*दिवाळीच्या सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांना निसर्ग, व्यक्तीमत्व विकास, श्रमदानावर मार्गदर्शन*
इको-प्रो पर्यावरण संस्थेच्या वतीने एक नोव्हेबरपासून "निसर्गासोबत युवा" विशेष अभियान सुरू आहे. यात पडोली येथील सुशिलाबाई रामचंद्र मामिडवार समाजकार्य महाविद्यालयातील जवळपास शंभर पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
यंदा दिवाळीच्या सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांना निसर्ग, व्यक्तीमत्व विकास, श्रमदान याचे महत्व कळावे, यासाठी विशेष अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. हे अभियान येत्या 15 नोव्हेंबर पर्यंत सुरू राहणार आहे.
अभियानात विद्यार्थ्यांना सामाजिक क्षेत्रातील कार्य त्या कार्यासाठी येणारे विविध अडचणी आणि तो दृष्टिकोन वृद्धिंगत व्हावा समाजाबद्दलची बांधिलकी अधिक विकसित व्हावी आणि या दृष्टीने कृतीशील कार्यक्रम घेण्यात येत आहे.
मागील 7 दिवसाच्या पासून सुरू असलेल्या या अभियानातून या विद्यार्थ्यांनी विविध अभियान, चळवळी, इको प्रोचे झालेले आंदोलन व संघर्ष त्याच्या मागील भूमिका उद्देश लोकसहभाग कसा पद्धतीने मिळवला गेला, या संदर्भात माहिती देण्यात आली. सोबतच संस्था ज्या ज्या विविध क्षेत्रात काम करते त्यांची माहिती त्यांना रोज देण्यात येत आहे. या अभियानांतर्गत रोज सकाळी साडेसहा ते साडेदहा पहिले सत्र आणि त्यानंतर दुपारी दुसरा सत्र होत आहे.
पुढेही हे अभियान पुढचे सात आठ दिवस चालणार आहे. यातून "युवा विकासासाठी", "निसर्गासाठी युवा", "देशासाठी युवा" ही संकल्पना अधिक प्रगटपणे विद्यार्थ्यांसमोर ठेवण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहे. या संपूर्ण शिबिरात इको प्रो चे अध्यक्ष तथा राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी बंडू धोत्रे नियमित त्यांना मार्गदर्शन आणि विविध अभियानाची माहिती देत त्यांना प्रत्यक्ष कृतीशील कार्यक्रमात सहभागी करून घेत आहे. *Special campaign "Youth with nature" on behalf of Eco Pro organization*