Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, सप्टेंबर ११, २०२०

१२०० वर्षांपासून इंचभरही न हललेला ‘दगड ;

१२०० वर्षांपासून इंचभरही न हललेला ‘दगड 




.        दि. ११ सप्टेंबर  २०१८ 

फेसबुक लिंक https://bit.ly/3bMY34t

आता पडेल की मग पडेल असे वाटणारा हा दगड १२०० वर्षांपासून एका सिद्धपुरुषासारखा एकाच ठिकाणी हा दगड टिकून आहे. तेव्हापासून आजपर्यंत एकही सजीव प्राणी या दगडाला हलवू शकलेला नाही. तामिळनाडू राज्यातील महाबलीपुरममध्ये ठाण मांडून बसलेला हा दगड आजही तेथे जाणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेतो.या दगडाला स्थानिक भाषेत Vaan Irai Kal (Krishna’s Butterball) अर्थात कृष्णाचा प्रचंड चेंडू म्हणून ओळखले जाते. 

चेन्नई येथून ६० किलोमीटर अंतरावर महाबलीपूरम हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. याच्याजवळ एका टेकडीच्या कड्यावर २० फूट उंच, १६ फूट रुंद आणि २५० टन वजनाचा अजस्र असा गोल दगड आहे. यालाच श्रीकृष्णाच्या लोण्याचा गोळा किंवा चेंडु या नावाने ओळखले जाते. हा दगड सुमारे १ सहस्र २०० वर्षांपासून तेथे असल्याचे समजले जाते.या भल्यामोठ्या दगडाकडे पाहिल्यावर सर्वप्रथम तुम्हाला वाटेल की तो पडायला आलंय की काय? पण तसं अजिबात नाहीये. अहो ७ हत्ती एकत्र आले तरी हा दगड हलत नाही.एका उतारावर हा प्रचंड दगड टिकून आहे. हा दगड जवळपास १२०० वर्षे जुना असून त्याची उंची २० फुट आणि रुंदी ५ फुट इतकी आहे. याचे वजन तब्बल २५० टन इतके आहे.

१२०० वर्षांपासून इंचभरही न हललेला ‘दगड

१९०८ मध्ये तत्कालीन मद्रास प्रांताचे राज्यपाल (गव्हर्नर) आर्थर लॉली यांनी ७ हत्ती वापरून हा दगड हलवण्याचे असफल प्रयत्न केले होते.
इथे येणाऱ्या प्रत्येक माणसाला एकाच चिंता लागून राहिलेली असते की दुर्दैवाने जर हा गडद कोसळला तर त्यामुळे काय हाहाकार होईल सांगता येत नाही.असाच प्रयत्न पल्लव वंशातील नरसिंह वर्मन राजानेही केला होता; मात्र त्याचा उद्देश या दगडाला शिल्पकारांनी हात लावू नये, असा होता.हा दगड वर्षानुवर्ष एवढा स्थिर आणि तोल राखून कसा उभा आहे हे एक न सुटलेलं कोडं आहे.सध्या हे ठिकाण पर्यटकांमध्ये फारच प्रसिद्ध असून रोज शेकडो पर्यटक या दगडाची भेट घेण्यासाठी येतात.
____________________________
🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498 ☜♡☞
┏━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┓
    _*माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_
┗━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┛


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.