Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, ऑगस्ट १०, २०२०

कोविडसंदर्भात २ लाख २५ हजार गुन्हे

लॉकडाऊनच्या काळात राज्यात १९ कोटी ८८ लाख रुपयांची दंड आकारणी

७ लाख २४ हजार पास -गृहमंत्री अनिल देशमुख

           
मुंबई दि १० -  लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार  २ लाख २५  हजार गुन्हे दाखल झाले आहेत. अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
    राज्यात  लॉकडाऊनच्या कालावधीत म्हणजे दि.२२ मार्च ते ९ ऑगस्टपर्यंत  कलम १८८ नुसार २,२५,३८०  गुन्हे नोंद झाले असून ३३,११७ व्यक्तींना अटक करण्यात आलीयातील विविध गुन्ह्यांसाठी  १९ कोटी ८८ लाख ०५  हजार ३५ ४ रु. दंड आकारण्यात आला.
    तसेच अत्यावश्यक सेवेसाठी ७ लाख २४  हजार २१५   पास  पोलीस विभागामार्फत देण्यात आले.
कडक कारवाई
 कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दलआरोग्य विभागडॉक्टर्सनर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध  कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत.
             या दरम्यान पोलिसांवर  हल्ला होण्याच्या ३३२ घटना घडल्या. त्यात ८८८ व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.
१०० नंबर- १ लाख
९ हजार  फोन
     पोलीस विभागाचा  १०० नंबर हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो.  लॉकडाऊनच्या काळात या फोनवर  १,०९,७९३ फोन आलेत्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली.
       तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे अशा ८२४ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. अशी माहिती श्री. देशमुख यांनी दिली.
       या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १३४६. वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तर ९५,६६२ वाहने जप्त करण्यात आली.

पोलिस कोरोना कक्ष
     कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने   मुंबईतील ५२ पोलीस व ४ अधिकारी अशा एकूण ५६ठाणे शहर १४  व ठाणे ग्रामीण ३ व १ अधिकारी,
रायगड २,पुणे शहर ३नाशिक शहर १ ,सोलापूर शहर ३,अमरावती शहर १ wpc,मुंबई रेल्वे ४,नाशिक ग्रामीण ३,जळगाव ग्रामीण १,जालना SRPF १ अधिकारी,
नवी मुंबई  SRPF
 अधिकारी १,
पालघर ग्रामीण २ व १ अधिकारी,
ए.टी.एस. १,
उस्मानाबाद १,
औरंगाबाद शहर ३,
जालना  १,
नवी मुंबई २सातारा१अहमदनगर २,औरंगाबाद रेल्वे १,
SRPF अमरावती १,
पुणे रेल्वे अधिकारी१,
PTS मरोळ अधिकारी १,
SID मुंबई १,नागपूर २,
बीड १,सोलापूर ग्रामीण १
अशा ११७ पोलिस बांधवांचा मृत्यू झाला. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली  तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेतयाकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. सध्या २४८
पोलीस अधिकारी व १७३२ पोलीस कोरोनाबाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

नागरिकाचा सहभाग अपेक्षित
         कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे.  तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.  सर्वांनी नियम पाळून  सहकार्य करावेअसे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.