सिंदेवाही तहसीलदार अमोल पाठक यांची कारवाई चालूच
सिंदेवाही : सिंदेवाही तहसीलदार निवडणुकीच्या कामात व्यस्त असताना देखील महसूल कोणी चोरी करू नये यासाठी तालुक्यात देखरेख कित्येक रेतीघाटावर करीत असतात . त्यातच आज सिंदेवाही तालुक्यातील जवळच असलेला नवरगाव मध्ये गावात सकाळी 6 वा. दरम्यान रेती भरूण ट्रॅक्टर वाहतूक करताना दिसले .असता सिंदेवाही तहसीलदार अमोल पाठक,व चक्रधर गेडाम, (कोतवाल), कैलास बन्सोड, प्रफुल यांनी पाटलाग करून निघालेला ट्रॅक्टर पकडला व पकडून सिंदेवाहीकडे रवाना केला. सदर ट्रॅक्टर तहसिल चे आवारात आहे. तहसिलदार अमोल पाठक साहेब यांनी जप्तीची कारवाई केली आहे.ट्रॅक्टर ट्राली क्र.– MH-34/L-8158 असा असून ट्रॅक्टर मालक- 'प्रमोद श्रावनजी कामडी ' रा.नवरगाव ता. सिंदेवाही यांचा असल्याचे तहसील कार्यालय सिंदेवाही यांनी सांगितले. सदर कार्यवाही महसुल अधिनियम १९६६ चे कलम ४८ (७) चे उल्लंघन केल्यामुळे जमीन महसूल अधिनियम लावून पुढील दंडात्मक कारवाई करण्यात येईल. असे माहिती सिंदेवाही तहसीलदार पाठक यांनी सांगितले आहे