Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

eco pro लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
eco pro लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, मार्च ११, २०२३

सारस पक्ष्यासाठी ६२ कोटीची योजना; वन, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार sudhir mungantiwar Eco pro pakshimitra

सारस पक्ष्यासाठी ६२ कोटीची योजना; वन, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार sudhir mungantiwar Eco pro pakshimitra

सारस पक्ष्यासाठी ६२ कोटीची योजना; वन, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार


चंद्रपूर - पक्षी असो की प्राणी हे अन्नसाखळीतील घटक आहेत. ते तुटले तर जगणं कठीण होईल. त्यामुळे जीवसृष्टी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी कृती आराखडा तयार व्हावा, भविष्याचा वेध घेण्यासाठी या संमेलनातून निघणाऱ्या निष्कर्यातून सरकार काम करेल, पक्षीमित्र संमेलनातील चिंतन हे मनापासून वनापर्यंत पोहोचवू, अशी ग्वाही वन, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. 


महाराष्ट्र पक्षिमित्र संयोजित, इको प्रो संस्था आयोजित व ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सहकार्याने वन अकादमी येथे आयोजित 35 व्या पक्षिमित्र संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मान्यवरांच्या हस्ते वटवृक्ष आणि दीप प्रज्वलन करून  उदघाटन झाले. यावेळी स्वागताध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार, संमेलनाध्यक्ष राजकमल जोब, वन प्रबोधिनीचे क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी, चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक प्रकाश लोणकर, ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, उपविभागीय अधिकारी श्री. मुरुगनंथम, महाराष्ट्र पक्षीमित्र संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. जयंत वडतकर, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. निनाद शाह, ग्रीन प्लॅनेटचे अध्यक्ष सुरेश चोपणे यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक आयोजक इको प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी केले.


यावेळी वन, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, विविध पक्षांची चित्रे बघून मन प्रफुल्लीत होते. पक्ष्याचा आवाज मनाला आनंद देतो. पक्षी सृष्टीतील देणगी आहे.  देशात २००० पासून २०२२ पर्यंत पर्यावरण समतोल बिघडल्याने पक्ष्याचे मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले. पर्यावरण आरोग्य ठीक नसेल तर पक्षी जगणार नाही. त्यासाठी चिंतन करून संवर्धनाची गरज आहे. त्यासाठी शासनाने भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात सर्रास पक्षाचे संवर्धन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली. सारस पक्ष्यासाठी ६२ कोटीची योजना आखण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ताडोबा- अंधारी प्रकल्पात पक्ष्याचे चित्र प्रदर्शन भरविण्यात यावे, त्याची माहिती क्यू आर कोड पद्धतीने देण्यात यावी, महाराष्ट्रव्यापी छायाचित्र पुरस्कार योजना घेण्याची सूचना मुनगंटीवार यांनी दिली.  


स्वागताध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले की, पक्ष्याचा किलबिलाट पुन्हा ऐकू यावा, यासाठी जनतेच्या सहभागातून, पक्षीमित्रांच्या अभ्यासातून आणि प्रशासनाचा सहकार्यातून प्रयत्न झाले पाहिजे . चंद्रपुरात वाघांचे संवर्धन मोठ्या प्रमाणात होते. आता चंद्रपूर बर्ड कॅपिटल व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.


संमेलन अध्यक्ष राजकमल जोब म्हणाले, बहुतेक पक्षीमित्रांची पक्षी निरीक्षण जलाशयांवरील पाणपक्षी गणने पासून सुरु झालेले आहे. हिवाळ्यात महाराष्ट्रात विविध ठिकाणी असलेल्या जलाशयांवर येणा-या स्थलांतरित पाणपक्ष्यांची गणना हा उपक्रम आजदेखील महाराष्ट्र पक्षीमित्र संघटने कडे नवीन पक्षी निरीक्षकांना आकृष्ट करु शकतो. महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेने या उपक्रमाला अधिक चालना देण्याची गरज आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली.



यावेळी महाराष्ट्र पक्षीमित्र संस्थेचे प्रा. डॉ. जयंत वडतकर यांनी भूमिका मांडली. माजी संमेलनाध्यक्ष डॉ. निनाद शाह यांनी नवे संमेलन अध्यक्ष राजकमल जोब यांना महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनांचे ध्वज हस्तांतरित केले.मान्यवरांच्या हस्ते  35 व्या पक्षिमित्र संमेलनाची स्मरणिका प्रकाशित करण्यात आले. तसेच प्रफुल सावरकर यांच्या निसर्ग संवाद, किशोर मोरे यांचे शबल, रवी पाठेकर यांचे अर्थवन, तर दीपक गुढेकर यांच्या पक्षीवेध पुस्तकाचे प्रकाशन झाले. दरम्यान पाहुण्याच्या हस्ते पक्षी छायाचित्र प्रदर्शनीचे उदघाटन करण्यात आले. 


त्यानंतर महाराष्ट्र पक्षीमित्र आणि होप संस्थेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पक्षीमित्र पुरस्कार २०२२ वितरण करण्यात आले. यात जीवनगौरव पुरस्कार भीमा शंकर कुलकर्णी, पक्षीमित्र व संशोधन पुरस्कार प्रा. डॉ. जयवर्धन बालखंडे, श्रुशूषा पुरस्कार राजकुमार कोळी, पक्षी जनजागृती पुरस्कार अनंत पाटील, उदयमुख पक्षीमित्र पुरस्कार कुमारी अमृता आघाव आणि कुमारी यशश्री उपरीकर यांना देण्यात आला. या कार्यक्रमाचे संचालन प्रज्ञा नंदराज यांनी केले.


 sudhir mungantiwar Eco pro pakshimitra

बुधवार, डिसेंबर ०७, २०२२

फेब्रुवारीत चंद्रपुरात 35 वे राज्यस्तरीय पक्षिमित्र संमेलन  | Maharashtra pakshimitra sammelan 2023

फेब्रुवारीत चंद्रपुरात 35 वे राज्यस्तरीय पक्षिमित्र संमेलन | Maharashtra pakshimitra sammelan 2023



इको-प्रो संस्थेकडे यजमानपद, महाराष्ट्र पक्षिमित्र कडून घोषणा

चंद्रपुरात प्रथमच राज्यस्तरीय पक्षिमित्र संमेलनाचे आयोजन

Maharashtra pakshimitra sammelan 2023 | यंदा राज्यस्तरीय पक्षिमित्र संमेलन चंद्रपूर येथे फेब्रुवारीत होणार असून, या संमेलनाचे यजमानपद इको-प्रो संस्थेकडे देण्यात आल्याची घोषणा नुकतीच महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेने केली आहे. 

महाराष्ट्र पक्षीमित्रचे अध्यक्ष डॉ. जयंत वड़तकर आणि पदाधिकारी यांनी चंद्रपूरला भेट देत इको-प्रो कार्यालयात छोटेखानी बैठक घेत संमेलन आयोजन बाबत प्रारंभीक चर्चा केली.

 इको-प्रो संस्था व महाराष्ट्र पक्षिमित्र च्या माध्यमातून ११ व १२ फेब्रुवारी रोजी चंद्रपूर शहरात 35 वे राज्यस्तरीय पक्षिमित्र संमेलन आयोजित करण्यात येत आहे, यासंदर्भात संमेलन आयोजन बाबत महाराष्ट्र पक्षिमित्र व इको-प्रो संस्थेचे पदाधिकारी यांच्यात चर्चा झाली.

राज्यस्तरीय पक्षिमित्र संमेलनाच्या आयोजनासंदर्भात चंद्रपूर शहरात इको प्रो कार्यालयात नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीला महाराष्ट्र पक्षिमित्रचे अध्यक्ष डॉ जयंत वड़तकर, कार्यवाह प्रा. डॉ गजानन वाघ, किरण मोरे, सहा. संपादक पक्षिमित्र त्रैमासिक, इको-प्रो अध्यक्ष बंडू धोत्रे, पर्यावरण विभाग प्रमुख, नितिन रामटेके, सचिन धोतरे, स्वप्निल मेश्राम व अॅड. राजमेहेर निशाने, सौरभ जवंजाळ आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. 

महाराष्ट्र पक्षिमित्र संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत राज्यातील एका शहरात पक्षिमित्र संमेलनाचे आयोजन करण्यात येत असते. पक्षी संवर्धन, जनजागृती, संशोधन, उपचार सेवा या क्षेत्रात कार्यरत व्यक्ती आणि संस्थांचा गौरव व्हावा, यासाठी महाराष्ट्र पक्षिमित्र संस्थेतर्फे पुरस्कार देखील देण्यात येत असतात. 1981 मध्ये सुरुवात झालेल्या महाराष्ट्र पक्षिमित्र चळवळीत संस्थेच्या माध्यमातून मागील 42 वर्षात 34 राज्य स्तरीय व ३० पेक्षा जास्त विभागीय संमेलनांचे आयोजन आजवर करण्यात आले आहे. यंदा 35 वे संमेलन चंद्रपूर शहरात आयोजित करण्यात येत असल्याची घोषणा डॉ. जयंत वडतकर यांनी केली. यापूर्वी 2019 ला इको-प्रो संस्थेने 19 वे विदर्भस्तरीय पक्षिमित्र संमेलनाचे यशस्वी आयोजन केले होते. चंद्रपूर शहरात प्रथमच राज्यस्तरीय पक्षीमित्र संमेलनाचे आयोजन होत असून ही मानाची बाब आहे.

चंद्रपूर येथे आयोजित होणाऱ्या संमेलनामध्ये इको प्रो संस्था प्रमुख आयोजक म्हणून राहणार असून, 11 व 12 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या  संमेलनाचे सोहळ्यात पुरस्कार वितरण, विविध मान्यवरांची व्याख्याने व सादरीकरणे,  स्मरणिका प्रकाशन, पुस्तक प्रकाशन पक्षी निरीक्षण कार्यक्रम, प्रगट मुलाखत, चित्रकला, छायाचित्र, रांगोळी स्पर्धा होणार असून, पर्यावरणपूरक विविध प्रदर्शन व विक्रीचे स्टॉल राहणार आहेत.

इको-प्रो तर्फे आयोजित राज्यस्तरीय पक्षीमित्र संमेलनबाबत लवकरच शहरातील स्थानिक पर्यावरण संस्था व पक्षीमित्र यांचेसोबत आयोजन संदर्भात बैठक घेतली जाणार असल्याचे इको-प्रो पक्षी संरक्षण विभाग चे बंडू दुधे आणि हरीश मेश्राम यांनी कळविले आहे.
Maharashtra Pakshimitra has been striving to protect Birds of Maharashtra since the past 20 years. Being a non-profit NGO, we rely on your help in securing

रविवार, नोव्हेंबर १३, २०२२

सोमवार, नोव्हेंबर ०७, २०२२

*इको प्रो संस्थेच्या वतीने "निसर्गासोबत युवा" विशेष अभियान*

*इको प्रो संस्थेच्या वतीने "निसर्गासोबत युवा" विशेष अभियान*





*दिवाळीच्या सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांना निसर्ग, व्यक्तीमत्व विकास, श्रमदानावर मार्गदर्शन*

इको-प्रो पर्यावरण संस्थेच्या वतीने एक नोव्हेबरपासून "निसर्गासोबत युवा" विशेष अभियान सुरू आहे. यात पडोली येथील सुशिलाबाई रामचंद्र मामिडवार समाजकार्य महाविद्यालयातील जवळपास शंभर पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

यंदा दिवाळीच्या सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांना निसर्ग, व्यक्तीमत्व विकास, श्रमदान याचे महत्व कळावे, यासाठी विशेष अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. हे अभियान येत्या 15 नोव्हेंबर पर्यंत सुरू राहणार आहे.  
अभियानात विद्यार्थ्यांना सामाजिक क्षेत्रातील कार्य त्या कार्यासाठी येणारे विविध अडचणी आणि तो दृष्टिकोन वृद्धिंगत व्हावा समाजाबद्दलची बांधिलकी अधिक विकसित व्हावी आणि या दृष्टीने कृतीशील कार्यक्रम घेण्यात येत आहे. 

 मागील 7 दिवसाच्या पासून सुरू असलेल्या या अभियानातून या विद्यार्थ्यांनी विविध अभियान, चळवळी, इको प्रोचे झालेले आंदोलन व संघर्ष त्याच्या मागील भूमिका उद्देश लोकसहभाग कसा पद्धतीने मिळवला गेला, या संदर्भात माहिती देण्यात आली. सोबतच संस्था ज्या ज्या विविध क्षेत्रात काम करते त्यांची माहिती त्यांना रोज देण्यात येत आहे. या अभियानांतर्गत रोज सकाळी साडेसहा ते साडेदहा पहिले सत्र आणि त्यानंतर दुपारी दुसरा सत्र होत आहे. 
 पुढेही हे अभियान पुढचे सात आठ दिवस चालणार आहे. यातून "युवा विकासासाठी", "निसर्गासाठी युवा", "देशासाठी युवा" ही संकल्पना अधिक प्रगटपणे विद्यार्थ्यांसमोर ठेवण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहे. या संपूर्ण शिबिरात इको प्रो चे अध्यक्ष तथा राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी बंडू धोत्रे नियमित त्यांना मार्गदर्शन आणि विविध अभियानाची माहिती देत त्यांना प्रत्यक्ष कृतीशील कार्यक्रमात सहभागी करून घेत आहे. *Special campaign "Youth with nature" on behalf of Eco Pro organization* 

रविवार, नोव्हेंबर ०६, २०२२

बदलीनंतरही तत्कालीन जिल्हाधिका-र्यांनी दिली लोकहितकारी उपक्रमाला भेट | Ajay Gulhane Chandrapur Ecopro

बदलीनंतरही तत्कालीन जिल्हाधिका-र्यांनी दिली लोकहितकारी उपक्रमाला भेट | Ajay Gulhane Chandrapur Ecopro

 पठानपुरा गेट ते बिनबा गेट किल्ला पाथवे, कांक्रीट रोड, सौन्दर्यीकरण कामाची पाहणी



चंद्रपूर: गोंडकालीन वारसा लाभलेल्या चंद्रपूर शहरात अनेक वास्तू आजही गतइतिहासाची साक्ष देतात. या वास्तूंचे जतन व्हावे आणि पर्यटनाच्या दृष्टीने चालना देण्यासाठी इको प्रो च्या माध्यमातुन पाठपुरावा केला जात आहे. यातच चंद्रपूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी स्वतः पुढाकार घेत शहरातील पठानपुरा ते बिनबा गेट किल्ला पाथ-वे, मार्ग स्वच्छता अभियानाची सुरुवात केली. मात्र, त्यांची बदली झाली. पण, त्यांनी चंद्रपूर शहरावरील प्रेम आणि लोकहितकारी उपक्रमाला पुढे नेण्यासाठी बदलिनंतरही कामाची पाहणी केली. यावेळी महानगर पालिका आयुक्त विपिन पालीवाल, इको-प्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे उपस्थीत होते. 

शहरात स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छता लीग सुरु झालेली असताना तत्कालीन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी पठाणपुरा गेट येथे इको-प्रोन व महानगरपालिका तर्फे स्वच्छता अभियान ला भेट दिली होती. तेव्हा किल्ला लागून बांधकाम झालेले पाथवे आणि कांक्रीट रोडचे बांधकाम यामुळे वाहतुकीची कोड़ीवर उपाय, सकाळी मॉर्निंग वॉक, साइकलिंग आदि करिता महत्वाचे कसे ठरेल याची माहिती जाणून घेतली. त्याची दखल घेत सदर अभियान राबवून सदर मार्ग नागरिकांना कसा उपयोगी पडेल या दृष्टीने कार्य करण्यास पुढाकार घेतला. इको-प्रोंच्या नेतृत्वात श्रमदान तर व कामा करिता चंद्रपूर शहर महानगरपालिका यानी कार्य करण्यास सुरुवात केली. इको-प्रो सदस्य आणि पालिका कर्मचारी यासह तत्कालीन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या आव्हान नंतर शहरातील विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी यांनी श्रमदान केले होते. या दरम्यान अनेकदा जिल्हाधिकारी म्हणून अजय गुल्हाने यानी भेट देत प्रोत्साहित केले, तर पालिका च्या कार्याचा आढावा घेत राहिले.

मागील काही दिवसांआधी त्यांची बदली झाली. नागपूर महागरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणुन पदभार घेतल्यानंतरही त्यांनी एतिहासिक वास्तु जतनासाठी कायम स्मरण ठेवून पाठपुरावा सुरू ठेवला आहे. आज त्यांनी पुन्हा नागपूरहून येवून प्रत्यक्ष भेट दिली. कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. एखादा अधिकारी बदलून गेल्यानंतर जुन्या शहरातील केलेल्या कामाचा आढावा घेत नाही. मात्र, अजय गुल्हाने हे त्याला अपवाद ठरले. चंद्रपूरच्या विकासासाठी कायम सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. त्यांनी आपल्या कार्यकाळात रामाळा तलाव खोलिकरण च्या कामास गति दिली होती, पावसाळ्यानंतर तलाव मधील पाणी सोडून पुढील कामास सुरुवात करण्यास आढावा घेणार होते मात्र बदली झाल्याने यात थोड़ा विलंब होत आहे.