- शेतकऱ्यांना ठेवले अंधारात
- भुसंपादन करुन मोबदला देण्याची मागणी
- शेतकऱ्यांमध्ये रोष
मूल/ प्रतिनिधी
मूल तालुक्यातील नलेश्वर-सिंतळा रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. सदर रस्त्याच्या रुंदीकरणात काही शेतकऱ्यांच्या जमिनी येत आहे तर काहींचा शेतामधुन रस्त्याचे काम होत आहे. रस्त्याचे बांधकाम करणाऱ्या संबंधीत विभागाने या रस्त्याच्या कामात जमिनी येत असलेल्या शेतकऱ्यांसोबत कोणत्याही प्रकारे वाटाघाटी केल्या नाही तसेच नियमांनुसार जमीन संपादन केली नाही आणि मोबदलाही दिला नाही. रस्त्याचे बांधकाम करतांना संबंधित शेतकऱ्यांना सुचना देने, जागेची मोजनी करणे, व नियमांनुसार भुसंपादन करुन योग्य मोबदला देणे गरजेचे असतांना संबंधीत विभागाने शेतकऱ्यांना कोणतिही पूर्व सुचना दिली नाही. याबाबत शेतकऱ्यांनी दोन महिन्यापूर्वी बांधकाम विभागाला निवेदन दिले. निवेदनातील मागण्या मान्य न झाल्याने काम बंद पाडले. मात्र कंत्राटदारानी शेतकऱ्यांच्या रोषाला न जुमानता रस्त्याचे बांधकाम सुरुच ठेवले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केल्या जात आहे.
या रस्त्याचा बांधकामात दोन्ही बाजूकडील शेतकऱ्यांची ३-३ मिटर शेतजमिन जात असल्याचे शेतकरी सांगतात. निवेदन देउनही कंत्राटदाराने जाणीवपूर्वक काम सुरुच ठेवल्याचा आरोप शेतकर्यांनी केला आहे. रस्ता रुंदिकरणाचे काम त्वरित बंद करुन भुसंपादन करावे व शेतकर्यांना योग्य मोबदला देण्यात यावा अशी मागणी विजय गुरनुले, यादव मोहुर्ले, रमाकांत वाढई, रमेश वाढई, रामभाऊ सोनुले, कवडु सोनुले, बापुजी गुरनुले, ईश्वर मोहुर्ले आदी शेतकर्यांनी केली आहे.