Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मे ०६, २०१९

आगरपाड्यात उन्हाळ कांदा काढून चाळीत साठवणूक सुरु

माळमाथा परिसरातील शेतकरी उन्हाळी कामात व्यस्त

खबरबात , धुळे/गणेश जैन

बळसाणे : बळसाणे गावासह माळमाथा भागातील शेतकरी सध्या उन्हाळी कामात व्यस्त आहे ठिकठिकाणी उन्हाळी कांदा काढून चाळीत किंवा शेतातच ढिग करून ठेवणे व शेतातील निंदणी व फवारणी फुटवा बांधणी , भाजीपाल्याची काढणी आदी माळमाथ्याचा शेतकरी व्यस्त असल्याचे दिसून येत आहे

  डिसेंबर ते जानेवारी दरम्यान लागवड केलेला कांदा एप्रिल, मे च्या दरम्यान काढला जातो बळसाणेसह आगरपाडा , दुसाने , इंदवे , हाट्टी , ऐचाळे , सतमाने , कढरे , छावडी , अमोदा , घानेगाव , लोनखेडी , फोफरे , आखाडे ,फोफादे , परसुळे आदी परिसरातील काही शेतकऱ्यांचा उन्हाळी कांदा काढून झाला आहे आणि उर्वरित भागात अजून कांदा काढणे सुरु आहे ज्या शेतकऱ्याचा कांदा काढून झाला आहे त्यांनी ऊन ,वारा व अवकाळी पावसापासून बचाव करण्यासाठी कांद्याच्या ढिगावर पात पसरून त्यावर उसाचे पाचट व ताडपत्री टाकून झाकून ठेवली आहेत आणि काही ठिकाणी अजूनही उशीराने लावलेले कांदे मजूरांकडून भरून चाळीत नेऊन टाकले जातात कांदे निवडून मजूरांकडून साठवण्याची लगबग सुरु आहे मजूरांची टंचाई असल्याने ठेकेदारी पध्दतीने ही कामे उरकली जात नाही

सध्या अधिक तापमानामुळे दिवसभर उकाडा जाणवतो त्यातच आकाशात काळ्या ढगांची गर्दी लक्षणे घेता बेमोसमी पाऊस कोसळण्याची शक्यता राहते अनेक ठिकाणी वारा व गारांसह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने बळीराजाचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे माळमाथा भागातील शेतकऱ्यांची कांदा चाळीत साठवणूक करण्याची धावपळ सुरू आहे
भागवत भिवा ठेलारी , शेतकरी (आगरपाडा)

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.