Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, सप्टेंबर १२, २०२०

उदमांजराच्या विष्ठेतील बियांपासून तयार होते महागडी कॉफी, किंमत माहितीये?

⭕ उदमांजराच्या विष्ठेतील बियांपासून तयार होते महागडी कॉफी, किंमत माहितीये? ⭕

'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''
    *_우   माहिती सेवा ग्रूप पेठवड़गाव   우_*   '''''''''''''''''''''''''''''''''''''''''''🔻'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''
*_🌷 तारीख  12 सप्टेंबर 2020 🌷_*
''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''🔻''''''''''''''''''''''''''''''''''''''''''

फेसबुक लिंक https://bit.ly/3kdbApc
आजकाल कॉफीशिवाय आपलं पानच हलत नाही. वाईट मूडही फटक्यात ठीक करायचा असेल किंवा झोप घालवायची असेल@ तर एक कप कॉफी पुरेशी ठरते. कॉफीची निर्मिती आणि निर्यात करणारा भारत हा आशिया खंडातला तिसरा मोठा देश आहे. पण आता कॉफी निर्मितीमध्ये भारताने एका पाऊल पुढे टाकायचं ठरवलं आहे. @तेव्हा लवकरच भारत जगातील सर्वात महागडी कॉफी निर्यात करणार आहे. या कॉफीची भारतातील@ किंमत ८ हजार रुपये किलो तर आखाती आणि युरोपीय देशांतील किंमत २० ते २५ हजार रुपये किलोच्या आसपास असेल.आता तुम्हाला ही किंमत ऐकून धक्का बसला असेल. एवढी किंमत असण्यामागचं कारण काय असू शकतं? असा प्रश्न साहजिकच तुम्हाला पडला असेल.
ही महागडी कॉफी उदमांजरच्या (civet cat) विष्ठेतील कॉफीच्या बियांपासूनतयार केली जाते. हे वाचून तुम्ही नाक वगैरे मुरडलं असेल यात काहीच शंका नाही. पण ही कॉफी अशाचप्रकारे तयार केली जाते. @उदमांजर कॉफीची फळं खातात. फळांचा गर ती सहज पचवते पण बिया मात्र उदमांजरांना पचवता येत नाही.@ तिच्या विष्ठेमार्फत बियाबाहेर फेकल्या जातात. उदमांजर कॉफीची तिचं फळं खाते जी चांगली आणि पिकलेली असतात, अशीही धारणा आहे. @मांजरीच्या पोटात असलेल्याद्रव्यामुळे कॉफीच्या बियांची चव वाढवण्यास मदत होते.@



तिची विष्ठा गोळा केल्यानंतर त्यातून बिया वेगळ्या केल्या जातात
@आणि त्यानंतर त्यापासून कॉफी तयार केली जाते. ‘कूर्ग कन्सॉलिडेटेड कमॉडिटिज’ या कॉफीची निर्मिती करत असून,@ *‘अॅनिमेन’* या ब्रँडखाली तिची विक्री होणार आहे. अनेक ठिकाणी उदमांजरांना पकडून @त्यांना बळजबरीने कॉफीची फळं खाऊ घालण्याची सक्ती केली जाते. पण कुर्गमध्ये मात्र या प्राण्यांवर कोणतीही बळजबरी न करता नैसर्गिक मार्गानेचे तिची निर्मिती करण्यात येणार आहे.
*_९८ ९० ८७ ५४ ९८_*              
*_▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬_*
         🐅 *माहिती सेवा ग्रुप, पेठवड़गाव* 🐅
*_▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.