Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, सप्टेंबर ०८, २०२०

‘हा’ तांदूळ न शिजवताही खाता येतो !

  

"बोका चाऊल":न शिजवता खाल्ला  जाणारा तांदूळ

   


.        📯 दि. ८ सप्टेंबर  २०२० 📯

फेसबुक लिंकhttps://bit.ly/3haqR80
आशियाई देशांमधील लोकांच्या आहारात भात महत्त्वाचा घटक आहे. भारतातही जेवणात भाताचे स्थान नेहमीच अबाधित राहिलेले आहे. प. बंगाल, कोकण यासारख्या काही भागात तर ते अधिकच महत्त्वाचे आहे. भात करायचा म्हटलं की तांदूळ चांगले पंधरा ते वीस मिनिटे शिजवत ठेवावे लागतात. मात्र, आपल्याच देशात एक अशा प्रकारचा तांदूळ देखील पिकतो जो न शिजवताही खाता येतो.
    आपल्याकडील भात करायचा म्हटलं की तांदूळ चांगले पंधरा ते वीस मिनिटे शिजवत ठेवावे लागतात.
मात्र, आपल्याच देशात एक अशा प्रकारचा तांदूळ देखील पिकतो जो न शिजवताही खाता येतो. आसाममध्ये हा तांदूळ पिकत असून ‘बोका चाऊल’ असे या तांदळाचे नाव आहे. हा तांदूळ फक्त पाण्यात भिजवला तरी खाण्याजोगा बनतो. या तांदळाला आता जीआय (जिऑग्रॉफिकल इंडिकेशन) चा टॅग मिळाला आहे. त्यामुळे आता या तांदळावर आसामचा कायदेशीर अधिकार असणार आहे.  

‘बोका चाऊल’ हा तांदूळ आसाममधील नलबारी, बारपेटा, गोलपाडा, बक्सा, कामरूप, धुबरी, कोकराझर, दररंग या जिल्ह्यात पिकवला जातो. आसामी भाषेत त्याला ‘ओरिजा सातिवा’असे म्हटले जाते. या प्रकारच्या तांदळाचा शोध सतराव्या शतकात लागला होता, असे बोलले जाते.
17 व्या शतकात मुघलांसोबत लढताना आसाममधील सैनिक याच तांदळाचा भात तयार करायचे. पोहे जसे पाण्यात भिजवून लगेच खाता येऊ शकतात तसाच हा तांदूळ आहे. आसाममध्ये ‘बोका चाऊल’ तांदळापासून तयार केलेला भात हा दही, दूध, ताक, साखर, गूळ अशा पदार्थांसोबत खाल्ला जातो.


‘हा’ तांदूळ न शिजवताही खाता येतो !

‘बोका चाऊल’ हा तांदूळ आसाममधील नलबारी, बारपेटा, गोलपाडा, बक्सा, कामरुप, धुबरी, कोकराझर, दररंग या जिल्ह्यात पिकवला जातो. आसामी भाषेत त्याला ‘ओरिजा सातिवा’ असे म्हटले जाते. या प्रकारच्या तांदळाचा शोध सतराव्या शतकात लागला होता असे बोलले जाते


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.