नागपूर : दिवाकर गोखले यांनी नुकताच महानिर्मितीच्या संचालक (खनिकर्म )पदाचा कार्यभार स्वीकारला. महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अनबलगन यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
गोखले यांनी खनिकर्म शाखेची अभियांत्रिकी पदवी आणि एमबीए.एचआर पदव्युत्तर शिक्षणपूर्ण केले आहे. ते व्हीएनआयटी नागपुरचे माजी विद्यार्थी आहेत.कोल इंडियाच्या भूमिगत आणि| खुल्या खाणीतील कोळसा उत्खननाचे संचालन आणि विविधतांत्रिक कामांच्या सुमारे ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर वेकोलिच्या उमरेड जिल्हा नागपूर येथून महा व्यवस्थापक (खाणकाम) म्हणून नुकतेच ते सेवानिवृत्त झाले.
कोळसा खाण प्रकल्पासाठी वनआणि शासन यांचा समावेश असलेली जमीन संपादन करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिलीआहे. वेकोलिच्या वणी (उत्तरभाग), नागपूर क्षेत्र आणि उमरेड येथे क्षेत्रीय महाव्यवस्थापक म्हणुनही त्यांनी कार्यभार सांभाळलाआहे. विशेष म्हणजे वेकोलिच्या उमरेड भागात फर्स्ट माइल कनेक्टिव्हिटी, सायलो प्रकल्प विकसित करण्यासाठी खाणींमधीलपायाभूत सुविधांच्या विकासाचे धोरण आखण्यात त्यांची निर्णायक भूमिका होती. कोळशाच्या खाणींमध्ये जागतिक खाणकाम आणि कटिंग तंत्रज्ञान जसे कंटिन्युअस मायनर आणि सरफेस मायनरच्या अंमलबजावणीमध्ये ते निपुण आहेत.
महानिर्मितीचे वीजउत्पादन आणि वित्तीय भाग मोठ्या प्रमाणावर कोळशावर अवलंबून असल्याने बीज उत्पादनासाठी आवश्यक कोळसा पुरवठा, उत्तमदर्जा आणि गरेपालमा खाण प्रकल्पकार्यान्वित करण्यास दिवाकर गोखले यांचा अनुभव कामी येईल,असा विश्वास डॉ. पी. अनबलगन यांनी व्यक्त केला आहे.