चंद्रपूर-गडचिरोली महामार्गावरील मूल एमआयडीसी जवळ ट्रॅव्हल्स पलटली, अनेक प्रवासी जखमी
संपुर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या समृद्धी महामार्गांवरील विदर्भ ट्रॅव्हर्सचा अपघात ताजा असतानाच मुल चंद्रपूर मार्गावर स्लीपर कोच पलटली. ही घटना 15 जुलै रोजी मध्यरात्री रात्री 12 वाजताच्या सुमारास घडली. यात मोठी दुखापत झाली नाही. मात्र, काही प्रवासी जखमी झाले आहेत.
रायपूर वरुन हैदराबाद ला 40 /45 मजुर प्रवासी घेऊन भरधाव वेगाने जाणारी स्लिपर कोच टायगर कंपनी ची ट्रॅव्हल चालकाचे नियंत्रण सुटले. गडचिरोली चंद्रपुर महामार्गावर मूलनजीक m.i.d.c. टी पाँईट जवळ ती भरधाव वेगाने असल्याने रस्त्याचा कडेला शेतात जाऊन पलटली. जवळच असलेल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना या अपघाताची माहिती मिळताच गाडीतील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदत केली. मुल पोलिस स्टेशनला माहिती देण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता मुल पोलिस ताबडतोब घटना स्थळावर दाखल झाले जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. वेळीच मदत मिळाल्याने या अपघातात सुदैवाने जिवितहाणी झाली नाही. मात्र, तरी काही प्रवाशी जखमी आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहे.