कंडोमचा शोध लागण्याआधी गर्भधारणा रोखण्यासाठी लोक वापरायच्या या विचित्र पद्धती
फेसबुक लिंकhttps://bit.ly/3lTNMrY
खूप आधीपासून माणसाने गर्भधारणा होऊ नये म्हणून अनेक पद्धतीचा उपयोग केला आहे आणि त्याचेच अपडेटेड व्हर्जन म्हणजे आजकाल बाजारात मिळणार कंडोम. पूर्वीच्या इजिप्त मध्ये अकासिया या झाडाची पाने, मध एका मऊ कापडासोबत गर्भधारणेच्या मार्गात ठेवले जायचे जेणेकरून ते शुक्राणूला अडवतील.
आजच्या काळात नको असलेली गर्भधारणा होण्यापासून रोखण्यासाठी अनेक उपाय आहे. त्यातल्या त्यात कंडोम हा सर्वात सोपा आणि सुरक्षित पर्याय म्हणून वापरला जातो. पण ज्या काळात कंडोम किवा आजच्या आधुनिक युगात उपलब्ध असलेल्या सुरक्षित पर्यायांपैकी हे सर्व साधनं उपलब्ध नव्हते तेव्हा स्त्रिया गर्भवती होण्यापासून वाचण्यासाठी कुठले कुठले उपाय करत असतील? हा प्रश्न बऱ्याच जणांना पडला असेल.
तेव्हाचे लोक गर्भधारणा रोखण्यासाठी खूप विचित्र अश्या पद्धतींचा वापर करायचे जाणून घेऊया कोणत्या होत्या त्या पद्धती ग्रीसमध्ये नको असेलेली गर्भधारणा रोखण्यासाठी स्त्रियांना लोखंडाचे पाणी प्यायला द्यायचे असे पाणी ज्यात लोहार आपले अवजार थंड करतो. हे पाणी पिल्याने शुक्राणू हे योनीतच नष्ट होऊन जात. तर चीनमध्ये स्त्रियांना लेड आणि मर्क्युरीचे मिक्श्चर प्यायला दिले जात होते. हे मिक्श्चर इतके घातक होते की यामुळे गर्भाशयच नाही तर किडनी आणि मेंदूला देखील इजा पोहोचत होती.,इंडोनेशियामध्ये कंडोमचा शोध लागण्याआधी स्त्रिया अफूच्या झाडाचा वापर संभोग करताना करायच्या जेणेकरून त्या गर्भवती होणार नाहीत. गर्भधारणा होण्यापासून थांबिण्यासाठी आधीच्या काळी लोक लिंबाचा वापर देखील करत असतं. असे मानल्या जाते की, ह्यामध्ये सायट्रस अॅसिड जे स्पर्म ला नष्ट करू शकतात. पण हा उपाय ही धोकादायक आहे.
पूर्ण इतिहास वाचताना आणि इथे लिहिताना आधीच्या स्त्रियांनी किती त्रास सहन केलाय याची प्रचिती येते. पिल्स ठीक आहे पण संततीनिरोधनाची साधन खूपच विचित्र होती. बहुतेकांमुळे संसर्ग आणि शारीरिक वेदना व्हायच्या.
आतापर्यंत झालेल्या सुधारणेला सलाम