Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, नोव्हेंबर ०६, २०२२

यंदाही कार्तिकी एकादशी निमित्त वढा येथे यात्रा wadha yatra #khabarbat #india #live #chandrapur

 वढा यात्रेच्या पाश्र्वभुमीवर आयोजित स्वच्छता मोहिमेत आमदार किशोर जोरगेवार यांनी घेतला सहभाग

गुरुदेव सेवा मंडळ यांचा उपक्रमआ. जोरगेवार यांनी केली उपाययोजनांची पाहणी

कार्तिकी एकादशी निमित्त वढा येथे भरणार असलेल्या यात्रेच्या पाश्र्वभुमीवर वढा ग्रामपंचायतीच्या अंतर्गत गुरुदेव सेवा मंडळ यांच्या वतीने वढा येथे स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यात आमदार किशोर जोरगेवार यांनीही सहभाग घेतला. यावेळी येथील सोयी - सुविधांचीही आमदार किशोर जोरगेवार यांनी पाहणी केली. यावेळी वढा येथील सरपंच किशोर वराडकरग्रामपंचायत सदस्य संजय निखारे, विचोडाचे उपसरपंच ऋषभ दुपारेमाजी सरपंच धनराज ठाकरेयंग चांदा ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष राकेश पिंपकळरधनराज हणुमंते, विजय मत्तेपियुष भोगेवारआदित्य निकुरेतृप्तेष माशिरकरराहुल त्रिंबके आदिंची उपस्थिती होती.  आदिंची उपस्थिती होती

   दरवर्षी प्रमाणे यंदाही कार्तिकी एकादशी निमित्त वढा येथे यात्रा भरणार आहे. याची तयारी प्रशासनाच्या वतीने सुरु करण्यात आली आहे. यंदाची यात्रा भव्य होणार असुन यात्रेत येणा-र्या भाविकांच्या सोयी सुविधांकडे विशेष लक्ष देण्याच्या सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रशासनाला केल्या आहे. दरम्यान आज यात्रेच्या पार्श्वभूमीवर गुरुदेव सेवा मंडळ यांच्या वतीने स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावेळी चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थिती दर्शवत स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदविला. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी येथील उपाययोजनांचाही आढावा घेतला आहे. येणा-र्या भाविकांची गैरसोय होणार नाही या दिशेने नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहे. राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेचे त्यांनी कौतुक केले आहे. वढा तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी आपण प्रयत्न करत आहोत. येथील विकास कामांसाठी मोठा निधी उपलब्ध झाला आहे. पूढेही विदर्भातील या पंढरपुरचा विकास करण्याच्या दृष्टीने आपले प्रयत्न असणार असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे. कार्तिकी एकादशी निमित्त भरणार असलेल्या यात्रेसाठी ग्रामपंचायत स्तरावर उत्तम काम सुरु आहे. प्रशासकीय स्तरावरही या बाबतचे उत्तम नियोजन करण्याच्या सुचना आपण केल्या असल्याचे यावेळी त्यांनी ग्रामस्थांना सांगितले. या स्वच्छता मोहिमेत गुरदेव सेवा समितीच्या सेवकांसह  गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.