Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

जनरल नॉलेज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
जनरल नॉलेज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, सप्टेंबर १६, २०२०

म्युचुअल@ फंड म्हणजे काय

म्युचुअल@ फंड म्हणजे काय

 म्युचुअल फंड म्हणजे काय? 

''
 तारीख  16  सप्टेंबर 2020

फेसबुक लिंक https://bit.ly/3c1CEEQ
म्युच्युअल फंड म्हणजे काय?म्युच्युअल फंड बद्दल थोडक्यात सांगायचे झाले तर असे म्हणता येईल कि अनेक लोकाना शेअर बाजारात गुंतवणूक करावीशी वाटते. त्यांचेकडे पैसेही असतात मात्र त्यांना शेअर बाजाराचे ज्ञान पुरेशा प्रमाणात नसते अशांसाठी आपल्या देशात प्रथमतः सरकारचे सहभागाने युनिट ट्रष्ट औफ इंडिया या असेट मॅनेजमेंट कंपनीची स्थापना सन १९६४ मधे करण्यात आली.

म्युचुअल फंड म्हणजे काय?

आपल्यापैकी बरेच जणानी युनिट ६४ बाबत ऐकले असेलच. हिच भारतातिल पहिली म्युच्युअल फंड कंपनी.@ १९८६ मधे सर्वजनीक बॅंकाना म्युच्युअल फंड स्थापण्याची परवानगी देण्या आली. १९९३ पासून खाजगी म्युच्युअल फंडाना परवानगी मिळालि. सद्या देशात ३२ म्युच्युअल फंड कंपन्या कार्यरत आहेत. पहिली बाब म्हणजे तुम्ही म्युच्युअलफंडात गुंतवणुक करता तेव्हा एकटे नसता. आपल्या पैशानी मोठ काम कराव आणि ते तज्ञानी आपल्या वतीने करुन द्यावे असा तुमच्यासारखा विचार करणारे इतर अनेक गुंतवणूकदार तुमच्या सोबत असतात.@तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणुक केली की तुमच्यासारख ध्येय असणा-या गुंतवणूकदारांचे पैशासोबत तुमचे पैसे एकत्र केले जातात. @तुम्ही केलेल्या गुंतवणूकीच्या बदल्यात तुम्हाला युनिटस अदा केली जातात. (तुम्ही केलेली गुंतवणूक रुपये / त्या दिवशीचे गुंतवणूक मुल्य म्हणजेच NAV = तुम्हाला अदा केलेली युनिटस्) मग हे पैसे म्युच्युअलफंड कंपनीचा फंड मॅनेजर शेअर्स।डिबेंचर्स ते मनी मार्केट पर्यंतच्या वेगवेगळ्या सिक्युरिटीजमध्ये गुंतवतात.

त्याला कॉर्पस या नावानेही ओळखले जाते. रोजच्या रोज सायंकाळी गुंतवणूकीचे मुल्यांकन केले जाते आणि प्रत्येक युनिटचे मुल्य NAV जाहीर केले जाते. अशाप्रकारे म्युच्युअल फंड तुम्हाला @तुलनात्मक दॄष्ट्या कमी खर्चात विविधिकॄत व्यावसायिक व्यवस्थापन झालेल्या गुंतवणूक संधित गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध करुन देतो. म्युच्युअल फंडाची संपूर्ण माहिति AMFI च्या वेब साइटवर उपलब्ध आहे.@

मंगळवार, सप्टेंबर १५, २०२०

होय! भारतात एक लाखाची व  दहा हजारची नोट अस्तित्वात होती.

होय! भारतात एक लाखाची व दहा हजारची नोट अस्तित्वात होती.

   होय! भारतात एक लाखाची व  दहा हजारची नोट अस्तित्वात होती.  


.         दि. १५  सप्टेंबर  २०20 

फेसबुक लिंक https://bit.ly/32wTBUx
  .       ५०० आणि १००० च्या नोटा बंद करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या ऐतिहासिक निर्णयाची अगदी गल्लीबोळात चर्चा सुरु होती. पण बऱ्याच जणांना ही गोष्ट माहित नसेल की, वापरत असलेले चलन हद्दपार करण्याचा निर्णय हा काही पहिल्यांदाच घेण्यात आलेला नव्हता.एके काळी आपल्या देशात एक लाख रुपयांची नोट छापण्यात आली होती.


एक लाख रुपयांची नोट नेताजींच्या आझाद हिंद सरकारच्या काळात छापण्यात आल्याची माहिती त्यांचा चालक कर्नल निजामुद्दीन यांनी दिली होती. दहा देशांची मान्यता १९४३ ला स्थापन करण्यात आलेल्या आझाद हिंद बँकेकडून चलनात आणलेल्या या नोटेला होती.
भारतात एक लाखाची व  दहा हजारची नोट अस्तित्वात होती.
ही नोट आझाद हिंद सरकार आणि सैनिकांना पाठिंबा देणाऱ्या दहा देशांत व्यवहारात वापरता येत होती. बर्मा, क्रोएशिया, जर्मनी, नानकिंग(चीन), मंचूको, इटली, थायलंड, फिलिपाइन्स, आयर्लंड या देशांचा यामध्ये समावेश होता. या नोटेशिवाय आझाद हिंद बँकेने दहा रुपयांचे नाणेही चलनात आणले होते.ही झाली स्वातंत्र्यपुर्व घटना.पण देशाला स्वातंत्र्य मिळालेनंतर १०,००० व ५,००० च्या नोटा वापरात होत्या.

१९४६ मध्ये जेव्हा भारत स्वतंत्रही झाला नव्हता तेव्हा, सर्वप्रथम १००० आणि १०००० च्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. १९४९ मध्ये नवनिर्वाचित भारत सरकारने १००० आणि १०००० च्या नोटा पुन्हा वापरत आणल्या.
१९७८ साली मोरारजी देसाई यांच्या जनता सरकारने  १०००, ५००० आणि १०,००० च्या नोटा वापरातून बंद करण्याचा निर्णय ‘तत्कालीन’  जाहीर केला आणि अर्थकारणाच्या पटलावर तो एक चर्चेचा विषय होऊन बसला होता.
भारतात एक लाखाची व  दहा हजारची नोट अस्तित्वात होती.

देशाचे अर्थमंत्री म्हणून कारभार पाहिलेल्या मोरारजी देसाई यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर १६ जानेवारी १९७८ च्या रात्री १०००, ५००० आणि १०,००० च्या नोटा चलनातून बाद करण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला होता. तेव्हाही दुसऱ्या दिवशी म्हणजे १७ जानेवारी १९७८ रोजी सर्व बँका बंद ठेवण्यात आल्या होत्या.
आणीबाणी प्रकरणावरून जनतेचा रोष ओढवून घेतलेल्या कॉंग्रेस पक्षाला सत्तेतून पायउतार व्हाव लागलं आणि नवीन सरकार म्हणून जनता पक्ष सत्तेत आला होता.  तेव्हा अर्थमंत्री म्हणून कारभार पाहत होते – ‘एच.एम. पटेल’ ते देखील गुजरातचेच.
सरकारच्या या निर्णयानंतर लोकांमध्ये ही देखील कुजबुज सुरु होती की, कॉंग्रेस आणि इतर विरोधी पक्षांकडे असणाऱ्या सीक्रेट फंड्स ना चाप बसवण्यासाठी नवनिर्वाचित जनता सरकारने निर्णयाच्या आडून ही नवी युक्ती लढवली आहे.
पण तेव्हाच्या आणि मोदींनी घेतलेल्या निर्णयाच्या परि तीमध्ये खूप मोठा फरक होता. मोदींनी घेतलेल्या निर्णयाला विद्यमान आरबीआय गव्हर्नर उर्जित  पटेल यांचा पाठींबा लाभला होता. प्रत्येक नोटेवर एक प्रकारचे चित्र छापलेले असते. हे चित्र एखाद्या प्राणी, भौगोलिक रचना, मनुष्य किंवा स्वातंत्र्य आंदोलनाशी संबंधित असते
____________________________
*🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* *☜♡☞*
┏━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┓
    _*माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_
┗━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┛

सोमवार, सप्टेंबर १४, २०२०

रेल्वे रूळाखाली खडी का टाकलेली असते ?

रेल्वे रूळाखाली खडी का टाकलेली असते ?

 रेल्वे रूळाखाली खडी का टाकलेली असते ? 

रेल्वे मार्ग म्हटल्याबरोबर आपणासमोर रेल्वे रूळ व त्याखाली खडी असे चित्र उभे राहते., रेल्वेच्या गाडीचे वजन ट्रॅकवर तोलले जाते. साहजिकच यासाठी रेल्वेचा रुळ मजबूत असणे गरजेचा असतो. रुळांची दुरुस्ती, देखभाल सातत्याने करत राहावी लागते. जेव्हा रेल्वे धावत असते. तेव्हा जमीन आणि रेल्वे रुळांमध्ये कंपन निर्माण होते. उष्ण तापमानात रूळ प्रसरण पावतात. आणि थंडीमध्ये आकुंचन पावतात. वातावरणातील बदलांमुळे रेल्वे रूळांच्या आसपास रानटी गवत उगवते.
रेल्वे रूळाखाली खडी का टाकलेली असते ?
या सर्व गोष्टींना उपाय म्हणून रेल्वे रुळांमध्ये दगडी खडी टाकली जाते. जेव्हा ट्रेन रुळावर धावते तेव्हा ट्रॅकमध्ये कंपन तयार होतात आणि यामुळे ट्रॅक पसरण्याची शक्यता वाढते. ही दगडी खडी लाकडाच्या पट्ट्यांना जखडून ठेवते आणि लाकडाच्या पट्ट्या रूळाला जखडून ठेवतात…!  तसेच हवामान बदलण्याच्या वेळीही ट्रॅक पसरण्याची शक्यता असते, त्यामुळे कंपन कमी करण्यासाठी रुळांच्या कडेला दगडी खडी ठेवण्यात येते. त्यामुळे ट्रॅकच्या आसपास गवत किंवा झाडे लावली जात नाहीत. छोट्या दगडांना (एकत्रितपणे) तांत्रिक भाषेत ट्रॅक ब्लास्ट असे संबोण्यात येते. हे मूलतः ट्रॅकबेड (एक प्रकारची खडीची गादी) तयार करते ज्याच्यावर स्लीपर ठेवलेले असतात.
ट्रॅकखाली लाकडी प्लेट(आता काही ठिकाणी लोखंडी किंवा सिमेंट प्लेट असतात.)ठेवण्याचे दुसरे कारण असे आहे की जेव्हा ट्रेन फिरते तेव्हा संपूर्ण भार ट्रॅक ऐवजी लाकडावर पडतो आणि आजूबाजूच्या दगडांमुळे, त्यास बरेच बळ मिळते जेणेकरून ते घसरत नाही.

शनिवार, सप्टेंबर १२, २०२०

उदमांजराच्या विष्ठेतील बियांपासून तयार होते महागडी कॉफी, किंमत माहितीये?

उदमांजराच्या विष्ठेतील बियांपासून तयार होते महागडी कॉफी, किंमत माहितीये?

⭕ उदमांजराच्या विष्ठेतील बियांपासून तयार होते महागडी कॉफी, किंमत माहितीये? ⭕

'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''
    *_우   माहिती सेवा ग्रूप पेठवड़गाव   우_*   '''''''''''''''''''''''''''''''''''''''''''🔻'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''
*_🌷 तारीख  12 सप्टेंबर 2020 🌷_*
''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''🔻''''''''''''''''''''''''''''''''''''''''''

फेसबुक लिंक https://bit.ly/3kdbApc
आजकाल कॉफीशिवाय आपलं पानच हलत नाही. वाईट मूडही फटक्यात ठीक करायचा असेल किंवा झोप घालवायची असेल@ तर एक कप कॉफी पुरेशी ठरते. कॉफीची निर्मिती आणि निर्यात करणारा भारत हा आशिया खंडातला तिसरा मोठा देश आहे. पण आता कॉफी निर्मितीमध्ये भारताने एका पाऊल पुढे टाकायचं ठरवलं आहे. @तेव्हा लवकरच भारत जगातील सर्वात महागडी कॉफी निर्यात करणार आहे. या कॉफीची भारतातील@ किंमत ८ हजार रुपये किलो तर आखाती आणि युरोपीय देशांतील किंमत २० ते २५ हजार रुपये किलोच्या आसपास असेल.आता तुम्हाला ही किंमत ऐकून धक्का बसला असेल. एवढी किंमत असण्यामागचं कारण काय असू शकतं? असा प्रश्न साहजिकच तुम्हाला पडला असेल.
ही महागडी कॉफी उदमांजरच्या (civet cat) विष्ठेतील कॉफीच्या बियांपासूनतयार केली जाते. हे वाचून तुम्ही नाक वगैरे मुरडलं असेल यात काहीच शंका नाही. पण ही कॉफी अशाचप्रकारे तयार केली जाते. @उदमांजर कॉफीची फळं खातात. फळांचा गर ती सहज पचवते पण बिया मात्र उदमांजरांना पचवता येत नाही.@ तिच्या विष्ठेमार्फत बियाबाहेर फेकल्या जातात. उदमांजर कॉफीची तिचं फळं खाते जी चांगली आणि पिकलेली असतात, अशीही धारणा आहे. @मांजरीच्या पोटात असलेल्याद्रव्यामुळे कॉफीच्या बियांची चव वाढवण्यास मदत होते.@



तिची विष्ठा गोळा केल्यानंतर त्यातून बिया वेगळ्या केल्या जातात
@आणि त्यानंतर त्यापासून कॉफी तयार केली जाते. ‘कूर्ग कन्सॉलिडेटेड कमॉडिटिज’ या कॉफीची निर्मिती करत असून,@ *‘अॅनिमेन’* या ब्रँडखाली तिची विक्री होणार आहे. अनेक ठिकाणी उदमांजरांना पकडून @त्यांना बळजबरीने कॉफीची फळं खाऊ घालण्याची सक्ती केली जाते. पण कुर्गमध्ये मात्र या प्राण्यांवर कोणतीही बळजबरी न करता नैसर्गिक मार्गानेचे तिची निर्मिती करण्यात येणार आहे.
*_९८ ९० ८७ ५४ ९८_*              
*_▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬_*
         🐅 *माहिती सेवा ग्रुप, पेठवड़गाव* 🐅
*_▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬

शुक्रवार, सप्टेंबर ११, २०२०

१२०० वर्षांपासून इंचभरही न हललेला ‘दगड ;

१२०० वर्षांपासून इंचभरही न हललेला ‘दगड ;

१२०० वर्षांपासून इंचभरही न हललेला ‘दगड 




.        दि. ११ सप्टेंबर  २०१८ 

फेसबुक लिंक https://bit.ly/3bMY34t

आता पडेल की मग पडेल असे वाटणारा हा दगड १२०० वर्षांपासून एका सिद्धपुरुषासारखा एकाच ठिकाणी हा दगड टिकून आहे. तेव्हापासून आजपर्यंत एकही सजीव प्राणी या दगडाला हलवू शकलेला नाही. तामिळनाडू राज्यातील महाबलीपुरममध्ये ठाण मांडून बसलेला हा दगड आजही तेथे जाणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेतो.या दगडाला स्थानिक भाषेत Vaan Irai Kal (Krishna’s Butterball) अर्थात कृष्णाचा प्रचंड चेंडू म्हणून ओळखले जाते. 

चेन्नई येथून ६० किलोमीटर अंतरावर महाबलीपूरम हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. याच्याजवळ एका टेकडीच्या कड्यावर २० फूट उंच, १६ फूट रुंद आणि २५० टन वजनाचा अजस्र असा गोल दगड आहे. यालाच श्रीकृष्णाच्या लोण्याचा गोळा किंवा चेंडु या नावाने ओळखले जाते. हा दगड सुमारे १ सहस्र २०० वर्षांपासून तेथे असल्याचे समजले जाते.या भल्यामोठ्या दगडाकडे पाहिल्यावर सर्वप्रथम तुम्हाला वाटेल की तो पडायला आलंय की काय? पण तसं अजिबात नाहीये. अहो ७ हत्ती एकत्र आले तरी हा दगड हलत नाही.एका उतारावर हा प्रचंड दगड टिकून आहे. हा दगड जवळपास १२०० वर्षे जुना असून त्याची उंची २० फुट आणि रुंदी ५ फुट इतकी आहे. याचे वजन तब्बल २५० टन इतके आहे.

१२०० वर्षांपासून इंचभरही न हललेला ‘दगड

१९०८ मध्ये तत्कालीन मद्रास प्रांताचे राज्यपाल (गव्हर्नर) आर्थर लॉली यांनी ७ हत्ती वापरून हा दगड हलवण्याचे असफल प्रयत्न केले होते.
इथे येणाऱ्या प्रत्येक माणसाला एकाच चिंता लागून राहिलेली असते की दुर्दैवाने जर हा गडद कोसळला तर त्यामुळे काय हाहाकार होईल सांगता येत नाही.असाच प्रयत्न पल्लव वंशातील नरसिंह वर्मन राजानेही केला होता; मात्र त्याचा उद्देश या दगडाला शिल्पकारांनी हात लावू नये, असा होता.हा दगड वर्षानुवर्ष एवढा स्थिर आणि तोल राखून कसा उभा आहे हे एक न सुटलेलं कोडं आहे.सध्या हे ठिकाण पर्यटकांमध्ये फारच प्रसिद्ध असून रोज शेकडो पर्यटक या दगडाची भेट घेण्यासाठी येतात.
____________________________
🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498 ☜♡☞
┏━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┓
    _*माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_
┗━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┛