विद्यार्थ्यांच्या यशात गुरुची मेहनत असते
खासदार बाळू धानोरकर यांचे प्रतिपादन
शिक्षण देणाऱ्या संस्था अनेक आहेत. त्या मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत. मात्र चांगला विद्यार्थी घडविण्यासाठी गुरुची मेहनत असते, असे प्रतिपादन चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांनी केले.
चंद्रपूर शहरातील ख्यातनाम इंस्पायर इंस्टिट्यूटच्या वतीने प्रियदर्शनी सभागृहात आनंदम् ... A Thrill of being inspire या स्नेह मिलन कार्यक्रमाचे आयोजन आज रविवार दिनांक 6 नोव्हेंबर रोजी सकाळी करण्यात आले होते.
याप्रसंगी खासदार बाळूभाऊ धानोरकर व आमदार किशोर जोरगेवार, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, इंस्पायर इंस्टिट्यूटचे संचालक प्राध्यापक विजय बदखल यांची उपस्थिती होती.
यावेळी इन्स्टिट्युटचे यशवंत विद्यार्थी सार्थक माधमशेट्टीवार व वैष्णवी नन्नावरे यांच्या पालकांचा व गौरव मारलेवार याचे अभिनंदन करत मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
इंजीनियरिंग आणि मेडीकलच्या क्षेत्रात आपले उज्ज्वल भविष्य घडविण्याचे स्वप्नं उराशी बाळगून असलेल्या जिल्ह्यातील अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना चंद्रपुरातचं त्यांच्या हक्काचे शैक्षणिक प्लॅटफॉर्म मिळावे यासाठी प्रा. बदखल सर हे मागील अनेक वर्षांपासून सातत्याने कार्यरत आहेत. इंस्पायरच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांनी देखील २०१६ पासून वेळोवेळी आपल्या यशाची चुणूक देशात दाखवून दिलेली आहे, असे गौरव उद्गार खासदार बाळू धानोरकर यांनी केले.
इंस्पायरच्या विद्यार्थ्यांनी यापुढेही आपल्या यशाची परंपरा कायम ठेवण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे, सातत्यपूर्ण अभ्यास आणि काळाचे भान ठेवत स्वतःला सिद्ध करावे. आणि आपल्या पालकांचं नाव मोठं करावं असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केले. याठिकाणी उपस्थित मान्यवरांनी देखील विद्यार्थ्यांना संबोधित केले.
या कार्यक्रमाला संस्थेतील विद्यार्थ्यांचे मोठ्या संख्येने उपस्थिती होती.