जुन्नर : गोद्रे येथे विहीरवर पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण यंत्र बसवा, ..अन्यथा बेमुदत आंदोलन
जुन्नर /आनंद कांबळे
: गोद्रे गावातील उतळेवाडी येथील सार्वजनिक विहीरवर पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण यंत्र (फिल्टर) तसेच जाळी बसवण्यात यावे, अशी मागणी आज (दि.७) किसान सभा महिला गाव समितीच्या वतीने ग्रामपंचायत गोद्रे चे ग्रामसेवक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे
निवेदनात म्हटले आहे की, गोद्रे येथील उतळे वाडी या ठिकाणी सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची विहीर आहे. त्या विहिरीतील पाणी वारंवार दूषित होते. हवेने आजूबाजूच्या परिसरातील कचरा जातो, त्यामुळे अनेक नागरिक, लहान मुले, महिला यांना वारंवार साथीच्या आजाराचा सामना करावा लागतो. त्यामुळे सार्वजनिक विहीरवर पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण यंत्र (फिल्टर) तसेच जाळी बसवण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच, १५ डिसेंबर २०२२ पर्यंत सार्वजनिक विहीरीवर पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण यंत्र बसवले नाही तर ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
किसान सभा महिला गाव समितीच्या अध्यक्ष प्रियांका महेंद्र उतळे, सचिव सोनाली दत्तात्रय सुरकुले, उपाध्यक्ष कमल विलास उतळे, सदस्य सुनीता नामदेव उतळे, लता डिंगबर उतळे, तसेच ग्रामपंचायत गोद्रे च्या सदस्य दीपाली भरत उतळे हे उपस्थित होते.