Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, फेब्रुवारी ०२, २०२१

अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेयर फाऊंडेशन वाढवीत आहे महिला बचत गटांचा आत्मविश्वास



 

आवाळपूर :-  महिला सक्षमीकरण व सबलीकरण व्हावं या उदांत हेतूने मागील अनेक वर्षापासून अल्ट्राटेक कम्युनीटी वेलफेयर फाऊंडेशन महिला बचत गट उन्नतीचे कार्यक्रम राबवीत आहे. कोरोना काळात देखील सातत्याने पुढाकार घेऊन त्यांना रोजगार उपलब्ध या दृष्टीने सतत आत्मविश्वास वाढवून त्यांना पायावरती खंबिरपणे उभे राहण्यास शिकविले जात आहे.

 याच उद्देशाने सी. एस. आर. ऑफिस मध्ये अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेयर फाऊंडेशन  उपाध्यक्ष माननीय संजय शर्मा  यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. या सभेला क्रिष्णा महिला बचत गट, सांगोडा, धनलक्ष्मी महिला बचत गट, बीबी, वीरांगना स्वयंसहायता बचत गट, नांदा व ऊन्नती स्वयंसहायता बचत गट, नोकारी यांचा समावेश होता. मार्गदर्शनात माननीय संजय शर्मा साहेब यांनी बचत गटांनी बनविलेल्या साहित्याची विक्री अधिका-अधिक कशी करता येईल हे उदाहरणासह बचत गटांच्या महिलांना समजावून सांगितले. 

या सभेला सचिन गोवारदीपे, देविदास मांदाळे व सचिन देवघरे यांची सुद्धा उपस्थिती होते.

विशेष म्हणजे आधी महिला बचत गट चार साहित्य बनवत होते. आता तेच जवळपास 15 साहित्य बनवत असून महिन्याची विक्री सुद्धा वाढली आहे.

साहित्यात - अगरबत्ती, धूप अगरबत्ती, फिनाईल, भांड्याचे लिक्विड, चाय पत्ती,निरमा,हलदी पावडर,मिरची पावडर,पेपर बँग, कापडाची थैली , नोस  मास्क , लिफाफा, मोहाचे लाडू, तिळ गुड लाडू, प्रसाद दाना, हलवा यांचा समावेश आहे व  त्यांना विक्री करण्याकरिता ते को-ऑपरेटिव्ह सोसायटी, ए .सी. डब्ल्यू.  आवारपुर मध्ये विक्रीकरिता ठेवण्यात आले आहे.

आमच्या यशामागे तुमचा नेहमी सहभाग राहिला आहे मार्गदर्शनामुळे आम्ही आज आत्मविश्वासाने उभे आहोत.

असे मत महिला बचत गटाचा महिलांनी व्यक्त करीत अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशनचे आभार मानले.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.