चंद्रपूर जिल्ह्यात सध्या तरी बर्ड फ्ल्यू चा धोका नाही, नागरिकांनी मांस आणि अंडी खाणे सोडून येईल त्यासोबत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ राजपूत यांनी केले आहे.
कोरोणा नंतर देशात बर्ड फ्लू विषाणूनं हातपाय पसरण्याची तयारी सुरू केलीय. आधी कोरोना ने पोल्ट्री फार्मर चांगलाच धुवून निघाला, त्यातच परत बर्ड फ्ल्यू ने डोकं वर केल्याने पोल्ट्री व्यवसायिकांवर चांगलीच टांगती तलवार लटकली आहे.
देशातील १० राज्यांत बर्ड फ्लू संक्रमण फैलावल्याचं स्पष्ट झालंय. देशात आत्तापर्यंत केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरयाणा, गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड आणि महाराष्ट्र या राज्यांत बर्ड फ्लू आढळला आहे.देशात अनेक ठिकाणी पक्षांमध्ये बर्ड फ्लू संक्रमण आढळलं असलं तरी मानवांमध्ये मात्र अद्याप हे संक्रमण आढळून आलेलं नाही. याच पार्श्वभूमीवर बर्ड फ्लू संक्रमण रोखण्यासाठी राज्यांना कोंबड्यांची विक्री किंवा कुक्कुट उत्पादनांवर बंदी न घालण्याची विनंती केलीय.
उपभोक्त्यांना चिकन आणि अंडी योग्य पद्धतीनं शिजवून खाल्ल्यास बर्डफ्लू चा धोका टाळता येऊ शकतो असे संशोधनात सिद्ध झाले आहे.
चंद्रपूर जिल्हयात आजपर्यंत बर्डफ्लूचा कोणताही संसर्ग आढळलेला नसून पशुसंवर्धन विभाग जिल्ह्यातील संपूर्ण बाबीवर लक्ष ठेऊन आहे, कुक्कुटपालन व्यवसायिकांसाठी अनेक प्रतिबंधक व मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहे अशी माहिती चंद्रपूर जिल्ह्याचे पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ राजपूत यांनी दिली आहे.
या रोगांवर उपाययोजना म्हणून 22 शीघ्र कृती दलाची स्थापना देखील करण्यात आली आहे, वनविभाग सुद्धा स्थलांतरित पक्ष्यांवर नजर ठेवून आहे, आतापर्यंत जिल्ह्यात कोणताही पक्षी मृतावस्थेत आढळला नाही, नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, चंद्रपूर जिल्हा पशुसंवर्धन विभाग बर्डफ्लूशी लढण्यास सज्ज आहे अशी प्रतिक्रिया डॉ. राजपूत यांनी दिली.
ठाणे, महाराष्ट्र : हेल्पालाईन क्रमांक
ठाणे महानगरपालिकेकडूनही हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आला आहे. प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा टोल फ्री क्रमांक १८००२२२१०८ किंवा ०२२ - २५३७१०१० या क्रमांकावर पक्ष्यांच्या मृत्यूशी संबंधित तक्रारी दाखल करण्यासाठी नागरिक संपर्क साधू शकतात.
संक्रमित पक्षी किंवा संक्रमित कोंबड्यांच्या संपर्कात आल्यास मानवांमध्ये हे संक्रमण पसरू शकतं. बर्ड फ्लू विषाणू डोळे, नाक आणि तोंडाद्वारे मानवाच्या शरीरात प्रवेश मिळवू शकतात. यावर उपाय म्हणजे, संक्रमित पक्षी किंवा मेलेल्या पक्ष्यांपासून लांब राहा. तसंच संक्रमित भागात प्रवेश करणं टाळा. चिकन - अंडी खाणं काही काळ टाळलेलंच बरं. किंवा मांसाहारी पदार्थ योग्य पद्धतीने शिजवून मगच खा.
श्वास घेण्यात अडचण, कफ कायम राहणं, डोकेदुखी, सर्दी, घशात सूज येणं, स्नायू दुखणं, उलट्या, ओटीपोटात दुखणे अशा प्रकारची लक्षणे आढळल्यास लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं आवाहन करण्यात आलंय.