जुनोना: अमोल जगताप
महीला सक्षमीकरनासाठी जनजागृती शासना कडून सुरू आहे. त्याला अधिक गती देण्याची आवश्यकता आहे .महीला ही प्रत्येक शेत्रात आपले नाव करीत आहे. सक्षीमीकरणाला वाव मिळाल्यास त्या पुन्हा प्रगतीचे उचांक गाठतील ,असे प्रतिपादन जी.प. सदस्या संध्याताई गुरूनुले यांनी केले.
सत्यशोधक माळी समाज जुनोना तर्फे महीला दिनाचं औचित्य साधुन जि.प.शाळा जूनोना येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वर्षा ताई महात्मे,तर प्रमुख अतिथी म्हणून सीमाताई देशमुख, मेघश्याम पेटकुले , मुख्यद्यापक आत्राम सर , सरपंच मालतीताई कुळमेथे,त.मु. अध्यक्ष चंदाताई देवगडे, सविता वेलादी, मंगला वसाके, शशिकला मांढरे,मालाताई मेश्राम,ज्योती आलाम,सुभाष टीकेदार,रवी गेडाम, ताण बाजी चौधरी,यांची उपस्थिती होती.
यावेळी महिलांच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक बाबीवर प्रकाश टाकला. सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली कार्यक्रमाचे संचालन कु. कोमल बोरकर यांनी तर आभारप्रदर्शन कू.लीना आदे यांनी मानले. कार्यक्रमाचा यशस्वितेसाठी अजय वाढई,किशोर पेटकुले ,मनोज लेंनगुरे ,सर्व शिक्षक- शिशकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.यावेळी गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते.