होय! भारतात एक लाखाची व दहा हजारची नोट अस्तित्वात होती.
फेसबुक लिंक https://bit.ly/32wTBUx
. ५०० आणि १००० च्या नोटा बंद करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या ऐतिहासिक निर्णयाची अगदी गल्लीबोळात चर्चा सुरु होती. पण बऱ्याच जणांना ही गोष्ट माहित नसेल की, वापरत असलेले चलन हद्दपार करण्याचा निर्णय हा काही पहिल्यांदाच घेण्यात आलेला नव्हता.एके काळी आपल्या देशात एक लाख रुपयांची नोट छापण्यात आली होती.
एक लाख रुपयांची नोट नेताजींच्या आझाद हिंद सरकारच्या काळात छापण्यात आल्याची माहिती त्यांचा चालक कर्नल निजामुद्दीन यांनी दिली होती. दहा देशांची मान्यता १९४३ ला स्थापन करण्यात आलेल्या आझाद हिंद बँकेकडून चलनात आणलेल्या या नोटेला होती.१९४६ मध्ये जेव्हा भारत स्वतंत्रही झाला नव्हता तेव्हा, सर्वप्रथम १००० आणि १०००० च्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. १९४९ मध्ये नवनिर्वाचित भारत सरकारने १००० आणि १०००० च्या नोटा पुन्हा वापरत आणल्या.
ही नोट आझाद हिंद सरकार आणि सैनिकांना पाठिंबा देणाऱ्या दहा देशांत व्यवहारात वापरता येत होती. बर्मा, क्रोएशिया, जर्मनी, नानकिंग(चीन), मंचूको, इटली, थायलंड, फिलिपाइन्स, आयर्लंड या देशांचा यामध्ये समावेश होता. या नोटेशिवाय आझाद हिंद बँकेने दहा रुपयांचे नाणेही चलनात आणले होते.ही झाली स्वातंत्र्यपुर्व घटना.पण देशाला स्वातंत्र्य मिळालेनंतर १०,००० व ५,००० च्या नोटा वापरात होत्या.
१९७८ साली मोरारजी देसाई यांच्या जनता सरकारने १०००, ५००० आणि १०,००० च्या नोटा वापरातून बंद करण्याचा निर्णय ‘तत्कालीन’ जाहीर केला आणि अर्थकारणाच्या पटलावर तो एक चर्चेचा विषय होऊन बसला होता.
देशाचे अर्थमंत्री म्हणून कारभार पाहिलेल्या मोरारजी देसाई यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर १६ जानेवारी १९७८ च्या रात्री १०००, ५००० आणि १०,००० च्या नोटा चलनातून बाद करण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला होता. तेव्हाही दुसऱ्या दिवशी म्हणजे १७ जानेवारी १९७८ रोजी सर्व बँका बंद ठेवण्यात आल्या होत्या.
आणीबाणी प्रकरणावरून जनतेचा रोष ओढवून घेतलेल्या कॉंग्रेस पक्षाला सत्तेतून पायउतार व्हाव लागलं आणि नवीन सरकार म्हणून जनता पक्ष सत्तेत आला होता. तेव्हा अर्थमंत्री म्हणून कारभार पाहत होते – ‘एच.एम. पटेल’ ते देखील गुजरातचेच.
सरकारच्या या निर्णयानंतर लोकांमध्ये ही देखील कुजबुज सुरु होती की, कॉंग्रेस आणि इतर विरोधी पक्षांकडे असणाऱ्या सीक्रेट फंड्स ना चाप बसवण्यासाठी नवनिर्वाचित जनता सरकारने निर्णयाच्या आडून ही नवी युक्ती लढवली आहे.
पण तेव्हाच्या आणि मोदींनी घेतलेल्या निर्णयाच्या परि तीमध्ये खूप मोठा फरक होता. मोदींनी घेतलेल्या निर्णयाला विद्यमान आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेल यांचा पाठींबा लाभला होता. प्रत्येक नोटेवर एक प्रकारचे चित्र छापलेले असते. हे चित्र एखाद्या प्राणी, भौगोलिक रचना, मनुष्य किंवा स्वातंत्र्य आंदोलनाशी संबंधित असते