Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, ऑगस्ट १४, २०२२

Maharashtra News | राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर । वाचा कोणाला कोणती खाती मिळाली

 


maharashtra News
मुंबई, दि. 14:  राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जाहीर केले आहे.  maharashtra-state-cabinet-expansion-for-rest-18-ministries

त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडे  सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले  विभाग आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.
news maharashtra | cabinet- expansion- ministers-portfolio-bjp-devendra-fadanvis-home-minister-finance-minister

  इतर 18 मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे आहेत:

 देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार

1. सर्वश्री राधाकृष्ण विखे-पाटील - महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास
 2. सुधीर मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय 
3. चंद्रकांत पाटील-  उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
4. डॉ. विजयकुमार गावित- आदिवासी विकास
5. गिरीष महाजन- ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण
6. गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता
7. दादा भुसे- बंदरे व खनिकर्म
8. संजय राठोड- अन्न व औषध प्रशासन
9. सुरेश खाडे- कामगार
10. संदीपान भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन
11. उदय सामंत- उद्योग 
12. प्रा.तानाजी सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
13. रवींद्र चव्हाण - सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

14. अब्दुल सत्तार- कृषी
15. दीपक केसरकर- शालेय शिक्षण व मराठी भाषा
16. अतुल सावे- सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण
17. शंभूराज देसाई- राज्य उत्पादन शुल्क
18. मंगलप्रभात लोढा- पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास


shinde-governments-account-allocation-announced

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.