चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूरात सुरु असलेल्या माता महाकालीच्या यात्रेत भक्तीचा महापूर ओसळला असून बाहेर जिल्हातील भाविक मोठ्या संख्येने चंद्रपूरात दाखल झाले आहे. या भाविकांच्या सेवेसाठी महाकाली लंगर सेवा समीतीच्या वतीने आज शुकवारी भोजनदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रथेनूसार नवैद्याचा भोग डोक्यावर घेवून किशोर जोरगेवार कार्यक्रम स्थळी पोहचले त्यानंतर जोरगेवार यांच्या हस्ते माता महाकालीला नवैदाचा भोग चढवीण्यात आला.
नंतर महाप्रसाद कार्यक्रमाला सुरुवात झाली.यावेळी जोरगेवार यांनी महाप्रसाद वितरण केले.
चैत्र महिन्यात सुरु होणाÚया महाकाली मातेची यात्रा शेवटच्या टप्प्यात पोहचली आहे. या यात्रेसाठी नांदेड, तेलंगाना, छत्तीसगढ, आंध्र प्रदेश या राज्यातून लाखो भाविक मातेच्या दर्शनासाठी चंद्रपूर नगरीमध्ये दाखल झाले आहे. यात्रेमध्ये आलेल्या भाविकांच्या सेवेसाठी अनेक सेवाभावी संस्था काम करत आहे. महाकाली लंगर सेवा समितीच्या वतीनेही दरवर्षी हनूमान जंयतीच्या दिवशी महाप्रसादाचे वितरण करण्यात येते. यंदाही त्यांच्या वतीने आज षुक्रवारी महाकाली मंदिर परिसरात भव्य महाप्रसाद वितरणाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक, अध्यक्ष किशोर जोरगेवार यांनी सहपत्निक महाकाली मातेच्या मूर्तीचे पूजन करून समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या भोग पालखीत सहभाग नोंदवीला. महाकाली मंदिर परिसरातून निघालेल्या या पालखीत मानाचा भोग प्रथेनूसार डोक्यावर घेवून जोरगेवार पालखीसह कार्य्रक्रमस्थळी पोहचले. यावेळी येथे जोरगेवार यांच्या हस्ते महाकाली मातेची आरती करण्यात आली. त्यानंतर महाप्रसाद वितरण कार्य्रक्र्रमाला सुरुवात झाली.
यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसाद कार्य्रक्र्रमाचा लाभ घेतला. याप्रसंगी महाकाली लंगर सेवा समिती, चंद्रपूर चे अध्यक्ष, चांगदेव पोडे, उपाध्यक्ष, श्रीकृश्ण करपाचे, सचिव, भिवसन गौरकर, सहसचिव, परषुराम ठोंबरे, कोशाध्यक्ष, समर घरामी, मुर्लिधर कामडे, अषोक तिडके, गौतम दूपारे, रत्नाकर खरालकर, प्रमोद बोरीकर, तिरूपती नाथर, अमोल मंगम, नितेष दर्वे, नलिनी निखाडे, षालिनी कायरकर, पी. राजमोहर, प्रषांत दागमवार, प्रषांत तेजे, श्रीकांत अंजीकर, जी. एस. देषमुख, दीपक दापके, बलराम डोडानी, अजय जैस्वाल, सुधीर माजरे, संदीप कष्टी, राहुल मोहुर्ले, मुन्ना जोगी, वंदना हातगावकर, सायली येरणे, सुजाता बल्ली, दुर्गा वैरागडे, माला पेंदाम आदिंची उपस्थिती होती.