Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, जून ०८, २०२३

चंद्रपूर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी तेलंगणा राज्यातून ईव्हीएम मशीन मागविल्या

चंद्रपूर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी तेलंगणा राज्यातून ईव्हीएम मशीन मागविल्या 



चंद्रपूरचे विद्यमान खासदार  बाळूभाऊ नारायण धानोरकर यांचे आकस्मिक निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी भारत निवडणूक आयोगामार्फत येत्या काळात निवडणुकीचा कार्यक्रम होत आहे. त्यासाठी प्रशासकीय हालचाली सुरू झाल्या असून, प्रशासनाने तेलंगणा राज्यातून ईव्हीएम मशीन मागवल्या आहेत. 

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची संभाव्य पोटनिवडणूक लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून निवडणुकीसाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने आवश्यक कारवाई करीत शपथपत्र नामनिर्देशन पत्र ए आणि बी फॉर्म निवडणूक निवडून आलेल्या विजयी उमेदवारांना द्यावयाचे प्रमाणपत्र निवडणुकीसाठी बोटाला लावायची इच्छाही सुधारित पिंक पेपर सील आणि सुधारित ग्रीन पेपर सील देखील तयार ठेवले आहे. 


 निवडणुकीचा कार्यक्रम लक्षात घेता जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी लगतच्या तेलंगणा राज्यातील कामारेड्डी जिल्ह्यातून 800 ईव्हीएम मशीन मागविल्या आहेत. यावरून चंद्रपूरची पोटनिवडणूक होणार हे आता पक्के झाले आहे.


The Election Commission of India is conducting an election program for the vacant seat due to the sudden death of Chandrapur sitting MP Balubhau Narayan Dhanorkar. For this, administrative activities have started and the administration has ordered EVM machines from Telangana state.

Chandrapur lok sabha election

१३ चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची संभाव्य पोट निवडणूक-२०२३ निवडणूकीचे साहित्य उपलब्ध करून देणेबाबतच्या सूचना जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, चंद्रपूर यांना देण्यात आल्या आहेत. (Chandrapur lok sabha election)


१३- चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान सदस्य श्री. बाळूभाऊ नारायण धानोरकर यांचे निधन झाल्यामुळे सदर रिक्त झालेल्या जागेकरिता भारत निवडणूक आयोगामार्फत नजीकच्या काळात निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच, सदर निवडणूकीचे संचलन करण्याकरिता या कार्यालयामार्फत खालील साहित्याचा पुरवठा करण्यात येईल. (Chandrapur lok sabha election)

१. शपथपत्र (Form २६ )
२. नामनिर्देशन पत्र (Form २A)
3. Form A and Form B
४. निवडून आलेल्या उमेदवाराला द्यावयाचे प्रमाणपत्र (Form २२)
५. बोटाला लावायची शाई
६. सुधारित पिंक पेपर सील 
७. सुधारित ग्रीन पेपर सील


१३- चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची पोट निवडणूक जाहीर झाल्यास आपल्याकडे पुनर्वापर करण्याजोगे निवडणूक साहित्य आहे किंवा कसे याबाबत तात्काळ आढावा घेण्यात यावा. तसेच ज्या साहित्याची आवश्यकता आहे याबाबतची अंदाजित मागणी या कार्यालयाकडे करण्यात यावी, ही विनंती (अ. अ. खोचरे ) कक्ष अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग यांनी केली आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.