पठानपुरा गेट ते बिनबा गेट किल्ला पाथवे, कांक्रीट रोड, सौन्दर्यीकरण कामाची पाहणी
चंद्रपूर: गोंडकालीन वारसा लाभलेल्या चंद्रपूर शहरात अनेक वास्तू आजही गतइतिहासाची साक्ष देतात. या वास्तूंचे जतन व्हावे आणि पर्यटनाच्या दृष्टीने चालना देण्यासाठी इको प्रो च्या माध्यमातुन पाठपुरावा केला जात आहे. यातच चंद्रपूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी स्वतः पुढाकार घेत शहरातील पठानपुरा ते बिनबा गेट किल्ला पाथ-वे, मार्ग स्वच्छता अभियानाची सुरुवात केली. मात्र, त्यांची बदली झाली. पण, त्यांनी चंद्रपूर शहरावरील प्रेम आणि लोकहितकारी उपक्रमाला पुढे नेण्यासाठी बदलिनंतरही कामाची पाहणी केली. यावेळी महानगर पालिका आयुक्त विपिन पालीवाल, इको-प्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे उपस्थीत होते.
शहरात स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छता लीग सुरु झालेली असताना तत्कालीन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी पठाणपुरा गेट येथे इको-प्रोन व महानगरपालिका तर्फे स्वच्छता अभियान ला भेट दिली होती. तेव्हा किल्ला लागून बांधकाम झालेले पाथवे आणि कांक्रीट रोडचे बांधकाम यामुळे वाहतुकीची कोड़ीवर उपाय, सकाळी मॉर्निंग वॉक, साइकलिंग आदि करिता महत्वाचे कसे ठरेल याची माहिती जाणून घेतली. त्याची दखल घेत सदर अभियान राबवून सदर मार्ग नागरिकांना कसा उपयोगी पडेल या दृष्टीने कार्य करण्यास पुढाकार घेतला. इको-प्रोंच्या नेतृत्वात श्रमदान तर व कामा करिता चंद्रपूर शहर महानगरपालिका यानी कार्य करण्यास सुरुवात केली. इको-प्रो सदस्य आणि पालिका कर्मचारी यासह तत्कालीन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या आव्हान नंतर शहरातील विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी यांनी श्रमदान केले होते. या दरम्यान अनेकदा जिल्हाधिकारी म्हणून अजय गुल्हाने यानी भेट देत प्रोत्साहित केले, तर पालिका च्या कार्याचा आढावा घेत राहिले.
मागील काही दिवसांआधी त्यांची बदली झाली. नागपूर महागरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणुन पदभार घेतल्यानंतरही त्यांनी एतिहासिक वास्तु जतनासाठी कायम स्मरण ठेवून पाठपुरावा सुरू ठेवला आहे. आज त्यांनी पुन्हा नागपूरहून येवून प्रत्यक्ष भेट दिली. कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. एखादा अधिकारी बदलून गेल्यानंतर जुन्या शहरातील केलेल्या कामाचा आढावा घेत नाही. मात्र, अजय गुल्हाने हे त्याला अपवाद ठरले. चंद्रपूरच्या विकासासाठी कायम सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. त्यांनी आपल्या कार्यकाळात रामाळा तलाव खोलिकरण च्या कामास गति दिली होती, पावसाळ्यानंतर तलाव मधील पाणी सोडून पुढील कामास सुरुवात करण्यास आढावा घेणार होते मात्र बदली झाल्याने यात थोड़ा विलंब होत आहे.