धुळे/प्रतिनिधी
आजच्या तापमानाची नोंद पाहता कोणीही आपल्याला बाहेर फिरताना सुद्धा दिसत नाही किंवा पक्षी सुदधा आपल्याला पाहायला मिळत नाहीत. जागतिक तापमान वाढीला सम्पूर्ण पणे मनुष्य जबाबदार आहे. त्याच प्रमाणे मनुष्याने चालवलेली जंगलतोड हे देखील प्रमुख कारण आहे.
आजच्या तापमानाची नोंद पाहता कोणीही आपल्याला बाहेर फिरताना सुद्धा दिसत नाही किंवा पक्षी सुदधा आपल्याला पाहायला मिळत नाहीत. जागतिक तापमान वाढीला सम्पूर्ण पणे मनुष्य जबाबदार आहे. त्याच प्रमाणे मनुष्याने चालवलेली जंगलतोड हे देखील प्रमुख कारण आहे.
विकास मराठे |
आज पाहायला गेलं तर वृक्षारोपण सर्वीकडे खूप मोठ्या प्रमाणात करण्यात आले होते परंतु खर पाहायला गेलं तर त्यात किती रोपे , झाडे जगली हे कोणाला विचारायला नको परंतु हे सर्व होत असताना महाराष्ट्र मधील लहानश्या जिल्ह्यामध्ये काम करीत असलेले विकास मराठे आणि त्यांची सम्पूर्ण टीम कडकडीत उन्हाळ्यात देखील वृक्षांचे संगोपन करीत आहेत हे पहावे तेवढ नवलच मागचा पावसाळा झाला की नाही ह्यात शंकाच होती परंतु विकास मराठे ह्या अवलीयाने मोठया दिमाखात सम्पूर्ण लावलेली झाडे जगवलीत झाड फाउंडेशन च्या माध्यमातून त्यांनी धुळे शहर तसेच जवळपास च्या गावांमध्ये वृक्षारोपण केले. आणि फक्त वृक्षारोपण करून बसून न राहता वेळोवेळी त्यांनी त्यांचे संगोपन देखील केले ह्यात त्यांच्या कार्यात सिहाचा वाट उचलणारे प्रसाद पाटील , सचिन देवरे, कुणाल चौधरी , प्रा. प्रशांत खुळे , संदेश दाभाडे, शुभम शिंदे, आकाश माळी , निखिल ठाकरे ह्यांची मोलाची साथ त्यांना लाभली . त्यानी लावलेली झाडे त्यांनी केलेला कमी पाण्यात झाडे जगवण्याचा अवलंबलेला मार्ग खूप रोमांचक करणारे आहेत. त्यांनी झाड फाउंडेशन च्या माध्यमातून केलेल्या कार्याचा गौरव म्हणून झाड फाउंडेशन ला एक राज्यस्तरीय तर एक जिल्हस्तरिय पुरस्काराने गौरविण्यात आले. गेल्या एक वर्षात केलेले कार्य पाहता कमीत कमी धुळे जिल्हा तरी हिरवा होईल असं चित्र वाटायला लागले आहे. विकास मराठे हे साधारण शेतकरी कुटुंबातील आहेत. तसेच आपल्या कोरड पडलेल्या शेतीला पाहून त्यांनी ह्या कार्याला सुरुवात केली आणि बघता बघता एकच वर्षात झाड खरच एक झाड झाले अस म्हणायला काहिही हरकर नाही . विकास मराठे आणि त्यांची टीम शहरातील मोठया हॉटेल, किंवा शाळा कॉलेज , मंगल कार्यालय ह्या ठिकाणी जाऊन रिकाम्या पडलेल्या बिसलेरी बोटल्स आणून त्याच्या मार्फत झाडांना पाणी देण्याचे काम करतात. ह्यात त्यांची सम्पूर्ण टीम मदत करते , ह्यात प्रसाद पाटील हे एक पर्यावरण प्रेमी तसेच पर्यावरण मित्र पुरस्कार प्राप्त युवा आहेत. त्यामुळे सम्पूर्ण टीम ही पर्यावरण प्रेमी आहे असेच म्हणावे लागेल . आजच्या तरुणांनी ह्या तरुणांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पर्यावरणा चा समतोल राखला पाहिजे तसेच फक्त फोटो काढण्यासाठी वृक्षारोपण न करता खरच त्या रोपणा वाढवलं पाहिजे.