आभारपत्र
मनुष्य जीवनात वित्त आणि श्रमाची जितकी किंमत आहे, तितकीच किंमत ही वेळेचीही आहे,असे मला वाटते
आपण आपल्या आयुष्यातील अनमोल वेळ काढून माझ्या वाढदिवसाच्या दिवशी फोन,टेक्स्ट* मेसेजेस, व्हाट्सअप, फेसबुक,ई.सोशल मिडीयाच्या माध्यमातून तसेच पर्सनली भेटून दिवसभर माझ्या वाढदिवसानिमित्त ज्या शुभेच्छ्या दिल्या त्याबद्दल मी आपला शतशः ऋणी आहे.
तसेच बऱ्याच जणांनी मनोमन दिलेल्या शुभेच्छ्यांचाही मी स्वीकार करतो तसेच ईच्छा असतांनाही वेळे अभावी* शुभेच्छ्या देऊ न शकलेल्या माझ्या सर्व स्नेही जणांचाही मी आभारी आहे.
आपण दिलेल्या ह्या शुभेच्छ्यांच्या जोरावर मी माझ्या पुढील आयुष्यात गरूड झेप घेईल यात तीळ मात्र शंका नाही..
आपले हे प्रेमच आयुष्याचा मूळ भाग असलेल्या देव, देश, धर्म अर्थात थ्री डी च्या संकल्पना माझ्या आयुष्यात दृढवत करतील. यापुढील आयुष्य पर्वात आपले प्रेम आणि साथ अशीच कायम स्वरूपी रहावी,अशी बळसाण्याच्या सावळ्या विठोबा चरणी प्रार्थना करतो..तसे खरंतर आपल्या माणसांना धन्यवाद देणे म्हणजे परके.... केल्या सारखे वाटते पण व्यक्त झाल्या शिवाय कधी-कधी पर्यायच नसतो !
बघायला गेलंतर आज माझा वाढदिवस नव्हताच मुळी, होत ते तुमचे सर्वांचे प्रेम, काळीज, सदिच्छा,आशिर्वाद व आज वर मिळालेली अतुट अशी तुम्हा सर्वांची खंबीर साथ अशा पवित्र भावनांचा तो "सोहळा" होता माझ्यासाठी*
माझ्या वाढदिवसा च्या दिवशी आजी , आजोबा , आई , बाबा , ताई , दाजी ,दादा , वहिनी ,सासु , सासरे , दै.लोकमत (परिवार) व पत्रकार , संपादक राजकीय पदधिकारी , डाँक्टर्स , व्यापारी वर्ग , शिक्षकव्रुंध्द तसेच विविध क्षेत्रातील लहान,थोरांनी-मोठ्यांनी तसेच माझ्या मित्र परिवाराने दिलेल्या अमुल्य शुभेच्छा व अनेक उत्तम आशिर्वादांचा मी मनापासुन स्विकार केले व सोबतच गेल्या वर्षभरात काही चुका माझ्याकडुन झाल्या असतील किंवा अजाणतेपणामुळे कुणाचे मन दुखावले गेली असेल तर त्याबद्दल मी हात जोडून क्षमा मागतो !
आणि तुम्ही गणेशला क्षमा कराल एवढे मात्र निश्चित
असेच स्नेह, प्रेम व आशिर्वाद तुमच्या गणेश जैन वर निरंतर राहु द्या !!
हिच पांडुरंग चरणी अपेक्षा
पुनःश्च एकदा सर्वांचे धन्यवाद !
गणेश जैन, पत्रकार
8888965296
बळसाणे