Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, जून ०९, २०१९

गडचिरोलीतील सरपंचांचा शिर्डीत सत्कार

गडचिरोली/प्रतिनिधी 

 शिर्डी येथे महाराष्ट्र राज्य आदर्श सरपंच पुरस्कार वितरण करण्यात आले या मध्ये गडचिरोली जिल्ह्यातून ग्रामपंचायत सगणापूर येथील सरपंच श्री. सुनील कन्नाके यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

      ग्रामपंचायत सगणापूर येथे केलेल्या भरीव कामगिरी ची दखल घेऊन  राज्य शासनाने त्यांना महाराष्ट्र राज्य आदर्श पुरस्कार दिला अशी कामगिरी करणारे ते जिल्हातील एकमेव सरपंच आहेत.

     त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन युवा संकल्प ,भेंडाळा या संस्थे तर्फे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष-राहुल वैरागडे ,उपाध्यक्ष-चेतन कोकावार,व सदस्य सचिन वानखेडे, निखिल वैरागडे, सुबिर मिस्त्री,  अश्रुत दुर्गे,रुपेश पोरटे,आणि समस्त गावकरी नागरिक उपस्थित होते.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.