- ओसवाल जैन समाजात संघपती नसूनही; सकल समाज बांधवांनी विविध कार्य केले पार
गणेश जैन , शिरपूर (धुळे)
शिरपूर : देश चालविण्यासाठी पंतप्रधानाची गरज आहे राज्य चालविण्यासाठी मुख्यमंत्र्याची तसेच घर चालविण्यासाठी कर्तबगार व्यक्ती ची गरज भासते त्याचप्रमाणे समाजाला चालना देण्यासाठी संघपती म्हणजे अध्यक्षाची गरज आहे अशीच अपबिती शिरपूर येथील ओसवाल जैन समाजाची आहे तत्कालीन संघपती स्वर्गीय ताराचंदजी डागा यांच्या निधनानंतर ओसवाल जैन समाजातील गेल्या चार ते साडे चार वर्षांपासून अध्यक्ष पद रिक्त असून ही समाज बांधव याबद्दल प्रखर भुमिका घेत नसल्याचे दिसून येत आहे शहरात *ओसवाल जैन समाजाचे दोनशे घर आहेत प्रत्येकी घरात संघपती असल्याची पोस्ट सोशलमिडीया वर व्हायरल झाली* या पोस्ट बद्दल सर्व साधरण व्यक्ती कडून ही चर्चे चा विषय होत असल्याचे चित्र दिसून येत आहे
समाजात संघपती या पदाकरिता अनेक प्रमुख दावेदार असल्याचे समाजबांधवांकडून बोलले जात आहे पण याबाबत चर्चासत्र व विचार विनीमय कुणाकडूनही होत नसल्याचे दिसून येत आहे दरम्यान ओसवाल जैन समाजाची बैठक अनेकदा झाल्या परंतु संबंधित विषयावरच चर्चा रंगल्या पण प्रामुख्याने आपल्या समाजात गेल्या काही वर्षापासून संघपती पद रिक्त असून त्याबाबत समाजाने कुठल्याही प्रकारची बाजू मांडली नसल्याची खंत सर्वसामान्य लोकांना लागत आहे
संघपती नसतांनाही ओसवाल जैन समाज बांधवांनी अनेक मोठमोठे कार्य केलीत पाच दिक्षामहोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थित संपन्न झाले असे अनेक लहान मोठे कार्य युवा पिढीसह अनेकांनी हातभार लावून कार्य यशस्वी करून दाखवले जरी समाजात दोन भाग असले तरी ही समाजकार्यात एकंदरीत होऊन पुढील कार्यक्रम पार पाडतात
यावर्षाचा महावीर जन्म कल्याणक महोत्सव दिगंबर जैन समाज आणि ओसवाल जैन समाज मिळून मोठ्या उत्साहात जन्मजयंती साजरी केली दोघी समाज एकजूटीने दिसल्याचे पाहून सर्वत्र आनंदाची लाट समाजबांधवामध्ये दिसून येत होती एवढेच नव्हे तर स्वामीवात्सल्य देखील सोबत झाल्याचा आनंदाचा क्षण दिसून येत होता समाज एकंदरीत होण्यासाठी दोघी समाजातील तरुणांनी प्रयत्न केले
शिरपूरच्या ओसवाल जैन समाज बांधवांनी तातडीने महत्वपूर्ण बैठक घेऊन समाजकरिता संघपती या पदासाठी नियुक्ती करण्यात यावी अशी अपेक्षा समाज बांधवांनी व्यक्त केली आहे.