Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, फेब्रुवारी ०२, २०२१

अन्यथा महावितरण कार्यालयांना टाळे ठोकू माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा राज्य सरकारला इशारा

 वीज पुरवठा खंडीत करण्याचा निर्णय त्वरीत मागे घ्या,

      


      राज्यातील 72 लाख वीज जोडण्यांचा पुरवठा खंडीत करण्याचा जुलमी निर्णय महाविकास आघाडी सरकारने त्वरीत मागे घ्यावा अन्यथा 5 फेब्रुवारीला भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते राज्यभर महावितरण कार्यालयांना टाळे ठोकतील, असा इशारा माजी ऊर्जामंत्री व भाजपा प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी दिला.
मुंबई भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी भाजप प्रदेश माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक उपस्थित होते.
श्री. बावनकुळे म्हणाले की, कोरोना काळात जनतेला वीज बिल माफीचे आश्वासन देणारे सरकार आता सक्तीने वीज बिल वसूली करून जनतेला नाहक त्रास देत आहे. थकीत बिल भरले नाही तर वीज पुरवठा खंडीत करण्याचा निर्णय घेणारे हे सरकार किती असंवेदनशील आहे हे यावरून दिसून येते. मात्र, आम्ही या आघाडी सरकारला मनमानी कारभार करू देणार नाही. भाजपाचे कार्यकर्त 5 फेब्रुवारीला रस्त्यावर उतरून आंदोलन करतील. तसेच वीज पुरवठा खंडीत करण्यास येणाऱ्या महावितरण च्या कर्मचाऱ्यांना अटकावही करतील.
फडणवीस सरकारच्या काळात आम्ही कधीच शेतकऱ्यांना वीज बिल भरण्याची सक्ती केली नाही. यामुळे थकबाकी वाढली तरी तो भार राज्य सरकारने स्वत:वर घेतला. आमचे राज्य असताना कृषी क्षेत्रासाठी साडेसात लाख नवीन वीज जोडण्या दिल्या. पण वीज कंपन्यांही फायद्यात राहील्या होत्या. जर आम्हाला हे शक्य होते तर आताच्या सरकारला का कठिण आहे, असा सवालही श्री. बावनकुळे यांनी केला.
कोरोना काळात आवाजवी वीज बिल आल्यावर ती बिलं भरण्याची क्षमता सामान्य माणसाकडे नाही. विविध कारणांनी संकटात आलेला शेतकरीही वीज बिल भरण्याच्या अवस्थेत नाही. अवाजवी बिलं दुरुस्त करण्याची घोषणाही प्रत्यक्षात आली नाही. कोरोना प्रसारापूर्वी या सरकारच्या ऊर्जामंत्र्यांनीच 100 युनिट पर्यंतचे वीज बिलं माफ करण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासनही प्रत्यक्षात आले नाही. जर दिलेली आश्वासने पूर्ण करायची धमक नसेल तर निदान अशी सक्तीने वीज बिलं वसूली करून आधिच आर्थिक संकटात असलेल्या शेतकरी बांधवांना आणि सर्वसामान्य जनतेला अडचणीत टाकू नका, असेही श्री. बावनकुळे यांनी नमूद केले.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.