नागपूर जिल्ह्यात युरियाची टंचाई वाढत असल्यामुळे शेतकर्याना त्वरित युरिया पुरवठा करण्यासह कृषी विभागाकडून आलेल्या युरियाचा गैरवापर व काळाबाजारी थांबविण्याची मागणी होत आहे.
नागपुर जिल्ह्यामधे युरियाचा तुटवडा वाढत आहे प्रत्येक वर्षी शेतकर्याँना युरियचे खत 51000 मेट्रिक टन लागते आनी आतपर्यंत 44000 मेट्रिक टन आलेले आहे. तरिही 50 प्रतिशत शेतकर्याँना अजुनही युरियचा एकही दाणा मिळालेला नाहि. अश्या परिस्थितीत 44000 मेट्रिक टन युरिया गेला कुठे अशी विचारणा सिंधू कोमजवार यांनी कृषी अधिक्षक यांना केली.
युरिया सेवा केंद्राकडे असल्यावरही शेतकर्याँणा वाढीव दरमधे विकल्या जातो व त्याची पक्की पावती देत नसल्याचे दिसुन आले.
हा युरिया कृषी सेवा केंद्रातील चालक ब्लेक मधे काही मोठ्या डेअरि फ़ार्मवाल्यांना विकतात व त्याचा वापर दुध, पनीर बनविण्याकरिता होतो असा संशय त्यांनी व्यक्त केला. अश्या परीस्थिथीमधे सर्व कृषी सेवा केंद्रामधे ग्रामीन कृषी अधिकारी यांनी लक्ष ठेवावे व कडक कारवाई करावी, शेतकर्याँना मुलभुत प्रमाणात त्यांना युरिया मिळावा अशी विनंती करण्यात आली. तेव्हा सिध्दूजी कोमजवार,आशिष देशमुख, दिपक पोहनेकर, सागर चरडे, विनोद शाहू, कार्तिक नारनवरे, प्रविण देशमुख, राजेश वाघमारे, सुरेश कदम, शंकर बेलखोडे, जितू गभने, अक्षय वाकडे, अजय गायकवाड, शैलेंद्र आंबिलकर, हिमांशु ठाकरे,इतर शिवसैनिक उपस्थित होते.