संडे स्पेशियल : दहावीत मिळविले ९६ टक्के गुण
गणेश जैन, खबरबात / धुळे
बळसाणे : शिरपूरात वडिलांचे ललित स्विट म्हणून गोळ्या बिस्किट चे दुकान स्विट मार्ट चालवून राहुल ला शिक्षणसाठी त्याचे मामा पंकज कर्नावट व योगेश कर्नावट यांनी वयाच्या साडेतीन वर्षापासून पुणे शहरात नर्सरीत राहुल चे अँडमिशन केले तसेच शिरपूरात वडिल गोळ्या बिस्कीट चा व्यवसाय करून संसाराचा गाडा चालविणाऱ्या वडिलांचा स्वप्नांना पंख देत राहुल ने इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९६ टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले
घराची परिस्थिती साधारण असली तरी मुला मुलींना चांगले शिक्षण द्यावे असे स्वप्न पाहत वडील ललित जैन हे रात्रंदिवस एक करीत मुलगा आणि मुलगी व भावाच्या मुलगा आणि मुलगीला शिक्षण देत आहेत ललित जैन यांचा मोठा मुलगा राहुल हा शिक्षणाचे माहेर घर असलेल्या पुणे शहरातील दाजीकाका गाडगीळ शाळेचा विद्यार्थी आहे यंदा दहावी चे वर्ष त्यात शिक्षणाचा खर्च अन् संसाराचा गाडा चालविणे सोपी गोष्ट नाही पण काही असो माझ्या चौघ्या लेकरांना शिकवीण अशी मनाशी जिद्द ठेवली आणि राहुल ने ते स्वप्न अखेर आई बाबांसह मामा मामींचे पुर्ण केल्या चे आजच्या परिस्थितीत जाणवयाला लागले आहे राहुल ला कुठल्याही प्रकारचे ट्यूशन देखील नाही सेल्फ स्टडी करून शाळेत प्रथम क्रमांका ने उत्तीर्ण झाल्याचे कौतुक परिवारातील सदस्य व आप्तगणांना होत आहे बापाने काटकसर व दिवसाची रात्र करीत ललित जैन हे शिरपूरात छोटेसे गोळ्या बिस्कीटाचे व्यापार करीत आहेत माझ्या दोघी मुलांसह लहान भावाच्या दोघी मुलांनी उच्च शिक्षणापर्यंत मंजील गाठावी व ते उच्च पदापर्यंत जावे असे नात , नातीं चे स्वप्न आजी आजोबांना लागले आहे तसेच राहुल च्या आई सविता ने ही तितकीच साथ दिली आई बाबांचे स्वप्न साकारत राहुल ने इयत्ता दहावीत ९६ टक्के गुण मिळवून शिक्षणाच्या पहिल्या प्रवासाची बलाढ्य झेप घेतली राहुल च्या यशामुळे पुणे येथील मामा मामी , आजी आजोबा व त्याचे शिरपूर शहरातील आजी आजोबा , आई , वडील , काका काकू यांच्या स्वप्नांना नवे पंखे फुटले असून राहुल ने आणखी जास्तीत जास्त शिकावे अशी अपेक्षा राहुलच्या नातेवाईकांनी व्यक्त केली
राहुल चे ध्येय डॉक्टर बनवून समाजसेवा करण्याची जिद्द
आई बाबांच्या स्वप्नांना पंख देत इयत्ता दहावीत उत्तीर्ण होऊन गगन भरारी घेणाऱ्या राहुल ला समाजा ला डॉक्टर बनून समाजसेवा करायची तयारी दाखवली आहे सध्या तरी राहुल ने एम.बी.बी.एस.करण्याची मनाची तयारी दाखवली आहे राहुल चे हे ध्येय असून या दिशेने त्याची वाटचाल राहणार असल्याचे राहुलने कौतुकाने सांगितले आणि याप्रसंगी मला लहानपणापासून च माझ्या मामा मामींनी व आजी आजोबानी खूपच मार्गदर्शन दिले हा श्रेय त्यांचा असल्याचे कौतुकात सांगितले.