Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मे ०१, २०२३

चंद्रपूर शहरांमध्ये पावासाने झोडपले; या भागात घुसले पाणी : Chandrapur rain



चंद्रपूर शहरांमध्ये आज दुपारच्या सुमारास मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानंतर अनेक ठिकाणी नाल्या भरून वाहू लागल्या होत्या. त्यामुळे अनेक ठिकाणी नाल्याचे पाणी रस्त्यावरवाहू लागले. शिवाय काही भागांमध्ये अनेक नागरिकांच्या घरात देखील झाल्याचे पाणी असल्याच्या तक्रारी आल्या.



बालाजी वॉर्ड पॉलिटेक्निक कॉलेज येथे मोठ्या नाल्यांमध्ये नळाच्या मोठ्या पाईपलांचा कचरा अडकून पडला होता. तो देखील साफ करण्यात आला. काही ठिकाणी विटांचे तुकडे नाल्यांमध्ये आढळून आल्याने वाहते पाणी थांबले. तुकूमकडे जाणाऱ्या ट्राफिक ऑफिससमोर देखील मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले होते. आज झालेल्या पावसादरम्यान झटपट बंधाऱ्यावरओव्हर फ्लो झाला. पंचशील चौक, छोटा बाजार चौक, नगीनाबाग परिस, सिस्टर कॉलनी, कस्तुरबा चौक येथे देखील नालीचे पाणी रस्त्यावर वाहू लागले होते.



गेल्या सात दिवसांपासून शहर तथा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. रविवारी रात्री मुसळधार पाऊस झाल्यानंतर आज सोमवारी सकाळी पाऊस झाला. त्यानंतर दुपारी संततधार पाऊस झाला. सायंकाळी पाच वाजताचे सुमारास पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली. पाऊस सुरू असतानाच सर्वत्र जोरदार टपोऱ्या गारा पडल्या. गारपीटमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. ही गारपीट सर्वत्र होती. या गारपीटचा बोलका व्हिडिओ चित्रित केला आहे. तसेच आझाद बगीचा समोर गुडघ्याभर पाणी साचले होते. या भागातील अनेक दुकानात पावसाचे पाणी शिरले.

Maharashtra Day

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.