेट सुरक्षित होणे सामरिक दृष्ट्या भारतासाठी महत्वाचे असून चीन करत असलेल्या अमानवीय अत्याचाराविरुद्ध संपूर्ण जगाने एक येण्याची गरज आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.