भूमिपुत्र शेतकरी संघटना धुळे जिल्हा व ड्रीम इव्हेंट्स ह्यांच्या संयुक्त विद्यमानाने शहराजवळ असलेल्या निकम इन्स्टिटयूट मध्ये सत्कार व पुरस्कार प्रदान सोहळा घेणयात आला .
ह्या वेळी आपल्या खान्देशात निर्मित होत असलेला शेतकरी जीवनावरील प्रश्नांना उजाळा देणारा मराठी चित्रपट फफूटा ह्या चित्रपटाचे प्रोमोशन करण्यात आले ह्यावेळी चित्रपटातील कलाकार मा. प्रमोद पाटील उपस्थित होते . ह्यावेळी चित्रपटाविषयी विकास मराठे ह्यांनी थोडक्यात माहिती देताना सांगितले कि सदर चित्रपट हा शेतकऱयांच्या जीवनावर प्रकाश झोत टाकणारा चित्रपट असणार आहे शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी ह्या चित्रपटात मांडण्यात आलेल्या आहेत. शेतकऱ्यांला शेती करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींमध्ये प्रथम "सुपीक" जमीन आणि नंतर "पाणी" लागते. शेतीला मुबलक पाणी असेल तरच शेती करणे शक्य आहे. तिसरी आवश्यक गोष्ट म्हणजे "मनुष्यबळ". हे असले की शेतकरी शेतातील पिकांची निगा राखू शकतो. चौथे म्हणजे शेती करतांना येणारा खर्च पूर्ण करण्यासाठी लागणारा "पैसा" (भांडवल). आणि शेवटी जेथे तो त्याचा उत्पादित शेतमाल विकतो, ती "बाजार पेठ". शेतकऱ्यांसाठी त्याची शेतीच सर्व काही असते. त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि जगातील अन्य लोक कळत न कळत या शेतकऱ्यावर अवलंबून असतात.ह्या कर्यक्रम प्रसंगी भूमिपुत्र शेतकरी सांघटना जिल्हा अध्यक्ष विकास मराठे , उपाध्यक्ष प्रसाद पाटील उपस्थित होते. ह्यावेळी प्रा.रवींद्र निकम सर , आनंद पवार सर , भूपेंद्र मालपुरे सर ह्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . ह्यावेळी महिला दिनाचे औचित्य साधून सामाजिक कार्यकर्त्या मा. किरणताई नवले ह्यांचा युवा रणरागिणी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. विकास मराठे ह्यांना युवा प्रेरणा पुरस्कार व प्रसाद पाटील ह्यांना पर्यावरण प्रेमी पुरस्कार देण्यात आला . ह्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रमोद पाटील , विवेकानंद कॅरियर अकादमी चे संचालक प्रशांत खुले सर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मा.सौ.शुभांगी निकम ह्या होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तोष पाटील ह्यांनी केलॆ.